सार्थ मायकोरायझा ठरतंय शेतकर्यांसाठी अत्यंत फायदेशीर - पिकांच्या मुळांना मिळणार बटकटी ,उत्पादनात होणार दुपट्टीने वाढ !
सार्थ मायकोरायझा ठरतंय शेतकर्यांसाठी अत्यंत फायदेशीर - पिकांच्या मुळांना मिळणार बटकटी ,उत्पादनात होणार दुपट्टीने वाढ ! शेतकरी बांधवांनो, आपण खतं घालतो, पिकांना पाणी देतो तरी कधी कधी झाडांना आवश्यक अन्नद्रव्यं (NPK, सूक्ष्म अन्नद्रव्ये) नीट मिळत नाहीत. कारण जमिनीत असलेली बर्याच अन्नद्रव्यं झाडं थेट शोषू शकत नाहीत. इथेच मायकोरायझा नावाचा सूक्ष्म मित्र झाडांच्या मुळांना मदत करतो. आता आपणास प्रश्न पडला असेल काय आहे मायकोरायझा ? मायकोरायझा म्हणजे काय? मायकोरायझा ही एक प्रकारची उपयुक्त बुरशी आहे जी पिकांच्या मुळांशी सहजीवन (Symbiosis) करते. म्हणजेच झाड आणि मायकोरायझा दोघे मिळून एकमेकांना फायदा करून देतात. ♻️ पाहूया, झाडांना मायकोरायझाचा फायदा कसा होतो? - मुळांचा विस्तार वाढतो. - मायकोरायझा मुळांच्या आजूबाजूला बारीक-जाळीदार धागे (Hyphae) पसरवते. - त्यामुळे झाडाच्या मुळांची कार्यक्षमता १०-२० पट वाढते. - फॉस्फरस सहज उपलब्ध करून देतो. - जमिनीत असलेला फॉस्फरस झाडांना थेट शोषता येत नाही. - मायकोरायझा हा फॉस्फरस विरघळवून झाडाला देतो. - सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता...