हवेतील नायट्रोजन स्थिर करणारे जिवाणू खते एक समृद्ध शेतीचा आधार !
हवेतील नायट्रोजन स्थिर करणारे जिवाणू खते एक समृद्ध शेतीचा आधार !
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आजचा आपला जो ब्लॉग चा विषय आहे तो अगदी खास ! हवेतील नायट्रोजन स्थिर करणारे जिवाणू खते, काय आहे त्यांचे महत्व ?
शेतकरी मित्रांनो,
आपल्याला माहीत आहे की नायट्रोजन हे झाडांसाठी सर्वात महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे, परंतु आपल्या जमिनीत नायट्रोजन भरपूर असूनही झाड थेट त्याचा उपयोग करू शकत नाही. मग काय होतं? आपण युरिया वापरतो. पण युरिया महाग आहे, आणि त्याचा अति वापर जमिनीची सुपीकता कमी करतो.
यासाठी पर्याय काय??
तर पर्याय अगदी सोपा व अगदी खास आहे!
इथेच नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू खत मदतीला येतात. हे सूक्ष्म जीव जमिनीतला नायट्रोजन झाडाला पचेल अशा स्वरूपात उपलब्ध करून देतात. त्यामुळे झाड हिरवंगार वाढतात, मुळे मजबूत होतात आणि उत्पादन वाढतं.
चला पाहूया,
नायट्रोजनचे महत्व -
> नायट्रोजन हा पिकांसाठी सर्वात महत्वाचा अन्नद्रव्य घटक आहे.
> झाडांची वाढ, पाने, हिरवळ, प्रकाशसंश्लेषण, दाण्यांचा व फळांचा आकार या सगळ्यासाठी नायट्रोजन आवश्यक असतो.
> पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात म्हणजेच शाकीय वाढीच्या काळात नायट्रोजन अति आवश्यक आहे.
> जमिनीत नैसर्गिकरीत्या नायट्रोजन कमी प्रमाणात उपलब्ध होतो.
नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू म्हणजे काय?
> हवेतील 78% नायट्रोजन थेट झाडांना मिळत नाही कारण तो “अक्रिय” स्वरूपात असतो.
> काही विशेष जिवाणू हे नायट्रोजन आपल्या चयापचय प्रक्रियेद्वारे झाडांना उपयोगी अशा स्वरूपात (अमोनिया, नायट्रेट) रुपांतरित करतात.
> या प्रक्रियेला नायट्रोजन स्थिरीकरण (Nitrogen Fixation) म्हणतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे –
👉🏻 प्रत्येक हेक्टरला 30–50 किलो युरियाची बचत होते.
👉🏻 खताचा खर्च कमी होऊन आपला थेट नफा वाढतो.
👉🏻 जमीन भुसभुशीत राहते, सुपीकता टिकते.
आज खतांचे दर वाढत आहेत आणि जमिनीवरचा ताणही वाढतोय. त्यामुळे हे जिवाणू खत वापरणं ही काळाची खरी गरज आहे.
नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंचे प्रकार नेमके कोणते ?
1. रायझोबियम (Rhizobium)
![]() |
| Rhizobium Mechanism |
- कडधान्य पिकांसोबत गाठी बनवून नायट्रोजन स्थिर करते.
- हरभरा, सोयाबीन, मूग, उडीद, वाटाणा, भुईमूग इ. पिकांसाठी उपयुक्त.
2. अझोस्पिरिलम (Azospirillum)
![]() |
| Azospirillum mechanism in rice crop |
- मुळांच्या भोवती राहून नायट्रोजन उपलब्ध करून देते.
- ऊस, भात, मका, ज्वारी, गहू यांसाठी उपयुक्त.
3. अझोटोबॅक्टर (Azotobacter)
![]() |
| Azotobacter Mechanism |
- जमिनीत स्वतंत्रपणे राहतो.
- भाज्या, फळे, धान्ये यासाठी उपयुक्त.
4. असिटोबॅक्टर (Acetobacter)
![]() |
| Acetobacter Mechanism |
- ऊस पिकासाठी विशेषतः महत्वाचा.
- ऊसाचा रस आणि शर्करा निर्मिती वाढवतो.
चला तर मग पाहूया, या खतांचे महत्त्वपूर्ण असे फायदे -
👉🏻 उत्पादनात वाढ
👉🏻 खतांवरील खर्च कमी
👉🏻 मातीची सुपीकता टिकून राहते
👉🏻 रोग प्रतिकारशक्ती वाढते
👉🏻 पर्यावरणास नुकसान होत नाही
👉🏻 जमिनीत नायट्रोजनचा तुटवडा कमी होतो.
👉🏻 रासायनिक युरियावर अवलंबून राहावे लागत नाही.
👉🏻 झाडे हिरवीगार, तगडी आणि उत्पादनक्षम होतात.
👉🏻 पिकांना नैसर्गिकरित्या नायट्रोजन उपलब्ध होतो.
👉🏻 रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.
👉🏻 जमिनीतील सूक्ष्मजीव संतुलन सुधारते.
👉🏻 मुळे मजबूत होतात व पिके निरोगी वाढतात."
"हे सूक्ष्मजिवाणू हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन पिकांना उपयोगी अशा स्वरूपात बदलतात.
उदा.
रायझोबियम डाळ वर्गीय पिकांच्या मुळाशी गाठी तयार करून नायट्रोजन स्थिरीकरण करते.
अझोटोबॅक्टर व अझोस्पिरीलियम तांदूळ, गहू, मका, ऊस यासारख्या पिकांना मदत करतात."
शेतकरी मित्रांनो, चला आपण सगळे मिळून नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू खत वापरू या आणि आपली जमीन, आपलं उत्पादन आणि आपला नफा दोन्ही वाचवू या.”
"रासायनिक खतांचे दर वाढत चालले आहेत आणि मातीची सुपीकता घटत आहे. अशा वेळी जैविक जिवाणू खते हा शाश्वत पर्याय आहे.
भविष्यात नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी यांचा वापर काळाची गरज बनणार आहे."
शेतकरी मित्रांनो आपण पाहतोय आजच्या शेतीमध्ये खतांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. रासायनिक युरिया खताचे भाव आणि त्याचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम हे दोन्ही प्रश्न गंभीर बनले आहेत. यावर एक उत्तम उपाय म्हणजे – हवेतील नायट्रोजन स्थिर करणारे जिवाणू खते.
निष्कर्ष -
नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू खते वापरल्याने रासायनिक युरियावरचा खर्च कमी होतो आणि शाश्वत शेतीकडे एक मोठे पाऊल टाकले जाते. नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू खत वापरा, खतांचा खर्च कमी करा आणि पिकांचे उत्पादन वाढवा! कारण हेच आहे काळाची खरी गरज! 🌱





Comments
Post a Comment