सार्थ मायकोरायझा ठरतंय शेतकर्‍यांसाठी अत्यंत फायदेशीर - पिकांच्या मुळांना मिळणार बटकटी ,उत्पादनात होणार दुपट्टीने वाढ !

 सार्थ मायकोरायझा ठरतंय शेतकर्‍यांसाठी अत्यंत फायदेशीर - पिकांच्या मुळांना मिळणार बटकटी ,उत्पादनात होणार दुपट्टीने वाढ ! 


शेतकरी बांधवांनो,

आपण खतं घालतो, पिकांना पाणी देतो तरी कधी कधी झाडांना आवश्यक अन्नद्रव्यं (NPK, सूक्ष्म अन्नद्रव्ये) नीट मिळत नाहीत. कारण जमिनीत असलेली बर्‍याच अन्नद्रव्यं झाडं थेट शोषू शकत नाहीत. इथेच मायकोरायझा नावाचा सूक्ष्म मित्र झाडांच्या मुळांना मदत करतो.

आता आपणास प्रश्न पडला असेल काय आहे मायकोरायझा ?

मायकोरायझा म्हणजे काय?

मायकोरायझा ही एक प्रकारची उपयुक्त बुरशी आहे जी पिकांच्या मुळांशी सहजीवन (Symbiosis) करते. म्हणजेच झाड आणि मायकोरायझा दोघे मिळून एकमेकांना फायदा करून देतात.


♻️  पाहूया, झाडांना मायकोरायझाचा फायदा कसा होतो?

- मुळांचा विस्तार वाढतो. 

- मायकोरायझा मुळांच्या आजूबाजूला बारीक-जाळीदार धागे (Hyphae) पसरवते.

- त्यामुळे झाडाच्या मुळांची कार्यक्षमता १०-२० पट वाढते.

- फॉस्फरस सहज उपलब्ध करून देतो.

- जमिनीत असलेला फॉस्फरस झाडांना थेट शोषता येत नाही.

- मायकोरायझा हा फॉस्फरस विरघळवून झाडाला देतो.

- सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते

- झिंक, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर यांसारखी सूक्ष्मद्रव्ये मायकोरायझामुळे झाडांपर्यंत पोहोचतात.

- कोरड्या हवामानात मदत

- मायकोरायझा मुळे जमिनीतील पाणी शोषण्याची क्षमता वाढते.

- त्यामुळे पिकं कोरड्या परिस्थितीत जास्त काळ तग धरतात.

- रोगप्रतिकारक शक्ती वाढते

- मुळांवर हल्ला करणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळते.


शेतकऱ्यांसाठी थेट होणारे फायदे कोणते ?

👉🏻 खतांचा वापर २५-३०% पर्यंत कमी करता येतो.

👉🏻 पिकांची वाढ जोमदार होते.

👉🏻 उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

👉🏻 जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढून माती जिवंत राहते.


✅ मायकोरायझा कधी व कसा वापरावा?

1. रोपे तयार करताना किंवा लागवडीच्या वेळी मातीमध्ये मिसळा.

2. ड्रीपने द्रवरूप मायकोरायझा देऊ शकता.

3. कोणत्याही रासायनिक खतांसोबत वापरता येतो, मात्र अती जास्त फंगीसाईड वापर टाळावा.


कोणत्या पिकांसाठी उपयुक्त आहे ?

मायकोरायझा जवळजवळ सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. विशेषतः –

1. भाजीपाला (टोमॅटो, वांगी, मिरची, कांदा, भोपळा)

2. फळबाग (द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा)

3. तुरी, सोयाबीन, हरभरा यांसारखी डाळवर्गीय पिकं

4. कापूस, ऊस, हळद, आले इत्यादी नगदी पिकं


वरील सर्व फायदे शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी आम्ही सादर करत आहोत खास आपल्यासाठी टिरॉन नुट्रीशन चे सार्थ मायकोरायझा !

💧सार्थ मायकोरायझा वापरण्याचे प्रमाण - १०० ग्रॅम प्रति एकर 


ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी - 

https://krishibazaar.in/product/tiron-sarth




आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 


 📱- 7757092091

धन्यवाद !  



Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !