का वाढतोय शेतकऱ्यांचा कल जैविक शेतीकडे तसेच जैविक उत्पादनांकडे?
का वाढतोय शेतकऱ्यांचा कल जैविक शेतीकडे तसेच जैविक उत्पादनांकडे?
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आजच्या काळात शेतीत रासायनिक खते, कीटकनाशके आणि Growth Promoters यांचा प्रचंड वापर होतो. कमी कालावधीत चांगले व जास्त उत्पादन मिळाले तरी यामुळे मातीची सुपीकता, पिकांची गुणवत्ता आणि मानवी आरोग्य यावर नकारात्मक परिणाम होतोय.
त्यामुळेच शेतकऱ्यांचा कल हळूहळू जैविक शेतीकडे वळताना दिसतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जैविक शेती म्हणजे काय?
जैविक शेती ही निसर्गाशी सुसंगत शेती पद्धत आहे. यात रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांऐवजी जैविक खते, गांडूळखत, जिवाणू खते, शेणखत, कंपोस्ट, पिकांचा अवशेष व जैविक कीडनाशके वापरले जातात.
शेतकऱ्यांचा कल जैविक शेतीकडे वाढण्याची कारणे-
१. मातीची सुपीकता टिकवणे (Soil Fertility)
रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे मातीची रचना, सूक्ष्मजीवसंख्या व सेंद्रिय अंश कमी होतो. जैविक शेतीत नैसर्गिक खतांचा वापर करून मातीतील जीवन परत आणता येते.
२. उत्पादनाचा दर्जा सुधारतो (Product Quality)
जैविक शेतीमुळे मिळणारे धान्य, फळे व भाजीपाला स्वादिष्ट, पौष्टिक आणि विषमुक्त असतात. त्यामुळे ग्राहकांकडून त्याला चांगली मागणी मिळते.
३. शाश्वत शेतीकडे वाटचाल (Sustainable Agriculture)
जैविक शेती ही पर्यावरणपूरक व शाश्वत शेती आहे. जमिनीतील पाणी, हवा व जैवविविधता सुरक्षित राहते.
४. बाजारपेठेत जास्त दर (Excellent Market Rate)
आज "ऑर्गॅनिक" उत्पादनांना शहरांमध्ये व परदेशातही चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला जास्त किंमत मिळते.
५. आरोग्याची जाणीव (Health is Wealth)
रासायनिक शेतीतून मिळणाऱ्या अन्नामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. याउलट जैविक शेतीतून मिळणारे अन्न विषमुक्त असल्याने शेतकरी व ग्राहक दोघांचेही आरोग्य चांगले राहते.
६. शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो (Agriculture Production Cost)
जैविक शेतीसाठी लागणारे घटक — जसे की शेणखत, गांडूळखत, जीवाणू खते, वनस्पतीजन्य कीटकनाशके — हे शेतकरी स्वतः तयार करून वापरू शकतो, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकरी मित्रांनो,
यावर पर्यायी उत्तर म्हणून आम्ही घेऊन आलोय टिरॉन न्यूट्रिशन चे NPK Consortia !
👉🏻 पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते वापरतायं? तरी देखील उत्पादनात वाढत होत नाहीये?
👉🏻 रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत बिघडला आहे ?
👉🏻 जमीन खराब झाली आहे ?
👉🏻 मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या कमी होतेय?
👉🏻 एकूण उत्पादनात वाढ होत नाही ?
या सर्वांवर खात्रीशीर उपाय मिळवा !
यासाठीच वापरा टिरॉन न्यूट्रिशन चे NPK Consortia !
NPK Consortia – पर्यावरणपूरक शेतीचा आधारस्तंभ !
"पिकाला पोषण, जमिनीला संरक्षण, शेतकऱ्याला समाधान." 💯👍🏻
NPK Consortia -
👉🏻 नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया
👉🏻 फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि
👉🏻 पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया यांचे अद्वितीय असे मिश्रण!
डेक्स्ट्रोज स्वरूपात असल्यामुळे पिकांसाठी सहज उपलब्ध होते व जमिनीची सुपीकता वाढवते!
💧वापरण्याचे प्रमाण - 200 ग्रॅम/एकर
ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
https://krishibazaar.in/product/tiron-npk-consortia
निष्कर्ष -
जैविक शेती तसेच जैविक खते ही केवळ शेतीची पद्धत नसून निसर्गाशी नाते जपणारी जीवनशैली आहे. आरोग्यदायी अन्न, मातीची सुपीकता व पर्यावरणाचे रक्षण यासाठी शेतकऱ्यांचा कल नैसर्गिकरित्या जैविक शेतीकडे वाढत आहे.

Comments
Post a Comment