नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू खते - शेतीसाठी एक वरदान"

 नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू खते - शेतीसाठी एक वरदान"!


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आजच्या आधुनिक शेतीत रासायनिक खतांचा अतिरेकी वापर वाढत चालला आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता घटते, उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यावरणालाही हानी पोहोचते. अशा परिस्थितीत जैविक जिवाणू खते शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरत आहेत. यामध्ये विशेषतः नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू हे खत पिकांसाठी वरदानच आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चला पाहूया, 

नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू म्हणजे काय?

हवेतील नायट्रोजन (N₂) हा वायुरूप स्वरूपात असतो, झाडांना थेट याचा उपयोग करता येत नाही. नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू (Nitrogen Fixing Bacteria) हवेतील नायट्रोजनचे शोषण करून ते पिकांना उपयोगी पडणाऱ्या अमोनिया किंवा नायट्रेट स्वरूपात रूपांतर करतात. त्यामुळे पिकांना पुरेसा नायट्रोजन मिळतो आणि पिकांची वाढ जोमदार होते.


Biological Nitrogen Fixation


नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू म्हणजे काय हे समजले, आता पाहूया ते जिवाणू नेमके कोणते आहेत ?

✨ नायट्रोजन स्थिरीकरण करणारे प्रमुख जिवाणू- 

1. रायझोबियम (Rhizobium) – डाळवर्गीय पिकांच्या मुळांशी संलग्न होऊन नायट्रोजन स्थिरीकरण करतात. 

2. अझोटोबॅक्टर (Azotobacter) – मोकळ्या मातीत राहतात - गहू, मका, ऊस, भाज्या, फळपिकांसाठी उपयुक्त.

3. अझोस्पिरिलम (Azospirillum) – तांदूळ, ज्वारी, मका, ऊस अशा पिकांसोबत जास्त प्रभावी.

4. निळी-हिरवी शैवाळे (Blue Green Algae – BGA) – तांदुळाच्या शेतात पाणथळ स्थितीत नायट्रोजन स्थिरीकरण करतात.

5. अ‍ॅनाबेना–अ‍ॅझोल्ला (Anabaena–Azolla) – भातशेतीसाठी उपयुक्त, पाणथळ जमिनीत जास्त प्रभावी.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतीसाठी होणारे फायदे -

1. जमिनीतील नायट्रोजनची पातळी नैसर्गिकरीत्या वाढते.

2. रासायनिक युरिया खते २५-३०% पर्यंत कमी वापरता येतात.

3. मातीतील सेंद्रिय द्रव्यांची वाढ होऊन सुपीकता टिकून राहते.

4. पिकांची वाढ, हिरवळ व उत्पादनक्षमता वाढते.

5. मुळांची वाढ मजबूत होते आणि रोगप्रतिकारक्षमता वाढते.

6. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखले जाते.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ही जिवाणू खते नेमकी कशी वापरावी ?

1. बीजप्रक्रिया (बी लावण्यापूर्वी )

2. रोपांची मुळे भिजवणे

3. मातीमध्ये मिसळून वापरणे



निष्कर्ष - 

"रासायनिक खतांच्या वाढत्या खर्चात नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू वापरणे ही काळाची गरज आहे."

नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू खते वापरल्याने उत्पादन खर्च कमी होतो, जमिनीची सुपीकता वाढते आणि शाश्वत शेती साध्य करता येते. पर्यावरणपूरक व नैसर्गिक शेतीसाठी ही खते शेतकऱ्यांसाठी खरोखरच "एक वरदान" आहेत.



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !