हळद आणि आले पिकातील कंदमाशी, कंदसड यावर मिळवा सर्वोत्तम नियंत्रण !
हळद आणि आले पिकातील कंदमाशी, कंदसड यावर मिळवा सर्वोत्तम नियंत्रण !
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
हळद व आले ही नगदी पिके शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार आहेत. पण या पिकांमध्ये कंदमाशी (Rhizome fly) व कंदसड (Rhizome rot) हे कीड व रोग मिळून मोठे नुकसान करतात. योग्य वेळी ओळख व नियंत्रण न घेतल्यास उत्पादनात 40-60% घट येऊ शकते.
आजच्या ह्या ब्लॉग मध्ये माहिती घेणार आहोत ती म्हणजे, हळद आणि आले पिकातील कंदमाशी, कंदसड यावर सर्वोत्तम नियंत्रण कसे मिळवायचे ?
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चला पाहूया, कंदमाशी व कंदसड ह्या समस्या निर्माण होण्याची कारणे , त्याची लक्षणे, त्यामुळे होणारे नुकसान, तसेच त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे ?
> कंदमाशी प्रामुख्याने कीटकामुळे (माशीची अंडी व अळी).
> कंदसड प्रामुख्याने बुरशीजन्य रोगामुळे (ओलसर व पाणी साचलेल्या परिस्थितीत).
1. कंदमाशी (Rhizome Fly)
लक्षणे -
- माशी पाने व कंदामध्ये अंडी घालते.
- अळी कंदामध्ये घुसून आतील भाग खाऊन टाकते.
- कंदावर तपकिरी/काळसर छिद्रे दिसतात.
- पाने पिवळी पडतात व झाडाची वाढ खुंटते.
> कंदमाशीमुळे होणारे नुकसान
- कंदावर छिद्रे पडतात.
- मादी माशी पाने व कंदामध्ये अंडी घालते.
- अळी बाहेर पडल्यावर कंदामध्ये घुसून आतील भाग खाते.
- त्यामुळे कंदावर तपकिरी ते काळसर छिद्रे तयार होतात.
- कंदाची गुणवत्ता घटते
- कंद आतील बाजूने पोकळ, मऊ व कुजल्यासारखा होतो.
- बाजारात विक्रीसाठी अशा कंदांची किंमत खूप कमी मिळते.
- झाडाची वाढ खुंटते
- कंद खराब झाल्याने त्यातून अन्नसाठा मिळत नाही.
- पाने पिवळी पडतात, कोमेजतात आणि झाडाची वाढ थांबते.
- उत्पादनात मोठी घट
थोडक्यात सांगायचं तर, कंदमाशीमुळे कंदांची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही घटते, तसेच बाजारात विक्रीयोग्य माल कमी मिळतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
2. कंदसड (Rhizome Rot)
(Pythium, Fusarium, Rhizoctonia सारख्या बुरशीजन्य रोगामुळे होतो)
लक्षणे
- पाने हळूहळू पिवळी पडून वाळतात.
- कंद मऊ होऊन कुजतो, वास येतो.
- कुजलेल्या भागावर पांढरी/तपकिरी बुरशी दिसते.
> कंदसडमुळे होणारे नुकसान
- कंदाची कुज व नासाडी
- कंद मऊ होतो, काळसर पडतो आणि कुजतो.
- आतून पोकळ, चिकट व दुर्गंधीयुक्त होतो.
- विक्रीसाठी अयोग्य बनतो.
- झाडाची वाढ थांबते
- पाने पिवळी पडतात, हळूहळू वाळतात व झाड मरते.
- उत्पादनात मोठी घट
👉 थोडक्यात सांगायचे तर, कंदसडमुळे झाड मरते, कंद कुजतात, उत्पादन व गुणवत्ता कमी होते आणि विक्रीयोग्य माल कमी मिळतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कंदमाशी, कंदसड यांची लक्षणे तसेच त्यामुळे होणारे नुकसान देखील बघितले यावर नियंत्रण मिळायचे कसे ते पाहूया !
यावर प्रभावी असे नियंत्रण मिळविण्यासाठी टिरॉन न्युट्रिशन चे संवर्धन किट !
आले, हळद पिकातील कंदसड, कंदमाशी यावर अतिशय प्रभावी
आले, हळद पिकात भरपूर फुटवे आणि जोमदार वाढ हवी आहे का?
मुळ सड आणि जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण हवे आहे का?
तर आजच वापरा टिरॉन न्यूट्रिशन प्रा. लि. चे "संवर्धन किट"
✅ भरपूर फुटवे
✅ जोमदार वाढ
✅ मुळ सड आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण
✅ निरोगी आणि उत्पादनक्षम पीक
💧वापरण्याचे प्रमाण - 1 किट प्रति एकर
> आणखी एक खास उपाय कंद सड तसेच कंदकूज यासाठी प्रणिल अँग्री चे खास सोल्यूशन !
👉🏻 फॉस्फोरो + फायटर च्या परफेक्ट डोस ने मिळवा "दमदार उत्पादन"
> फॉस्फोरो + फायटर वापरण्याचे फायदे -
👉🏻 कंदसड, कंद कूज रोगावर प्रभावी नियत्रंण मिळते.
👉🏻 कंदाची वाढ चांगली होते.
👉🏻 100% परिणामकारक
💧वापरण्याचे प्रमाण -
- फॉस्फोरो - 500 ग्रॅम/एकर
- फायटर - 500 मिली/एकर
आमची वरील उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
1. https://krishibazaar.in/product/tiron-sanvardhan-kit
🌿 निष्कर्ष
हळद व आले पिकामध्ये कंदमाशी व कंदसड या समस्या गंभीर असल्या तरी प्रतिबंध + जैविक उपाय यांचा योग्य मेळ साधल्यास शेतकरी कंदांचे रक्षण करून भरघोस उत्पादन घेऊ शकतात.



Comments
Post a Comment