कसे मिळवाल? "ढोबळी मिरची पिकात विक्रमी उत्पादन!" जाणून घ्या प्रगत असे तंत्रज्ञान..
कसे मिळवाल? "ढोबळी मिरची पिकात विक्रमी उत्पादन!" जाणून घ्या प्रगत असे तंत्रज्ञान.. नमस्कार शेतकरी मित्रांनो! आज आपणास माहितीच आहे कि, शेतकरी नवीन नवीन पिके घेत आहेत, स्मार्ट शेतीचे तंत्रज्ञान साकारत आहे. यामध्ये ढोबळी मिरची (Capsicum) हे एक असे पीक आहे, जे योग्य नियोजनाने तुम्हाला सर्वोत्तम उत्पादन देते. मग ती उघड्या शेतातील लागवड असो वा शेडनेटमधील, बाजारपेठेत याला वर्षभर मागणी असते. शेडनेट ही शेतकऱ्यांसाठी एक आधुनिक आणि प्रभावी शेती पद्धत आहे. या पद्धतीत पिकांना सूर्यप्रकाश, पाऊस आणि हवामानापासून संरक्षण मिळते. शिमला मिरची हे एक असं पिक आहे ज्याला शेडनेट मध्ये चांगले वातावरण मिळते. शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड ही एक उत्कृष्ट पद्धत आहे ज्यामुळे आपण वर्षभर ताजी आणि गुणवत्तायुक्त मिरची मिळवू शकता. शेडनेटमुळे हवामान आणि किडींच्या त्रासापासून संरक्षण मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण ढोबळी मिरची लागवडीची संपूर्ण माहिती घेणार आहोत. ----------------------------------------------------------------------------------------------------...