कसे मिळवाल? "ढोबळी मिरची पिकात विक्रमी उत्पादन!" जाणून घ्या प्रगत असे तंत्रज्ञान..
कसे मिळवाल? "ढोबळी मिरची पिकात विक्रमी उत्पादन!" जाणून घ्या प्रगत असे तंत्रज्ञान..
नमस्कार शेतकरी मित्रांनो!
आज आपणास माहितीच आहे कि, शेतकरी नवीन नवीन पिके घेत आहेत, स्मार्ट शेतीचे तंत्रज्ञान साकारत आहे.
यामध्ये ढोबळी मिरची (Capsicum) हे एक असे पीक आहे, जे योग्य नियोजनाने तुम्हाला सर्वोत्तम उत्पादन देते. मग ती उघड्या शेतातील लागवड असो वा शेडनेटमधील, बाजारपेठेत याला वर्षभर मागणी असते.
शेडनेट ही शेतकऱ्यांसाठी एक आधुनिक आणि प्रभावी शेती पद्धत आहे. या पद्धतीत पिकांना सूर्यप्रकाश, पाऊस आणि हवामानापासून संरक्षण मिळते. शिमला मिरची हे एक असं पिक आहे ज्याला शेडनेट मध्ये चांगले वातावरण मिळते.
शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड ही एक उत्कृष्ट पद्धत आहे ज्यामुळे आपण वर्षभर ताजी आणि गुणवत्तायुक्त मिरची मिळवू शकता. शेडनेटमुळे हवामान आणि किडींच्या त्रासापासून संरक्षण मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो.
आजच्या या ब्लॉगमध्ये आपण ढोबळी मिरची लागवडीची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. हवामान आणि जमिनीची निवड
- ढोबळी मिरचीला जास्त उष्णता किंवा जास्त थंडी असे हवामान मानवत नाही.
जमीन: पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन असावी.
२. सुधारित वाणांची निवड
चांगल्या उत्पन्नासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या दर्जेदार संकरित (Hybrid) वाणांची निवड करा. उदा. इंदू, बॉम्बे, ओरोबेल, किंवा स्थानिक वातावरणात सेट होणारे नामांकित कंपन्यांचे वाण.
३. रोपांची वाढ आणि लागवड
रोपे नेहमी प्रो-ट्रे (Pro-tray) मध्ये कोकोपीटचा वापर करून तयार करावीत, जेणेकरून मर रोग कमी होतो.
लागवड करताना दोन रोपांतील अंतर दीड ते दोन फूट ठेवावे.
मल्चिंग पेपरचा वापर: तण नियंत्रणासाठी आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी २५-३० मायक्रॉनचा मल्चिंग पेपर अवश्य वापरावा.
४. योग्य व प्रभावी खते
ढोबळी मिरचीला 'ठिबक सिंचन' (Drip Irrigation) हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
ड्रीप/आळवणी व्यवस्थापन
1. रोप लागणी नंतर पुढील ५ ते ६ दिवसांनी ड्रीपद्वारे द्या पोषक किट
प्रमाण - १ किट/एकर
होणारे फायदे -
- रोपांच्या जोमदार वाढीसाठी
- पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी
- मर रोग होऊ नये यासाठी
2. रोप लागणीनंतर 12 ते 13 दिवसांनी
हल्क + सेन्टिनेल + मॅग्नेशियम सल्फेट
- उत्कृष्ट काळोखी,
- फुटवा, दोन पेरांमधील अंतर कमी करण्यास मदत
हल्क - 1 लिटर/एकर
सेन्टिनेल - 500 ग्रॅम/एकर
मॅग्नेशियम सल्फेट - 5 किलो /एकर
गर्भधारणेसाठी वापरा
रिच-कॅल (1 लिटर/एकर) + फुल्विको प्रो (500 ग्रॅम/एकर) + बायो नेक्सा (500 ग्रॅम/एकर)
भरपूर फुलकळी लागण्यासाठी , सेटिंग अधिक चांगली होण्यासाठी
अमिनो गोल्ड + टिरॉन 888 + रोबुस्टा डीएफ
- अमिनो गोल्ड - 250 ग्रॅम/एकर
- टिरॉन 888 - 1 लिटर/एकर
- रोबुस्टा डीएफ - 2 किलो /एकर
फळांची उत्कृष्ट साईज, आकर्षक रंग, चमक यासाठी सर्वोत्तम
टिरॉन मॅक्सिमा (5 लिटर/एकर) + ग्रीन केल्प (1 लिटर/एकर)
फळ फुगवणीसाठी, आकर्षक रंग, चमक
किंग स्टार (5 लिटर/एकर) + रॉयल के (200 ग्रॅम/एकर)
कीड व रोग नियंत्रण
महत्वाच्या किडी-
1. थ्रिप्स/माइट्स
उपाय-
- या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जैविक कीटकनाशकाचा वापर प्रभावी ठरतो
- शिल्ड हे जैविक कीटकनाशक असल्याने ते 100% प्रभावी उत्पादन आहे.
- 2 मिली/ लिटर ने ह्या उत्पादनाची फवारणी करावी.
2. पाने व देठ कुडतरणारी अळी (शूट बोरर)
उपाय - या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रणीलचे माॅर्डर ह्या उत्पादनाची (2 मिली लिटर) ने फवारणी करावी.
रोग -
1. बुरशीजन्य रोग (ब्लाइट, डाऊनी मिल्ड्यू)
उपाय - बुरशीजन्य रोगांपासून शिमला पिकाचे संरक्षण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा.
रेंजर (2 ग्रॅम/लिटर) हे उत्पादन वापरा
🛒 आमची वरील उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी-
1.https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit
निष्कर्ष-
सिमला मिरची शेती ही केवळ मेहनतीची नाही तर नियोजनाची शेती आहे. जर तुम्ही योग्य खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण केले, तर एकरी १० ते १५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !
.png)
Comments
Post a Comment