Posts

ढोबळी मिरची वर उन्हामुळे पिवळे-तपकिरी डाग पडताय? मिरची खराब होतेय? जाणून घ्या प्रभावी उपाय!

Image
ढोबळी मिरची वर उन्हामुळे पिवळे-तपकिरी डाग पडताय? मिरची खराब होतेय? जाणून घ्या प्रभावी उपाय! नमस्कार शेतकरी बंधूंनो,  आजकाल हवामानातील बदल, तापमानातील वाढ आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे ढोबळी मिरची पिकात फळांवर उन्हाचे चट्टे ही समस्या वाढताना दिसत आहे. योग्य वेळी उपाय न केल्यास यामुळे उत्पादन आणि दर्जा दोन्हीवर मोठा परिणाम होतो. जेव्हा ढोबळी मिरची थेट तीव्र सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हा फळाच्या सालीवर पांढरे, पिवळसर किंवा तपकिरी डाग पडतात. पुढे हे भाग सुकून काळपट होतात आणि फळ खराब होते. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- फळांवर नेमकी लक्षणे कोणती दिसतात ? फळावर पांढरे किंवा पिवळसर डाग दिसणे पुढे ते तपकिरी किंवा काळपट जखमेसारखे होणे प्रभावित भाग मऊ किंवा कोरडा होणे बाजारात फळाचा दर्जा कमी होणे आता पाहूया मुख्य कारणे कोणती ? जास्त तापमान आणि तीव्र सूर्यप्रकाश झाडावर पानांची संख्या कमी असणे पिकावर थ्रिप्स किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव (पाने कमी होणे) पाण्याची कमतरता किंवा अनियमित सिंचन योग्य प...

ऊस पिकात 'NPK Consortia' चा वापर - खर्चात मोठी बचत आणि विक्रमी उत्पादन!

Image
ऊस पिकात 'NPK Consortia' चा वापर - खर्चात मोठी बचत आणि विक्रमी उत्पादन! ​नमस्कार शेतकरी मित्रांनो! ​आजच्या आधुनिक शेतीत रासायनिक खतांचा अतिवापर होत आहे. यामुळे जमिनीचा पोत बिघडत असून शेतीचा खर्चही वाढत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणजे NPK Consortia  ऊस पिकात NPK Consortia चा वापर म्हणजे "कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे 'महा-जीवाणू' खत!" महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या जमिनीचा पोत खालावणे आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे चिंतेत आहेत. अशा वेळी NPK Consortia (जैव खत कन्सोर्टिया) हे उसाच्या भरघोस वाढीसाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहे. ​ ऊस पिकासाठी NPK Consortia का आवश्यक आहे? ​ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशची गरज असते. बऱ्याचदा आपण दिलेली रासायनिक खते मातीत स्थिर (Fix) होतात आणि उसाच्या मुळांना मिळत नाहीत. NPK कन्सोर्टियातील जीवाणू ही स्थिर झालेली खते विरघळवून ती ऊसाला उपलब्ध करून देतात. ​ NPK Consortia म्हणजे काय? ​NPK कन्सोर्टिया म्हणजे नत्र (Nitrogen), स्फुरद (Phosphorus) आणि पालाश (Potassium) उपलब्ध करून देणाऱ्या विविध...

शेतकरी मित्रांनो, आता खतांवरचा खर्च वाचवा - बायोनेक्सा ने पिकाला द्या पूर्ण पोषण!

Image
 शेतकरी मित्रांनो, आता खतांवरचा खर्च वाचवा -  बायोनेक्सा ने पिकाला द्या पूर्ण पोषण! ​नमस्कार शेतकरी मित्रांनो! ​आपण आपल्या शेतात भरपूर खते टाकतो, विशेषतः डीएपी (DAP) आणि पोटॅश. पण तुम्हाला माहिती आहे का? आपण टाकलेल्या खतांपैकी मोठा हिस्सा जमिनीत 'फिक्स' होतो, म्हणजे तो पिकांना उपलब्धच होत नाही. परिणामी, खर्च वाढतो आणि जमिनीचा पोत बिघडतो. ​यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे ' बायोनेक्सा'!  हे केवळ एक उत्पादन नसून तुमच्या पिकासाठी संजीवनी आहे. यात स्फुरद विरघळवणारे जीवाणू (PSB) आणि पालाश वहन करणारे जीवाणू (KMB) यांचे अत्यंत प्रभावी मिश्रण आहे. चला तर मग जाणून घेऊया, बायोनेक्सा तुमच्या शेतीसाठी कसा महत्वाचा ठरू शकतो.  👉🏻 बायोनेक्सा मधील मुख्य घटक काय आहेत? बायोनेक्सा डेक्स्ट्रोज (Dextrose) स्वरूपातील दोन शक्तीशाली जीवाणूंचे मिश्रण आहे: 1. ​ Phosphorus Solubilising Bacteria (PSB): जमिनीत स्थिर झालेला स्फुरद (Phosphorus) विरघळून तो पिकाच्या मुळांना शोषता येईल अशा स्वरूपात आणतो. 2. ​ Potash Mobilizing Bacteria (KMB): जमिनीत साठलेला पालाश (Potash) गतिमान करून तो झाडांच्या ग...

कसे मिळवाल? "ढोबळी मिरची पिकात विक्रमी उत्पादन!" जाणून घ्या प्रगत असे तंत्रज्ञान..

Image
  कसे मिळवाल? "ढोबळी मिरची पिकात विक्रमी उत्पादन!" जाणून घ्या प्रगत असे तंत्रज्ञान.. नमस्कार शेतकरी मित्रांनो!  आज आपणास माहितीच आहे कि, शेतकरी नवीन नवीन पिके घेत आहेत, स्मार्ट शेतीचे तंत्रज्ञान साकारत आहे. यामध्ये ढोबळी मिरची (Capsicum) हे एक असे पीक आहे, जे योग्य नियोजनाने तुम्हाला सर्वोत्तम उत्पादन देते. मग ती उघड्या शेतातील लागवड असो वा शेडनेटमधील, बाजारपेठेत याला वर्षभर मागणी असते. शेडनेट ही शेतकऱ्यांसाठी एक आधुनिक आणि प्रभावी शेती पद्धत आहे. या पद्धतीत पिकांना सूर्यप्रकाश, पाऊस आणि हवामानापासून संरक्षण मिळते. शिमला मिरची हे एक असं पिक आहे ज्याला शेडनेट मध्ये चांगले वातावरण मिळते. शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड ही एक उत्कृष्ट पद्धत आहे ज्यामुळे आपण वर्षभर ताजी आणि गुणवत्तायुक्त मिरची मिळवू शकता. शेडनेटमुळे हवामान आणि किडींच्या त्रासापासून संरक्षण मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण ढोबळी मिरची लागवडीची संपूर्ण माहिती घेणार आहोत.  ----------------------------------------------------------------------------------------------------...

केळीच्या घडाला साईझ, वजन, चकाकी तसेच दमदार उत्पादनासाठी जाणून घ्या जबरदस्त फॉर्म्युला!

Image
केळीच्या घडाला " साईझ , वजन, चकाकी तसेच दमदार उत्पादनासाठी जाणून घ्या जबरदस्त फॉर्म्युला!" नमस्कार केळी उत्पादक शेतकरी मित्रांनो, केळीच्या घडाला योग्य साइज, वजन आणि नैसर्गिक चकाकी मिळत नाहीये?  या ब्लॉग मध्ये आपण माहिती घेणार आहोत की योग्य डोस वापरल्यावर केळीच्या घडामध्ये तसेच केळी उत्पादन वाढीसाठी कसा जबरदस्त फरक पडतो. ✅ घडाची साइज आणि वादा कसा वाढवावा ? ✅ घडाचे वजन कसे वाढवावे? ✅ फळांना आकर्षक चकाकी कशी आणावी ? ✅ योग्य डोस आणि वापरण्याची वेळ कोणती? जर तुम्ही केळी उत्पादक असाल किंवा उत्पादन वाढवायचे असेल तर एकदा ही उत्पादने नक्की वापरा! केळीच्या घडाची साईज (Size), वजन (Weight) आणि चकाकी (Shine) वाढवण्यासाठी खालील 'जबरदस्त कॉम्बिनेशन' कसे सर्वात प्रभावी ठरतील ते पाहूया.. ​केळी उत्पादकांसाठी दर्जेदार फॉर्म्युला 👉🏻 वजन आणि चकाकीचा मंत्र!  ​केळी निसवल्यापासून (Flowering) ते घड भरण्यापर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात फळाला योग्य पोषण मिळाले, तरच बाजारात उच्च दर मिळतो. त्यासाठी खालील उत्पादने वापरा केळीचे पीकात जर तुम्हाला दर्जेदार घड आणि हिरवीगार बाग हवी असे...

जाणून घ्या “डाळिंब बागेतील प्रमुख समस्या आणि विक्रमी उत्पादनाचे गुपित"!

Image
  जाणून घ्या “डाळिंब बागेतील प्रमुख समस्या आणि विक्रमी उत्पादनाचे गुपित"! नमस्कार शेतकरी बंधूंनो,  डाळिंब हे अत्यंत संवेदनशील आणि व्यवस्थापनप्रधान पीक आहे. फुल अवस्थेपासून ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर अचूक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन आवश्यक असते. अनेक वेळा शेतकऱ्यांना खालील समस्या येतात, जाणून घेऊया त्या समस्या व त्यावर प्रभावी असा उपाय  ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- १) फुलगळ आणि कमी फलधारणा ― ● फुल अवस्थेत बोरॉन, कॅल्शियम आणि झिंक यांचा असमतोल असल्यास परागण व फलधारणा कमी होते. जास्त नत्र दिल्यास झाडाची शाकीय वाढ वाढते पण फुलधारणा कमी राहते. डाळिंब बागेत फळगळ ही मोठी समस्या आहे. पोषणाची कमतरता, हवामानातील बदल आणि बुरशीजन्य रोगांमुळे फळ मोठ्या प्रमाणात गळतात. 👉🏻 अशा वेळी प्रभावी उपाय म्हणजे रिच-कॅल 21 + फायटर फायदे -  👉🏻 रिच-कॅल 21 – कॅल्शियमयुक्त पोषण देऊन फळांची पकड मजबूत करते, फळ गळ कमी करते आणि फळाचा दर्जा सुधारते. 👉🏻 फायटर – बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करू...

घेऊया योग्य निर्णय – संत्री मोसंबी पिकातील फळगळ रोखा, उत्पादन वाढवा!

Image
  घेऊया योग्य निर्णय – संत्री मोसंबी पिकातील  फळगळ रोखा, उत्पादन वाढवा! नमस्कार शेतकरी मित्रांनो,  संत्री व मोसंबी (सिट्रस) पिकात फळगळ (Fruit Drop) ही गंभीर समस्या आहे. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात 30–50% पर्यंत घट होऊ शकते. चला तर मग, फळगळ होण्याची प्रमुख कारणे आणि त्यावर प्रभावी उपाय सविस्तर जाणून घेऊया. संत्री–मोसंबी बागेत फळगळ थांबवा! योग्य कारण ओळखा, उत्पादन दुप्पट वाढवा! 🍊 फळगळ होण्याची प्रमुख कारणे 1️⃣ अन्नद्रव्यांची कमतरता नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) असंतुलन कॅल्शियम व बोरॉनची कमतरता 👉 यामुळे फुलांचे व लहान फळांचे गळ होते. 2️⃣ पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन जास्त पाणी किंवा दुष्काळी ताण अनियमित पाणीपुरवठा 👉 झाडाला ताण येऊन फळगळ वाढते. 3️⃣ परागीकरणातील अडचणी कमी तापमान, जास्त उष्णता पावसाळ्यात जास्त आर्द्रता 4️⃣ कीड व रोगांचा प्रादुर्भाव फळमाशी बुरशीजन्य रोग 👉 फळ कमकुवत होऊन गळतात. 5️⃣ हवामानातील बदल उष्ण वारे तापमानातील अचानक बदल वादळी पाऊस ✅ फळगळ कमी करण्यासाठी प्रभावी उपाय संत्री व मोसंबी बागेत फळगळ थांबवा – उत्पादन वाढवा! 🍋🍊 आता फळ गळ नाही...