ढोबळी मिरची वर उन्हामुळे पिवळे-तपकिरी डाग पडताय? मिरची खराब होतेय? जाणून घ्या प्रभावी उपाय!
ढोबळी मिरची वर उन्हामुळे पिवळे-तपकिरी डाग पडताय? मिरची खराब होतेय? जाणून घ्या प्रभावी उपाय!
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
आजकाल हवामानातील बदल, तापमानातील वाढ आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे ढोबळी मिरची पिकात फळांवर उन्हाचे चट्टे ही समस्या वाढताना दिसत आहे. योग्य वेळी उपाय न केल्यास यामुळे उत्पादन आणि दर्जा दोन्हीवर मोठा परिणाम होतो.
जेव्हा ढोबळी मिरची थेट तीव्र सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हा फळाच्या सालीवर पांढरे, पिवळसर किंवा तपकिरी डाग पडतात. पुढे हे भाग सुकून काळपट होतात आणि फळ खराब होते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
फळांवर नेमकी लक्षणे कोणती दिसतात ?
- फळावर पांढरे किंवा पिवळसर डाग दिसणे
- पुढे ते तपकिरी किंवा काळपट जखमेसारखे होणे
- प्रभावित भाग मऊ किंवा कोरडा होणे
- बाजारात फळाचा दर्जा कमी होणे
आता पाहूया मुख्य कारणे कोणती ?
- जास्त तापमान आणि तीव्र सूर्यप्रकाश
- झाडावर पानांची संख्या कमी असणे
- पिकावर थ्रिप्स किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव (पाने कमी होणे)
- पाण्याची कमतरता किंवा अनियमित सिंचन
- योग्य पोषण व्यवस्थापनाचा अभाव
प्रभावी उपाय -
यावर कोणता उपाय केल्यास तो खूप प्रभावी ठरेल? पाहूया तो प्रभावी उपाय, ज्यामुळे मिरची पीक राहील उन्हामुळे सुरक्षित आणि जोमदार
ढोबळी मिरची पिकाला द्या उन्हापासून मजबूत संरक्षण – सिलिफ्लोरची ताकद!
“उन्हाचा तडाखा कमी, दर्जेदार फळांची वाढ जास्त – सिलिफ्लोर आहे खास!”
तीव्र उन्हामुळे ढोबळी मिरचीच्या फळांवर डाग आणि गुणवत्ता कमी होण्याची समस्या दिसतेय. अशा वेळी पिकाला मजबूत बनवण्यासाठी योग्य पोषण देणे खूप गरजेचे आहे.
सिलिफ्लोर (2% Orthosilicic Acid) चे फायदे -
👉🏻 पिकाची उष्णता व पर्यावरणीय ताण सहन करण्याची क्षमता वाढवते.
👉🏻 फळांची साल मजबूत करून सूर्यतापाचा परिणाम कमी करते
👉🏻 झाडाची एकूण वाढ आणि उत्पादन सुधारते
👉🏻 फळांचा दर्जा, चमक आणि टिकाऊपणा वाढवते
💧प्रमाण : 2 मिली/लिटर
तसेच आणखी काही नियंत्रण व प्रतिबंधक उपाय पाहूया -
👉🏻 पिकात नियमित व संतुलित सिंचन ठेवावे.
👉🏻 झाडावर पानांचे संरक्षण करावे, कारण पाने फळांना सावली देतात.
👉🏻 पिकात मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि पोटॅश योग्य प्रमाणात द्यावे.
👉🏻 शक्य असल्यास शेड नेट किंवा मल्चिंग वापरावे.
👉🏻 किड नियंत्रण वेळेवर करावे.
निष्कर्ष -
तीव्र उन्हामुळे ढोबळी मिरचीच्या फळांवर पडणारे डाग ही समस्या योग्य व्यवस्थापनाने टाळता येते. वेळेवर सिंचन, पोषण आणि किड नियंत्रण केल्यास उत्पादन आणि फळांची गुणवत्ता दोन्ही चांगली राहतात.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !

Comments
Post a Comment