शेतकरी मित्रांनो, आता खतांवरचा खर्च वाचवा - बायोनेक्सा ने पिकाला द्या पूर्ण पोषण!
शेतकरी मित्रांनो, आता खतांवरचा खर्च वाचवा - बायोनेक्सा ने पिकाला द्या पूर्ण पोषण!
नमस्कार शेतकरी मित्रांनो!
आपण आपल्या शेतात भरपूर खते टाकतो, विशेषतः डीएपी (DAP) आणि पोटॅश. पण तुम्हाला माहिती आहे का? आपण टाकलेल्या खतांपैकी मोठा हिस्सा जमिनीत 'फिक्स' होतो, म्हणजे तो पिकांना उपलब्धच होत नाही. परिणामी, खर्च वाढतो आणि जमिनीचा पोत बिघडतो.
यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे ' बायोनेक्सा'!
हे केवळ एक उत्पादन नसून तुमच्या पिकासाठी संजीवनी आहे. यात स्फुरद विरघळवणारे जीवाणू (PSB) आणि पालाश वहन करणारे जीवाणू (KMB) यांचे अत्यंत प्रभावी मिश्रण आहे. चला तर मग जाणून घेऊया, बायोनेक्सा तुमच्या शेतीसाठी कसा महत्वाचा ठरू शकतो.
👉🏻 बायोनेक्सा मधील मुख्य घटक काय आहेत?
बायोनेक्सा डेक्स्ट्रोज (Dextrose) स्वरूपातील दोन शक्तीशाली जीवाणूंचे मिश्रण आहे:
1. Phosphorus Solubilising Bacteria (PSB): जमिनीत स्थिर झालेला स्फुरद (Phosphorus) विरघळून तो पिकाच्या मुळांना शोषता येईल अशा स्वरूपात आणतो.
2. Potash Mobilizing Bacteria (KMB): जमिनीत साठलेला पालाश (Potash) गतिमान करून तो झाडांच्या गरजेनुसार उपलब्ध करून देतो.
बायोनेक्सा वापरण्याचे जबरदस्त फायदे पाहूया -
👉🏻 खतांच्या खर्चात बचत - जमिनीत पडून असलेले अन्नघटक उपलब्ध करून देत असल्यामुळे, रासायनिक खतांची गरज २०-३०% पर्यंत कमी होते.
👉🏻 पांढऱ्या मुळांची वाढ - यामुळे मुळांची वाढ जोमाने होते, परिणामी पीक अधिक सक्षम बनते.
👉🏻 जमिनीची सुपीकता - हे जीवाणू जमिनीचा सामू (pH) राखण्यास मदत करतात आणि जमीन भुसभुशीत ठेवतात.
👉🏻 फळांची गुणवत्ता: फळांचा आकार, चमक आणि गोडी वाढवण्यास मदत करते.
👉🏻 उत्पादनात वाढ - पिकाला वेळेवर पोषण मिळाल्याने फुलांची आणि फळांची संख्या वाढते, तसेच मालाचा दर्जा आणि वजन सुधारते. पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून उत्पादनात मोठी भर पडते.
👉🏻 नैसर्गिक आणि सुरक्षित: हे पूर्णपणे सेंद्रिय स्वरूपाचे असल्याने जमिनीला कोणताही अपाय होत नाही.
👉🏻 कोणत्या पिकांसाठी उपयुक्त?
बायोनेक्सा हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी वरदान आहे:
नगदी पिके: ऊस, कापूस, सोयाबीन, तूर.
फळबागा: द्राक्षे, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी.
भाजीपाला: टोमॅटो, मिरची, कांदा, आले, हळद.
वापरण्याचे प्रमाण आणि पद्धत -
ड्रीपद्वारे - 500 ग्रॅम प्रति एकर
निष्कर्ष:
आजच्या काळात शेती फायद्याची करायची असेल, तर केवळ खते टाकून चालणार नाही, तर ती पिकाला लागू होणे महत्त्वाचे आहे. बायोनेक्सा हेच उत्कृष्ट काम करते. कमी खर्चात जास्त आणि दर्जेदार उत्पादन हवे असेल, तर आपल्या शेतात आजच बायोनेक्सा चा वापर करा!
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !

Comments
Post a Comment