ऊस पिकात 'NPK Consortia' चा वापर - खर्चात मोठी बचत आणि विक्रमी उत्पादन!

ऊस पिकात 'NPK Consortia' चा वापर - खर्चात मोठी बचत आणि विक्रमी उत्पादन!


​नमस्कार शेतकरी मित्रांनो!

​आजच्या आधुनिक शेतीत रासायनिक खतांचा अतिवापर होत आहे. यामुळे जमिनीचा पोत बिघडत असून शेतीचा खर्चही वाढत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणजे NPK Consortia 

ऊस पिकात NPK Consortia चा वापर म्हणजे "कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे 'महा-जीवाणू' खत!"

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या जमिनीचा पोत खालावणे आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे चिंतेत आहेत. अशा वेळी NPK Consortia (जैव खत कन्सोर्टिया) हे उसाच्या भरघोस वाढीसाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहे.

ऊस पिकासाठी NPK Consortia का आवश्यक आहे?

​ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशची गरज असते. बऱ्याचदा आपण दिलेली रासायनिक खते मातीत स्थिर (Fix) होतात आणि उसाच्या मुळांना मिळत नाहीत. NPK कन्सोर्टियातील जीवाणू ही स्थिर झालेली खते विरघळवून ती ऊसाला उपलब्ध करून देतात.


NPK Consortia म्हणजे काय?

​NPK कन्सोर्टिया म्हणजे नत्र (Nitrogen), स्फुरद (Phosphorus) आणि पालाश (Potassium) उपलब्ध करून देणाऱ्या विविध उपयुक्त जीवाणूंचे एकत्रित मिश्रण.

​नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू (Azotobacter/Rhizobium): हवेतील नत्र शोषून पिकांना देतात.

​स्फुरद विरघळवणारे जीवाणू (PSB): जमिनीत स्थिर असलेला स्फुरद पिकांना उपलब्ध करून देतात.

​पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू (KMB): मातीतील पालाश विरघळवून मुळांपर्यंत पोहोचवतात.

NPK Consortia मुळे ऊस पिकाला होणारे फायदे - 

​कांडीची लांबी आणि जाडी: नत्र स्थिरीकरणामुळे उसाची वाढ जोमाने होते, तर पालाशमुळे उसाच्या कांडीची जाडी आणि वजन वाढते.

​साखरेचे प्रमाण (Recovery): पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंमुळे उसातील साखरेचे प्रमाण सुधारण्यास मदत होते.

​पांढऱ्या मुळांची वाढ: कन्सोर्टियामुळे जमिनीतील सेंद्रिय हालचाली वाढतात, ज्यामुळे उसाच्या पांढऱ्या मुळांचा जाळा विस्तारतो.

​रासायनिक खतांची ३०% बचत - जर तुम्ही एकरी ५ पोती खत टाकत असाल, तर कन्सोर्टियाच्या वापरामुळे तुम्ही ते प्रमाण कमी करूनही जास्त उत्पादन घेऊ शकता.

​खोडवा शेतीसाठी उत्तम: खोडवा ऊसामध्ये पाचट कुजवण्यासाठी आणि जमिनीतील कडकपणा कमी करण्यासाठी हे जीवाणू अत्यंत उपयुक्त ठरतात.


ऊस पिकामध्ये होणारे प्रमुख फायदे - 

🌱 मुळांची वाढ मजबूत होऊन अन्नद्रव्यांचे शोषण वाढते

🔬 जमिनीतील सूक्ष्मजीव क्रियाशीलता वाढते व मातीचे आरोग्य सुधारते

📈 उसाची उंची, जाडी व वजन वाढण्यास मदत

🍬 साखरेचे प्रमाण आणि एकूण उत्पादन वाढवण्यास सहाय्य

💧 ड्रिपद्वारे वापरल्यास अन्नद्रव्यांची कार्यक्षमता अधिक वाढते


डोस: 200 ग्रॅम प्रति एकर


ऊस पिकासाठी -  NPK कन्सोर्टिया प्रामुख्याने ३ वेळेस वापरणे फायदेशीर ठरते:

​लागवडीच्या वेळी: बेणे प्रक्रिया करताना किंवा लागणीनंतर पहिल्या पाण्यासोबत.

​मोठी बांधणी (Big Earthing up): उसाची मोठी बांधणी करताना खतांसोबत किंवा ड्रीपमधून.

​खोडवा व्यवस्थापन: खोडवा छाटल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्यासोबत.


NPK कन्सोर्टिया ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - 

https://krishibazaar.in/product/tiron-npk-consortia


​निष्कर्ष

​उसाचे एकरी १०० टनाचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर फक्त रासायनिक खतांवर अवलंबून न राहता NPK Consortia सारख्या जैविक पर्यायांची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा खर्च कमी होईल आणि जमिनीची सुपीकता पिढ्यानपिढ्या टिकून राहील.



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 


 📱- 7757092091


धन्यवाद !   

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !