Posts

Showing posts from December, 2025

खरबूज व टरबूज पिकात होणाऱ्या “क्रॅकिंग” (फळ फुटणे) या समस्सेवर प्रभावी उपाय!

Image
 " खरबूज व टरबूज पिकात होणाऱ्या “क्रॅकिंग” (फळ फुटणे) या समस्सेवर प्रभावी उपाय" नमस्कार शेतकरी मित्रांनो,  खरबूज व टरबूज ही जास्त मागणी असलेली नगदी पिके आहेत. परंतु फळ वाढीच्या टप्प्यात फळ फुटणे (Cracking) ही मोठी समस्या अनेक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. क्रॅकिंग झाल्यास फळाची गुणवत्ता घसरते, बाजारभाव कमी मिळतो आणि उत्पादनात मोठे नुकसान होते. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ फळ क्रॅकिंग म्हणजे काय? - फळाच्या सालीवर आडवे किंवा उभे तडे जाणे, फळ फुटणे किंवा आतपर्यंत क्रॅक जाणे यालाच क्रॅकिंग म्हणतात. क्रॅकिंग होण्याची प्रमुख कारणे कोणती ? 1. पाण्याचे असंतुलित व्यवस्थापन - जास्त काळ पाणी न दिल्यानंतर अचानक जास्त पाणी देणे - फळाच्या आतला गर झपाट्याने वाढतो, पण साल ताण सहन करू शकत नाही 2. तापमानातील अचानक बदल - जास्त उष्णतेनंतर थंड हवामान किंवा पाऊस - दिवस–रात्र तापमानात मोठा फरक ➡️ फळाच्या पेशींवर ताण येतो 3. कॅल्शियम व बोरॉनची कमतरता - कॅल्शियम कमी असल्यास फळाची साल कमकुवत होते - बोरॉनच्या कमतरते...

वाढत्या थंडीचा द्राक्ष, टोमॅटो, कांदा तसेच इतर भाजीपाला व फळ पिकांना बसतोय फटका ? मिळवा प्रभावी उपाय!

Image
वाढत्या थंडीचा द्राक्ष, टोमॅटो, कांदा तसेच इतर भाजीपाला व फळ पिकांना बसतोय फटका ? मिळवा प्रभावी उपाय! नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिवाळ्याचे दिवस सुरू होताच वातावरणातील तापमान झपाट्याने घटते. वाढती थंडी ही द्राक्ष, टोमॅटो व कांदा यांसारख्या संवेदनशील पिकांसाठी मोठे आव्हान ठरते. योग्य वेळी उपाय न केल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. म्हणूनच थंडीचा पिकांवर होणारा परिणाम समजून घेणे व वेळीच व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण माहिती घेणार आहोत ती अति थंडीमुळे पिकांवर होणारे परिणाम आणि यावर प्रभावी असा उपाय ! ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- थंडीचा पिकांवर होणारा परिणाम कसा होतो? - थंडीमध्ये पिकांच्या शारीरिक (Physiological) क्रिया मंदावतात - मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते - प्रकाशसंश्लेषणाची गती घटते - याचा थेट परिणाम वाढ, फुलधारणा व उत्पादनावर होतो. थंडीमुळे दिसणारी प्रमुख लक्षणे -  1️⃣ झाड करपणे (Leaf Burn / Scorching) - पानांच्या कडा व टोकांपासून करपणे - पाने कोरडी, न...

"पिकांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम चा नवा आधार कॅल्शियम, झिंक व बोरॉनची ताकद देणार परिपूर्ण पोषण आणि भरगोस उत्पादन !"

Image
"पिकांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम चा नवा आधार कॅल्शियम, झिंक व बोरॉनची ताकद देणार परिपूर्ण पोषण आणि भरगोस उत्पादन !" “रिच-कॅल-21 : कॅल्शियम, झिंक व बोरॉनची ताकद – पिकांची मजबुती आणि उत्पादनवाढीचा खात्रीशीर मार्ग” नमस्कार शेतकरी बंधूंनो,  आजच्या आधुनिक शेतीत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता ही उत्पादन घटण्याचे मुख्य कारण बनत आहे. विशेषतः कॅल्शियम, झिंक आणि बोरॉन या अन्नद्रव्यांचा अभाव असल्यास फुलगळ, फळगळ, पोकळ फळे व दर्जाहीन उत्पादन दिसून येते. शेतकरी यावर उपाय म्हणून अनेक उत्पादने वापरतात व खर्च वाढवून घेतात. परंतु योग्य उत्पादनाच्या मदतीने यावरील खर्च कमी होतो आणि उत्पादन देखील वाढते.  👉 यासाठी रिच-कॅल-21 (Calcium Fortified with Zinc and Boron) हे संतुलित व प्रभावी द्रवरूप खत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. 🧪 रिच-कॅल-21 काय आहे ? रिच-कॅल-21 हे कॅल्शियम समृद्ध खत असून त्यामध्ये झिंक व बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिसळलेले आहेत. हे फवारणीद्वारे (Foliar Spray) तसेच ड्रीप द्वारे (Drip Application) दिले जाते, त्यामुळे अन्नद्रव्ये थेट पिकांपर्यंत पोहोचून...

"टरबूज-खरबूज पिकात होणाऱ्या मर रोगावर उपाय शोधताय ? चला जाणून घ्या खास उपाय!"

Image
 "टरबूज-खरबूज पिकात होणाऱ्या मर रोगावर उपाय शोधताय ? चला जाणून घ्या खास उपाय!" नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये सध्या विविध भागांमध्ये टरबूज-खरबूज पिकाची चांगल्या प्रकारे लागवड झालेली दिसते. नियोजन अगदी व्यवस्थित असेल तर आपण जास्तीत जास्त उत्पादन देखील आपण घेऊ शकतो, परंतु नियोजन करत असताना बदलत्या वातावरणामुळे पिकामध्ये विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसतो, आणि वाढ देखील व्यवस्थित होत नाहीत त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.  टरबूज-खरबूज पिकामध्ये रोपांची लागवड झाल्यानंतर आळवणीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जेणेकरून पिकामध्ये येणाऱ्या मर रोगावर नियंत्रण मिळून सफेद मुळीच्या सर्वोत्तम वाढीसाठी मदत होते. यासाठी जाणून घेऊया एक खास आळवणी ती ठरेल अगदी फायदेशीर!" “मुळं मजबूत, मर रोगाला रोख!" टरबूज-खरबूज पिकात सेन्टिनेल म्हणजे पिकाचा खरा संरक्षक!” “निरोगी मुळे, भरघोस फळे सेन्टिनेल दिल्यास पिक अधिक  फुले!" ✨ मर रोगाची लक्षणे - 👉🏻 पिकाच्या रोपावस्थेत आणि मुख्य पिक अश्या दोन्ही अवस्थेत मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.  👉🏻 मर रोगाच्या प्रादुर्भावान...

"आंबा पिकात मोहोर काळातील रोग-किड नियंत्रण व उत्तम सेटिंगसाठी प्रभावी अशी त्रिसूत्री"!

Image
  "आंबा पिकात मोहोर काळातील रोग-किड नियंत्रण व उत्तम सेटिंगसाठी प्रभावी अशी त्रिसूत्री"! नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंबा उत्पादनामध्ये मोहोर येण्याचा काळ हा अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. या कालावधीत पिकाची योग्य काळजी घेतल्यास मोहोर टिकून राहतो आणि फळधारणा चांगली होते. परंतु याच वेळी विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी पुढील उपाययोजना करणे उपयुक्त ठरते.  आज आपण या लेखाच्या माध्यमातून आंबा पिकामध्ये मोहोर कधी येतो? तसेच हा मोहोर गळ होण्याची प्रमुख कारणे तसेच उद्भवणारे रोग व किडी कोणती आहेत याबाबत जाणून घेणार आहोत.  ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आंब्याला मोहोर नेमका कधी येतो? तर खास करून महाराष्ट्रामध्ये आंब्याला डिसेंबर ते जानेवारी दरम्यान मोहोर येण्यास सुरुवात होते.  आंब्याच्या मोहोर वरती कोणते रोग येतात?  आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आंब्याचे आपल्याला दोन प्रदेश दिसून येतात. आणि ते म्हणजे कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र....