वाढत्या थंडीचा द्राक्ष, टोमॅटो, कांदा तसेच इतर भाजीपाला व फळ पिकांना बसतोय फटका ? मिळवा प्रभावी उपाय!

वाढत्या थंडीचा द्राक्ष, टोमॅटो, कांदा तसेच इतर भाजीपाला व फळ पिकांना बसतोय फटका ? मिळवा प्रभावी उपाय!




नमस्कार शेतकरी मित्रांनो,

हिवाळ्याचे दिवस सुरू होताच वातावरणातील तापमान झपाट्याने घटते. वाढती थंडी ही द्राक्ष, टोमॅटो व कांदा यांसारख्या संवेदनशील पिकांसाठी मोठे आव्हान ठरते. योग्य वेळी उपाय न केल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. म्हणूनच थंडीचा पिकांवर होणारा परिणाम समजून घेणे व वेळीच व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.

आजच्या ब्लॉग मध्ये आपण माहिती घेणार आहोत ती अति थंडीमुळे पिकांवर होणारे परिणाम आणि यावर प्रभावी असा उपाय !

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

थंडीचा पिकांवर होणारा परिणाम कसा होतो?

- थंडीमध्ये पिकांच्या शारीरिक (Physiological) क्रिया मंदावतात

- मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते

- प्रकाशसंश्लेषणाची गती घटते

- याचा थेट परिणाम वाढ, फुलधारणा व उत्पादनावर होतो.


थंडीमुळे दिसणारी प्रमुख लक्षणे - 

1️⃣ झाड करपणे (Leaf Burn / Scorching)

- पानांच्या कडा व टोकांपासून करपणे

- पाने कोरडी, निस्तेज दिसणे

- द्राक्षात कोवळ्या पानांवर जास्त परिणाम


2️⃣ वाढ खुंटणे

- नवीन फुटवे येणे बंद होणे

- शेंड्याची वाढ थांबणे

- पाने गुंडाळली जाणे 

- झाड बुटके राहणे (विशेषतः टोमॅटो व कांदा)


3️⃣ फुलगळ

- फुलधारणा कमी होणे

- आलेली फुले गळून पडणे

- फळधारणा व कांद्याचा गड्डा तयार होण्यावर विपरीत परिणाम


4️⃣ कीड व रोगांचा प्रादुर्भाव

- थंडीमुळे झाडांची प्रतिकारशक्ती कमी होते

- करपा, डाऊनी मिल्ड्यू, पर्पल ब्लॉच, थ्रिप्स, मावा यांचा प्रादुर्भाव वाढतो

- रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरतो. 


पिकानुसार थंडीचा परिणाम - 

🔹 द्राक्ष

- पाने जळल्यासारखी दिसणे

- घडांची वाढ मंदावणे

- मण्यांचा आकार लहान राहणे


🔹 टोमॅटो

- पाने गुंडाळली जाणे

- जांभळट/पिवळसर रंग येणे

-फुले गळणे, फळधारणा कमी होणे


🔹 कांदा

- पानांचा रंग फिका पडणे

- वाढ खुंटणे

- गड्ड्याचा आकार लहान राहणे


थंडीपासून संरक्षणासाठी प्रभावी उपाय


अशा परिस्थितीत वापरा टिरॉन नुट्रीशन प्रा. लि चे पोषक किट 


पोषक किट कसे आणि का उपयुक्त ठरते? 👍🏻🌱

♻️ पोषक किट मधील घटकांचे कार्य - 


👉🏻 NPK Consortia

थंडीतही कार्यक्षम असणारे विविध बॅक्टेरियांचे समूह मुळांच्या आसपास (Rhizosphere) सूक्ष्म वातावरण सुधारतात.

नायट्रोजन स्थिरीकरण व उपलब्धता वाढवतात.


👉🏻 Phosphorus Solubilising Bacteria (PSB)

थंडीमुळे बांधलेल्या (Fixed) फॉस्फरसला उपलब्ध (Available) स्वरूपात रूपांतर

त्यामुळे

- पानांचा जांभळेपणा कमी होतो

- मुळांची ऊर्जा वाढते


👉🏻 Mycorrhiza

थंडीच्या काळात सर्वात महत्त्वाचा घटक

मुळांपेक्षा 10–15 पट जास्त क्षेत्रातून

- पाणी व अन्नद्रव्य शोषण करते

फॉस्फरस, झिंक, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अपटेक सुधारते

मुळांची कार्यक्षमता वाढवते.


👉🏻 Zinc Solubilising Bacteria

मातीतील अनुपलब्ध झिंक उपलब्ध करून देते

त्यामुळे

- पाने वर वळणे कमी होते

- एन्झाईम अ‍ॅक्टिव्हिटी सुरू होते

- नवीन वाढ दिसू लागते


👉🏻 पामेला (Seaweed Extract)

नैसर्गिक Anti-stress बायोस्टिम्युलंट

थंडीमुळे आलेला

- Physiological stress कमी करते 

मुळांची व पानांची क्रिया पुन्हा सुरू करते 


मग थंडीच्या हंगामात Poshak Kit शिफारस करावी का?

होय नक्कीच कारण 


👉🏻 हे Root activity वाढवणारे किट आहे.

👉🏻 थंडीमुळे बंद पडलेली मुळांची क्रिया, अन्नद्रव्यांचे शोषण, सूक्ष्मजीवांची हालचाल पुन्हा सुरू करते

👉🏻 केमिकल खतांपेक्षा जास्त सुरक्षित व प्रभावी


💧प्रमाण-

ड्रिपद्वारे - 1 किट/एकर 



ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - 

https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit


निष्कर्ष - 

वाढती थंडी ही द्राक्ष, टोमॅटो व कांदा तसेच इतर भाजीपाला व फळ पिकांसाठी धोका असतो. वेळेवर लक्षणे ओळखून योग्य पोषण व व्यवस्थापन केल्यास झाडांची वाढ सुरळीत राहते

फुलगळ कमी होते

उत्पादन व गुणवत्ता टिकून राहते. 




आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091


Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !