खरबूज व टरबूज पिकात होणाऱ्या “क्रॅकिंग” (फळ फुटणे) या समस्सेवर प्रभावी उपाय!
"खरबूज व टरबूज पिकात होणाऱ्या “क्रॅकिंग” (फळ फुटणे) या समस्सेवर प्रभावी उपाय"
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
खरबूज व टरबूज ही जास्त मागणी असलेली नगदी पिके आहेत. परंतु फळ वाढीच्या टप्प्यात फळ फुटणे (Cracking) ही मोठी समस्या अनेक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. क्रॅकिंग झाल्यास फळाची गुणवत्ता घसरते, बाजारभाव कमी मिळतो आणि उत्पादनात मोठे नुकसान होते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
फळ क्रॅकिंग म्हणजे काय?
- फळाच्या सालीवर आडवे किंवा उभे तडे जाणे, फळ फुटणे किंवा आतपर्यंत क्रॅक जाणे यालाच क्रॅकिंग म्हणतात.
क्रॅकिंग होण्याची प्रमुख कारणे कोणती ?
1. पाण्याचे असंतुलित व्यवस्थापन
- जास्त काळ पाणी न दिल्यानंतर अचानक जास्त पाणी देणे
- फळाच्या आतला गर झपाट्याने वाढतो, पण साल ताण सहन करू शकत नाही
2. तापमानातील अचानक बदल
- जास्त उष्णतेनंतर थंड हवामान किंवा पाऊस
- दिवस–रात्र तापमानात मोठा फरक
➡️ फळाच्या पेशींवर ताण येतो
3. कॅल्शियम व बोरॉनची कमतरता
- कॅल्शियम कमी असल्यास फळाची साल कमकुवत होते
- बोरॉनच्या कमतरतेमुळे पेशींची लवचिकता कमी होते
4. फळधारणेनंतर योग्य अन्नद्रव्ये न मिळणे
✅ क्रॅकिंग टाळण्यासाठी प्रभावी उपाय -
1. पाणी व्यवस्थापन योग्य ठेवा
ड्रिपद्वारे थोडे–थोडे पण नियमित पाणी द्या
फळ वाढीच्या टप्प्यात अचानक जास्त पाणी देऊ नका
2. संतुलित खत व्यवस्थापन
- कॅल्शियम व बोरॉनची पूर्तता
- फळाची साल मजबूत होते व क्रॅकिंग कमी होते
खरबूज पिकात क्रकिंग ची समस्या दिसतेय?
फळ तडकले आहेत का?
यासाठी प्रभावी पर्याय 👉🏻 टिरॉन न्यूट्रिशन चे पोषक किट
ड्रिप द्वारे देण्यात 👉🏻 पोषक किट
फवारणी द्वारे 👉🏻 कॅलबॉर्न
♻️ फायदे -
👉🏻 थंडीच्या दिवसांत पिकास अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होतो.
👉🏻 फळ तडकण्यापासून वाचते.
👉🏻 दिलेल्या खतांचा अपटेक वाढतो.
💧प्रमाण -
▫️पोषक किट 👉🏻 ड्रिप द्वारे - 1 किट/एकर
▫️कॅलबॉर्न 👉🏻 फवारणी द्वारे - 2 मिली/लिटर
निष्कर्ष -
खरबूज व टरबूज पिकात क्रॅकिंग ही समस्या योग्य पाणी, संतुलित खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणात टाळता येते. वेळेवर उपाय केल्यास फळांची गुणवत्ता सुधारते, उत्पादन वाढते आणि चांगला बाजारभाव मिळतो.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
.png)
Comments
Post a Comment