बटाटा पिकात "सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन म्हणजे — उच्च उत्पादनाची गुरुकिल्ली!”
बटाटा पिकात "सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन म्हणजे — उच्च उत्पादनाची गुरुकिल्ली!” नमस्कार शेतकरी मित्रांनो, बटाटा हे आपल्या देशातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि उत्पन्न देणारे भाजीपाला पीक आहे. उच्च उत्पादनासाठी मातीतील पोषणतत्वांचे संतुलन असणे हे फार आवश्यक असते. बहुतांश वेळा आपण फक्त नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम (NPK) या प्रमुख अन्नद्रव्यांवर लक्ष केंद्रित करतो; परंतु सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात न घेतल्यास बटाटा पिकाची योग्य वाढ, दर्जा आणि उत्पादनावर मोठा परिणाम होतो. 👉 “संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे — उच्च उत्पादनाची गुरुकिल्ली!” सर्वप्रथम पाहूया, सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे काय? सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे अशी तत्वे जी पिकांना अत्यल्प प्रमाणात लागतात, पण त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. त्यात मुख्यतः — लोखंड (Fe), मॅंगनीज (Mn), झिंक (Zn), तांबे (Cu), बोरॉन (B), मॉलिब्डेनम (Mo) यांचा समावेश होतो. बटाटा पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य पाहूया - लोह (Fe) - क्लोरोफिल निर्मितीसाठी आवश्यक. कमतरतेची लक्षणे - पाने पिवळी पडणे, पण शिरा ह...