अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेत “फुटवा कमी? चिंता नको ! योग्य पोषण आणि व्यवस्थापनाने बाग पुन्हा फुलवा!"
अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेत “फुटवा कमी? चिंता नको ! योग्य पोषण आणि व्यवस्थापनाने बाग पुन्हा फुलवा!"
नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो,
सध्या अनेक द्राक्ष उत्पादकांना अतिवृष्टीमुळे बाग फुटण्यात अडचणी येत आहेत, यामुळे बरेच शेतकरी चिंतेत दिसत आहेत, परंतु काळजी करू नका योग्य पोषण आणि व्यवस्थापन करून द्राक्ष बाग पुन्हा एकदा नव्याने फुलवा!"
अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ऑक्टोबर छाटणी नंतर अपेक्षित प्रमाणात फुटवा येत नाही, नवीन कोंब कमजोर पडतात आणि उत्पादनावर थेट परिणाम दिसतो. चला पाहूया या समस्येची कारणं, परिणाम आणि त्यावरचे प्रभावी उपाय कोणते ?
♻️अडचणीची प्रमुख कारणे:
- जमिनीत पाण्याचा अतिरेक - सततच्या पावसामुळे मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो, परिणामी फुटवा आणि वाढ खुंटते.
- मुळांची सड (Root Rot)- ओलसर जमिनीत बुरशीजन्य रोग वाढतात, ज्यामुळे मुळांचे नुकसान होते.
- अन्नद्रव्य शोषणात घट- पाण्याचा अतिरेक झाल्याने झाडांची पोषण घेण्याची क्षमता कमी होते.
- फुटव्यावर काळोखी येण्यास अडचण व पानगळ- जास्त आर्द्रतेमुळे पानांवर व फुटव्यांवर काळोखी दिसत नाही, तसेच पानांची गळ होते.
♻️ सिंचन व्यवस्थापन
- छाटणीनंतर लगेच मातीतील ओलावा राखण्यासाठी हलके पाणी द्यावे.
- नवीन फुटवे बाहेर पडायला लागल्यावर पाणी हळूहळू वाढवावे.
- पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे; जास्त पाणी दिल्यास मुळांवर कुज येऊ शकते.
- पाणी निचरा व्यवस्थापन: बागेत पाणी साचणार नाही यासाठी सखल भागात निचऱ्याची व्यवस्था करावी.
♻️ यावर प्रभावी उपाय -
👉🏻 अमिनो गोल्ड / अमिनोसान — नवीन फुटव्यांची एकसमान वाढ व हिरवीगार पाने.
👉🏻 रोबुस्टा DF — छाटणीनंतर झाडाला उर्जेचा पुरवठा व अन्नद्रव्य शोषण सुधारते. सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micronutrients)
झिंक, आयर्न, मँगनीज, बोरॉन यांची कमतरता छाटणीनंतर सर्वसाधारणपणे दिसते. रोबुस्टा DF हे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
👉🏻 अल्बेरो — घड जिरू नये, घड मजबूत व दीर्घकाळ टिकण्यासाठी उपयुक्त.
👉🏻 पामेला — पाकळ्यांची साईज, घडाचा दर्जा आणि पानांवर काळोखी कमी करण्यासाठी उपयुक्त.
👉🏻 अमिनो ऍसिड / अमिनो गोल्ड फवारणी - झाडाला पुनरुज्जीवन देण्यासाठी आणि फुटवा, शेंडा वाढीसाठी प्रभावी ठरते.
♻️जैविक खतांचा वापर अत्यंत फायदेशीर -
टिरॉन नुट्रीशन ची दर्जेदार अशी जैविक खते, ज्यांचा वापर ठरले एक "भरगोस उत्पादनाची पायाभरणी!"
👉🏻 पोषक किट - एकसमान सक्षम व निरोगी द्राक्ष घडाची निर्मिती, पांढऱ्या मुळांचा विस्तार वाढतो.
- बागेतील बेड हे नरम भुसभुशीत होतात, त्यामुळे हवा खेळती राहते.
👉🏻 NPK Consortia, Phosphorus Solubilising Bacteria (PSB) आणि Potash Mobilizing Bacteria (KMB) यांचा वापर करून जमिनीतील पोषक द्रव्यांचे शोषण वाढते.
👉🏻 रॉयल पी {Phosphorus Solubilising Bacteria (PSB)}
👉🏻 रॉयल के {Potash Mobilizing Bacteria (KMB)}
👉🏻 सार्थ Mycorrhiza वापरल्यास मुळांची वाढ चांगली होते व झाडाला कोरड्या वातावरणातही झाडाला अन्नद्रव्ये मिळतात.
- जमिनीतील सूक्ष्मजीव वाढीस चालना देऊन मुळांची ताकद वाढवतात.
दर्जेदार व प्रभावी अशी उत्पादने ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी -
- https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit
🍇 निष्कर्ष -
अतिवृष्टी थांबवणे आपल्या हातात नाही, पण त्यामुळे होणारे परिणाम कमी करणे नक्की शक्य आहे. योग्य वेळी योग्य उपाय केल्यास फुटवा पुन्हा वाढू शकतो आणि उत्पादन टिकवता येते. नियमित निरीक्षण, संतुलित पोषण आणि सेंद्रिय व्यवस्थापन हीच खरी गुरुकिल्ली आहे.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !


Comments
Post a Comment