बटाटा पिकात "सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन म्हणजे — उच्च उत्पादनाची गुरुकिल्ली!”
बटाटा पिकात "सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन म्हणजे — उच्च उत्पादनाची गुरुकिल्ली!”
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
बटाटा हे आपल्या देशातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि उत्पन्न देणारे भाजीपाला पीक आहे. उच्च उत्पादनासाठी मातीतील पोषणतत्वांचे संतुलन असणे हे फार आवश्यक असते. बहुतांश वेळा आपण फक्त नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम (NPK) या प्रमुख अन्नद्रव्यांवर लक्ष केंद्रित करतो; परंतु सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात न घेतल्यास बटाटा पिकाची योग्य वाढ, दर्जा आणि उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
👉 “संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे — उच्च उत्पादनाची गुरुकिल्ली!”
सर्वप्रथम पाहूया, सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे काय?
सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे अशी तत्वे जी पिकांना अत्यल्प प्रमाणात लागतात, पण त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. त्यात मुख्यतः —
लोखंड (Fe), मॅंगनीज (Mn), झिंक (Zn), तांबे (Cu), बोरॉन (B), मॉलिब्डेनम (Mo) यांचा समावेश होतो.
बटाटा पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य पाहूया -
लोह (Fe) - क्लोरोफिल निर्मितीसाठी आवश्यक.
कमतरतेची लक्षणे - पाने पिवळी पडणे, पण शिरा हिरव्या राहतात.
झिंक (Zn) - वाढीचे हार्मोन्स तयार होण्यासाठी मदत.
कमतरतेची लक्षणे - वाढ खुंटते, पाने लहान व विकृत दिसतात.
मॅंगनीज (Mn) - प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत मदत.
कमतरतेची लक्षणे - पानांवर फिकट पिवळसर डाग पडतात.
बोरॉन (B) - गाठी व कंद निर्मितीत महत्त्वाची भूमिका.
कमतरतेची लक्षणे - कंद फाटणे, विकृत आकाराचे होणे.
तांबे (Cu) - रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
कमतरतेची लक्षणे - शेंडा सुकणे, वाढ थांबणे.
मॉलिब्डेनम (Mo) - नायट्रोजनचे शोषण व वापर सुलभ करते.
कमतरतेची लक्षणे - पानांचा रंग फिका होणे, वाढ मंदावणे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची प्रमुख कारणे कोणती ?
जास्त रासायनिक खतांचा एकाच प्रकारे वापर.
सेंद्रिय खतांचा अभाव.
अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पोषणतत्वांचे धुपणे.
मातीचा pH वाढणे (क्षारीय माती).
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर न होणे.
💧 व्यवस्थापन व उपाययोजना
माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावे.
मायक्रोन्युट्रिएंट मिश्र उत्पादने (उदा. Fe, Zn, B यांचे मिश्र फॉलिअर स्प्रे) फवारणी करावी किंवा ड्रीपद्वारे सोडावे.
सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा, कारण ते सूक्ष्म अन्नद्रव्यांचे स्त्रोत आहेत.
ड्रिपद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये देणे फायदेशीर ठरते.
आता आपण पाहूया, बटाटा पिकासाठी देण्यात येणारे 👉🏻 सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अद्वितीय असे मिश्रण 👉🏻 रोबस्टा डीएफ!
बटाटा पिकासाठी उपयुक्त असलेले व अत्यंत फायदेशीर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अद्वितीय असे मिश्रण 👉🏻 रोबस्टा डीएफ
जे पिकांची अन्न द्रव्यांची कमतरता नाहीशी करते, व पिकांस देते उत्तम पोषण!
🔹 रोबस्टा डीएफ वापरण्याचे फायदे -
✅ बटाटा पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
✅ पिकाला संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करून देते.
✅ पिकांस लवकर उपलब्ध होऊन पिकांची उत्कृष्ट वाढ होते.
✅ दर्जेदार उत्पादन मिळते.
🔹 रोबस्टा डीएफ वापरण्याचे प्रमाण -
➖ ड्रिप द्वारे - 5 लिटर/एकर
रोबस्टा डीएफ ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी -
https://krishibazaar.in/product/tiron-robustadf
निष्कर्ष -
सूक्ष्म अन्नद्रव्यांची योग्य प्रमाणात उपलब्धता ही बटाटा पिकाच्या दर्जेदार आणि जास्त उत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन स्वीकारले, तर केवळ उत्पादनच नव्हे तर कंदांचा दर्जाही सुधारेल.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !

.jpg)
Comments
Post a Comment