"तूर पिकाची उत्पादकता वाढीसाठी महत्वाची गुरुकिल्ली!"
"तूर पिकाची उत्पादकता वाढीसाठी महत्वाची गुरुकिल्ली!"
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
भारतामध्ये तूर (तूर डाळ) हे एक अत्यंत महत्वाचे डाळीचे पीक आहे. शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन आणि दर्जेदार दाणे मिळवण्यासाठी योग्य शेती व्यवस्थापन आवश्यक असते. चला तर पाहूया, तूर उत्पादकता वाढवण्यासाठी कोणत्या बाबींवर विशेष लक्ष द्यावे लागते.
तूर पिकातील उत्पादन वाढवायचे असल्यास — योग्य वाण, बियाणे प्रक्रिया, संतुलित पोषण, आणि जैविक उपायांचा समावेश असलेले एकत्रित शेती व्यवस्थापन अवलंबणे अत्यंत आवश्यक आहे.
जमिनीत सेंद्रिय पदार्थ आणि जैविक जिवाणू खतांचा समावेश हा भविष्यातील शाश्वत शेतीचा पाया आहे.
तूर पिकातून चांगले उत्पादन घेण्यासाठी फक्त बी टाकणे पुरेसे नसते. योग्य व्यवस्थापन केल्यास दुप्पट उत्पादन मिळू शकते. पाहूया त्या ५ महत्वाच्या टिप्स.
1️⃣ उत्तम दर्जाचं बी आणि बीजप्रक्रिया
- नेहमी जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींचं प्रमाणित बीज वापरा (उदा. BDN-708, BSMR-736).
- लागवडीपूर्वी बीजावर Rhizobium आणि PSB जैवखत लावल्यास मुळांची वाढ चांगली होते व नत्र, फॉस्फरसचे शोषण वाढते.
- यामुळे पिकाची सुरुवात मजबुतीने होते आणि उत्पादनात १५–२०% वाढ होते.
2️⃣ योग्य वेळेवर लागवड आणि संतुलित खत व्यवस्थापन
- वेळेत पेरणी केल्यास फुलोरा आणि शेंगा भरताना पावसाचे लाभदायक प्रमाण मिळते.
- सेंद्रिय खत + नत्र, फॉस्फरस आणि पोटॅश संतुलित प्रमाणात दिल्यास उत्पादन लक्षणीय वाढते.
3️⃣ तण आणि कीड नियंत्रण वेळेवर करा
- २०–२५ दिवसांनी तणनियंत्रण न केल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.
- फुलकिडे, शेंगा छिद्रक, पांढरी माशी दिसल्यास तात्काळ जैविक कीटकनाशक वापरा.
- नियमित निरीक्षण ठेवा — नुकसान होण्यापूर्वी उपाय केल्यास उत्पादन वाचते.
4️⃣ फुलोऱ्याच्या वेळी हलकं सिंचन आणि पोषणपूरक फवारणी
- तूर कोरडवाहू पिक असलं तरी फुलोरा व शेंगा भरण्याच्या वेळी एक ते दोन वेळा हलकं पाणी दिल्यास फुलगळ कमी होते.
5️⃣ योग्य वेळी काढणी आणि शेंगा मळणी
- शेंगा तपकिरी आणि पिक पिवळसर झालं की लगेच काढणी करा.
- उशीर केल्यास शेंगा फुटतात आणि डाळ गळून नुकसान होतं.
- व्यवस्थित वाळवून मळणी केली तर दाण्यांची गुणवत्ता आणि बाजारभाव दोन्ही चांगले मिळतात.
तसेच,
तूर पिकात दरवर्षी Mycorrhiza किंवा जैवखते वापरल्यास जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय होतात,
मुळे जास्त खोल जातात आणि पुढील हंगामातही उत्पादन सातत्याने वाढतं!
शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूया, खरी उत्पनाची गुरुकिल्ली!"
अशी घ्या तूर पिकात पहिली फवारणी आणि सुरू करा एक यशस्वी सुरुवात!"
👉🏻 सुरक्षा-40 + हल्क + कॅलबॉर्न
♻️ फवारणीचे फायदे-
👉🏻 सुरक्षा-40 - डाऊनी, भूरी, करपा रोगावर वेळीच व प्रभावी नियंत्रण
👉🏻 हल्क - अधिक फुलकळी लागण्यासाठी, सेटिंग चांगली होण्यासाठी
👉🏻 कॅलबॉर्न - धुळीमुळे होणारी फुलगळ रोखण्यासाठी
💧प्रमाण -
प्रत्येकी 2 मिली/लिटर याप्रमाणे
तूर पिकासाठी "प्रणिल ऍग्री च्या संतुलित खतांचा पुरवठा म्हणजे भरगोस उत्पनाची गुरुकिल्ली!" 🌿
दुसरी फवारणी 👉🏻 योग्य उत्पादनांच्या वापराने तूर पिक अधिक फुलवा!
♻️ फुलगळ तसेच शेंगांची होणारी गळ आता त्वरित रोखा!
👉🏻 कॅलबॉर्न
प्रमाण - 2 मिली/लिटर
♻️ धुईपासून पिकाचे संरक्षण होण्यासाठी
👉🏻 फायटर
प्रमाण - 2 मिली/लिटर
♻️ तुरीच्या शेंगांचे दाणे टपोरे होण्यासाठी तसेच शेंगांचे वजन वाढण्यासाठी
👉🏻 झोमा गोल्ड
प्रमाण - 2 मिली/लिटर
वरील उत्पादने ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी -
- https://krishibazaar.in/product/pranil-agris-fighter
- https://wa.me/c/919028931579
निष्कर्ष -
तूर पिकातील उत्पादन वाढवायचे असल्यास — योग्य वाण, बियाणे प्रक्रिया, संतुलित पोषण, आणि जैविक उपायांचा समावेश असलेले एकत्रित शेती व्यवस्थापन अवलंबणे अत्यंत आवश्यक आहे.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !
.jpeg)
Comments
Post a Comment