जिवाणू खतांचा वापर ठरतोय फायदेशीर !
जिवाणू खतांचा वापर ठरतोय फायदेशीर ! शेतकरी बांधवांनो, दिवसेंदिवस वाढत चाललेला रासायनिक खतांवरील वापर, बदलत्या पीक पद्धती, वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची वाढती गरज त्यामुळे जमिनीवर येणारा ताण ह्या सर्व कारणांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. गरज जमिनीची सुपीकता टिकवण्याची, गरज जीवाणू खते वापरण्याची ! जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे - ▫️रासायनिक खतांचा अतिवापर ▫️सेंद्रिय खतांचा अभाव ▫️एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धत ▫️दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज, त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार अश्या विविध कारणांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल आणि दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर आपण आपल्या शेतात जिवाणू खते वापरणे फार महत्वाचे आहे. थोडक्यात पाहूया, जिवाणू खते वापरल्याने होणारे फायदे - ▫️ मातीतील सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना मिळते. ▫️ मुळांची वाढ चांगली होऊन, त्यांची पोषण क्षमता वाढते. ▫️ मातीतील सूक्ष्मजीवांचे संतुलन टिकून राहते. ▫️ पिकांची रोग-प्रतिकारशक्ती वाढते. ▫️ सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. ----------------...