मिरची पिकातील किडी आणि रोगांवर प्रभावी नियंत्रण !
मिरची पिकातील किडी आणि रोगांवर प्रभावी नियंत्रण !
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
मिरची पिकाचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यावर येणाऱ्या किडींचे आणि रोगांचे योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते. खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग च्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत शेतीसंदर्भात नवनवीन व अगदी महत्वाची अशी माहिती देत असतो.
ह्या ब्लॉग मध्ये आपण मिरची पिकावर येणारे कीड आणि रोग आणि त्यावर प्रभावी नियंत्रण कसे मिळवायचे ? याबाबतची माहिती घेणार आहोत.
मिरची (Chilli) पिकात अनेक प्रकारच्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो. योग्य वेळेवर नियंत्रण न घेतल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. खाली मिरची पिकातील प्रमुख किडी व रोगांची लक्षणे व त्यांचे प्रभावी नियंत्रण यांची माहिती दिली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मिरची पिकातील प्रमुख किडी आणि त्यांचे नियंत्रण -
1. मिरची पिकातील पाने कुडतरणारी आणि फळ खाणारी अळी (Spodoptera litura)
लक्षणे: पाने कुडतरतात, फांद्या नष्ट करतात ,फळांवर छिद्रे पडतात
नियंत्रण:
ह्या अळीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जैविक कीटकनाशक (मॉर्डेर) ह्या उत्पादनाची २ मिली/लिटर ह्या प्रमाणे फवारणी करावी.
2. फळ व बुंधा छिद्र करणारी अळी (Fruit and Shoot Borer)
लक्षणे: फळांमध्ये छिद्र पडतात, फळ आतून खराब होते.
नियंत्रण:
ह्या अळीवर देखील प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जैविक कीटकनाशक (मॉर्डेर) ह्या उत्पादनाची २ मिली/लिटर ह्या प्रमाणे फवारणी करावी.
अळी झालेली फळे वेचून नष्ट करावीत.
3. मावा (Aphids)
लक्षणे: पानांवर गडद डाग, कोमेजणे, झाडाची वाढ खुंटणे.
नियंत्रण:
मावा वर प्रभावी नियंत्रण म्हणजे शिल्ड (जैविक कीटकनाशक) - २ मिली/लिटर ह्या प्रमाणे फवारणी करावी.
4. थ्रिप्स (Thrips)
लक्षणे: पानांचे वाकडे होतात, कुरूप फळे, पानांवर चकचकीत पट्टे पडतात.
नियंत्रण:
थ्रिप्स (Thrips) वर प्रभावी नियंत्रण म्हणजे शिल्ड (जैविक कीटकनाशक) - २ मिली/लिटर ह्या प्रमाणे फवारणी करावी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🍂 मिरची पिकावर येणारे रोग आणि त्यावरील नियंत्रण -
मिरची पिकामध्ये प्रामुख्याने मररोग,डायबॅक/ फळ सड, पानांवरील करपा, भुरी रोग सरकोस्पोरा पानावरील विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.
1. मर रोग (Damping Off):
लक्षणे: अंकुर उगवताना मरतो, रोप उगवल्यानंतर वाळते.
नियंत्रण:
मर रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी रुबी हे उत्पादन वापरावे - १०० ग्रॅम/एकर ह्या प्रमाणात ड्रेंचिंग ड्रिपद्वारे सोडावे.
2. पानांवरील ठिपका (Leaf Spot/Blight)
लक्षणे-
साधारणतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांत रोगाचा प्रादुर्भाव पानावर करड्या रंगाचे लहान ठिपक्यांच्या स्वरूपात आढळून येतो. काही कालावधीनंतर या ठिपक्यांचा रंग बदलून पांढुरका रंग पानाच्या मध्यभागी आढळतो. तसेच, पानाच्या कडेला गर्द करडा रंग असतो. या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास पाने भरपूर प्रमाणात पिवळी पडून गळून जातात.
जिवाणुजन्य पानांवरील ठिपके
या रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात आढळून येतो. रोगामुळे पाने, खोड व फळांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. सुरवातीला लाल करड्या रंगाचा ठिपका नंतर काळ्या मोठ्या ठिपक्यामध्ये रुपांतरित होऊन ठिपक्याच्या कडा पिवळ्या होतात. प्रादुर्भाव अधिक असल्यास नुकसानग्रस्त पाने पिवळी पडून गळतात. खोडावरील ठिपके फांद्यांवर पसरून परिणामी खोड व फांद्या वाळतात.
नियंत्रण -
पानांवरील ठिपका आणि जिवाणुजन्य पानांवरील ठिपके यावर प्रभावी नियंत्रण म्हणजे रेंजर जे आहे जैविक बुरशीनाशक. रेंजर ची फवारणी २ मिली/लिटर ह्या प्रमाणात करावी.
3. भुरी रोग
लक्षणे-
मिरची पिकामध्ये भुरी रोग साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान आढळतो. पांढरी पावडर पानाच्या खालच्या बाजूला आढळते. अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडून गळतात फुलांची निर्मिती पूर्णतः बंद होते.
नियंत्रण
भुरी रोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी फायटर ह्या उत्पादनाची २ मिली/लिटर ह्या प्रमाणात फवारणी करावी.
निष्कर्ष -
मिरची पिकातील रोगांवर आणि किडींवर प्रभावी नियंत्रण मिळवायचे असेल तर, त्यासाठी प्रभावी नियंत्रण म्हणजे जैविक कीटकनाशक आणि जैवीक बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच पीक फेरपालट करावे, रोग/किडीग्रस्त भाग वेळीच काढून टाकावा.


.jpg)





Comments
Post a Comment