जिवाणू खतांचा वापर ठरतोय फायदेशीर !
जिवाणू खतांचा वापर ठरतोय फायदेशीर !
शेतकरी बांधवांनो,
दिवसेंदिवस वाढत चाललेला रासायनिक खतांवरील वापर, बदलत्या पीक पद्धती, वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची वाढती गरज त्यामुळे जमिनीवर येणारा ताण ह्या सर्व कारणांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे.
गरज जमिनीची सुपीकता टिकवण्याची,
गरज जीवाणू खते वापरण्याची !
जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे -
▫️रासायनिक खतांचा अतिवापर
▫️सेंद्रिय खतांचा अभाव
▫️एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धत
▫️दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज, त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार
अश्या विविध कारणांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल आणि दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर आपण आपल्या शेतात जिवाणू खते वापरणे फार महत्वाचे आहे.
थोडक्यात पाहूया, जिवाणू खते वापरल्याने होणारे फायदे -
▫️ मातीतील सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना मिळते.
▫️ मुळांची वाढ चांगली होऊन, त्यांची पोषण क्षमता वाढते.
▫️ मातीतील सूक्ष्मजीवांचे संतुलन टिकून राहते.
▫️ पिकांची रोग-प्रतिकारशक्ती वाढते.
▫️ सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, उत्पादन नफ्यापेक्षा लागवडीवरील खर्च यामुळे सध्या शेतकरी बांधव हे जिवाणू खतांचा वापर करतांना दिसत आहेत.
जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त असे सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम करतात. जीवाणूंचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हणतात. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणे गरजेचे आहे.
चला पाहूया, जिवाणू खते म्हणजे काय ?
प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररीत्या वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जीवाणू खत, जीवाणू संवर्धन, बॅक्टेरीयल कल्चर किंवा बॅक्टेरियल इनॉक्युलंट म्हणतात.
नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, त्यांना जैविक खते असे म्हणतात. शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जलदरीत्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात.
जिवाणू खतांचे प्रकार -
1. नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू - रायझोबियम, ऍसिटोबॅक्टर, ऍझोटोबॅक्टर, अझोस्पिरीलम, निळे-हिरवे शेवाळ, ऍझोला
2. स्फुरद विरघळविणारे जीवाणू
3. पालाश विरघळविणारे जीवाणू
4. सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू
5. सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जिवाणू खतांमुळे होणारे उल्लेखनीय असे फायदे -
- जिवाणू खतांमुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन, त्यात बचत होऊ शकते.
- जिवाणू खते पर्यावरणपूरक आहेत.
- जिवाणू खतांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते.
- जिवाणू खते सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबरच जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन इन्डॉल ऍसिटीक ऍसिड, यासारखी संप्रेरके व विटामीन बी झाडांना मिळवून देतात.
- जिवाणू खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविके सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांचेदेखील नियंत्रण होते.
- उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते, तसेच उत्पादन खर्च कमी होतो.
- कमी खर्चात उपयुक्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात, रासायनिक खतांचा खर्च कमी होतो.
- जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारतो, परिणामी उत्पादन चांगले होते.
- माती भूसभुशीत होते, पिकाच्या मुळींना चालना भेटते.
- पिकावरील ताण कमी होण्यास मदत होते.
- पिकाची रोगप्रतिकरक शक्ति वाढते.
ज्यात समावेश आहे पोषक किट, रॉयल-के, रॉयल-पी, सार्थ इ.. दर्जेदार आणि प्रभावी उत्पादने !
🛒 आमची वरील उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी-
1. https://www.pranilagri.com/
निष्कर्ष -
शेतीला समृद्ध शेतीचा दर्जा देण्यासाठी जिवाणू खतांचा वापर करणे फार आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो दर्जेदार अश्या जिवाणू खतांचा वापर करा आणि भरगोस उत्पादन मिळवा.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱7757092091



Comments
Post a Comment