समृद्ध शेतीसाठी, पिकांना देण्यात येणारे पाणी कसे असावे ?
समृद्ध शेतीसाठी, पिकांना देण्यात येणारे पाणी कसे असावे ?
शेतकरी मित्रांनो,
खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग पेज वर आपले सहर्ष स्वागत आहे. दिवसेंदिवस शेतात तसेच पिकांच्या लागवडीच्या पद्धतींमध्ये बदल होतांना आपल्याला दिसत आहेत.
पीक वाढीसाठी खतांची योग्य मात्रा देणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे पिकांना योग्य व स्वच्छ पाणी देणे हे फार अत्यावश्यक असते.
आपण ह्या ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतासाठी योग्य पाणी म्हणजे,
👉🏻 पाण्याचा (पी.एच/pH) सामू
👉🏻 पाण्याचा TDS
👉🏻 पाण्यातील EC (विद्युत वाहकता) यांचे योग्य प्रमाण
शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता पिकाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची असते.
पाण्याची योग्य पीएच श्रेणी, योग्य TDS आणि योग्य EC (विद्युत वाहकता) असणे हे पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देते.
योग्य pH, TDS आणि EC हे पिकांच्या जोमदार वाढीसाठी अत्यंत महत्वाचे ठरतात.
खाली पाण्याचे मुख्य घटक — pH (सामू), TDS (Total Dissolved Solids), आणि EC (Electrical Conductivity - विद्युत वाहकता) यांची योग्य श्रेणी दिली गेली आहे.
👉🏻 शेतीसाठी योग्य pH -
5.5 ते 6.5 (किंवा 6 ते 7)
👉🏻 शेतीसाठी योग्य TDS -
250 ते 500 ppm
👉🏻 शेतीसाठी योग्य EC -
0.5 ते 2.0 dS/m
➖ जर तुम्ही तुमच्या मातीत उच्च pH, उच्च TDS आणि उच्च EC असलेले पाणी वापरत राहिलात, तर वनस्पतींच्या मुळांना शेवटी तुम्ही वापरलेल्या अनेक पोषक घटकांना शोषण्यास त्रास होईल आणि परिणामी उत्पादन देखील कमी होईल.
योग्य पाणी पिकाला दिल्याने पिकांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते, आणि पिकांची गुणवत्ता देखील सुधारते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाण्याचा pH
pH म्हणजे- पाण्याचा आम्लता (acid) किंवा क्षारीयता (alkalinity) मोजण्यासाठी वापरला जाणारा एक निर्देशांक आहे, जो 1 ते 14 पर्यंत असतो.
शेतीसाठी योग्य pH:
जमिनीचा pH 6.5 ते 7.5 दरम्यान असावा. या pH मध्ये, पिकांसाठी आवश्यक पोषक तत्वे (nutrients) सहजपणे उपलब्ध होतात.
खराब pH चे परिणाम:
pH कमी असल्यास (acidic) - काही पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होऊ शकतो.
pH जास्त असल्यास (alkaline) - काही खतांचे शोषण कमी होऊ शकते.
पाण्याचा TDS
TDS म्हणजे, Total Dissolved Solids, म्हणजे पाण्यात विरघळलेल्या खनिजांची (minerals) आणि अन्य पदार्थांची एकूण मात्रा.
शेतीसाठी योग्य TDS:
पाणी 1000mg/L पेक्षा जास्त TDS असलेले अयोग्य मानले जाते.
खराब TDS चे परिणाम:
उच्च TDS मुळे मातीची सुपीकता कमी होते.
पिकांची वाढ आणि उत्पादन घटते.
पिकांवर ताण (stress) येऊ शकतो.
पाण्याचा EC
EC म्हणजे: Electrical Conductivity, म्हणजे पाण्यात विरघळलेल्या रेणू (ions) च्या प्रमाणावरून पाण्याचे विद्युत प्रवाह (electric current) मोजणे.
शेतीसाठी योग्य EC: EC 1.0 dS/m पेक्षा कमी असावा.
खराब EC चे परिणाम:
उच्च EC मुळे मातीमध्ये क्षार (salts) जमा होतात.
पिकांची वाढ आणि उत्पादन घटते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पिकाला योग्य पाणी दिल्याने होणारे फायदे -
पिकांची वाढ चांगली होते.
उत्पादनात वाढ होते.
पिकांची गुणवत्ता सुधारते.
पिकांची रोग-प्रतिकारकशक्ती वाढते.
मातीची सुपीकता टिकून राहते.
मातीमध्ये पोषक तत्वे (nutrients) सहज उपलब्ध होतात.
निष्कर्ष -
शेतकरी बंधूंनो, पिकांना देणाऱ्या पाण्याचे आरोग्य सांभाळा,
दर्जेदार व भरगोस उत्पादन मिळवा !




Comments
Post a Comment