डाळिंब बागेतील चौकी अवस्थेसाठी फायदेशीर असे नियोजन !
डाळिंब बागेतील चौकी अवस्थेसाठी फायदेशीर असे नियोजन !
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आजच्या ब्लॉग चा महत्वाचा असा विषय आहे तो म्हणजे डाळिंब फळ पिकातील चौकी अवस्था.
डाळिंब (Pomegranate) हे एक अतिशय लाभदायक आणि निर्यातक्षम फळपीक आहे.
आपल्या सर्वाना माहीतच असेल डाळिंब लागवडीत फळधारणेपूर्वी काही विशिष्ट व महत्वाच्या वाढीच्या अवस्था असतात, त्यातील एक महत्त्वाची वाढीची अवस्था म्हणजे "चौकी अवस्था". ही अवस्था डाळिंब बागेच्या निरोगी उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाणून घेऊया, डाळिंब बागेतील चौकी अवस्था म्हणजे काय ? -
चौकी अवस्था ही फळधारणा होण्यापूर्वीची अवस्था आहे. डाळिंबाच्या फळझाडामध्ये नवीन फुले येण्याआधीची अवस्था – फुले येण्याच्या अगोदरची 15 ते 20 दिवसांचा कालावधी.
डाळिंबाची 'चौकी अवस्था' म्हणजे डाळिंबाच्या फळाची वाढ होणारी अवस्था.
आपण डाळिंबाच्या 'चौकी अवस्था' पाहत असल्यास, आपण डाळिंबाच्या फळाच्या विकासावर लक्ष देत आहोत.
"चौकी अवस्था" हा शब्द डाळिंबाच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वापरला जाऊ शकतो, जसे की:
फुलाची अवस्था:
डाळिंबाच्या झाडावर फुलं येणं ही डाळिंबाची एक 'चौकी अवस्था' आहे.
फळधारणा:
फुलानंतर फळ तयार होणं ही डाळिंबाची दुसरी 'चौकी अवस्था' आहे.
फळाची वाढ:
फळ वाढत असताना, त्याची 'चौकी अवस्था' बदलत राहते.
पक्वता:
फळ पूर्णपणे पिकल्यावर, ते डाळिंबाच्या 'चौकी अवस्थे'चे अंतिम टप्पा आहे.
डाळिंबाच्या झाडाच्या विकासातील एक विशिष्ट टप्पा म्हणजेच चौकी अवस्था, जेव्हा झाड पूर्णपणे तयार होऊन फळ देण्यास सुरुवात करते.
या अवस्थेत डाळिंब बागेची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, कारण या टप्प्यात डाळिंबाच्या झाडाला योग्य पोषण, पाणी आणि हवामानाची आवश्यकता असते.
या अवस्थेत झाडांमध्ये फुलकळींचा विकास होतो, आणि याच वेळी झाडाची ताकद, अन्नद्रव्य साठवण, व रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक असते.
डाळिंब (Pomegranate) हे एक अतिशय लाभदायक आणि निर्यातक्षम फळपीक आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चला पाहूया, चौकी अवस्थेतील डाळिंब बागेची काळजी कशी घ्यावी?
1. पाणी व्यवस्थापन
- डाळिंब बागेला पाणी नियंत्रित प्रमाणात द्यावे लागते, तेव्हाच बागेचं व्यवस्थापन योग्य होते.
- पाण्याचा ताण (Water Stress) योग्य प्रमाणात ठेवावा, म्हणजे झाडाला फुलकळ्या जास्त प्रमाणात येतात.
- ठिबक सिंचन वापरल्यास नियंत्रित सिंचन शक्य होत असते.
2. खत व्यवस्थापन
- सेंद्रिय खतासोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micronutrients) द्यावीत.
- बोरॉन, झिंक, मॅग्नेशियम यांचा योग्य वापर फुलकळी वाढीसाठी उपयुक्त ठरतो.
- डाळिंबातील 'चौकी अवस्थेत'
प्रभावी असे कॉम्बिनेशन 👉🏻 अमिनो गोल्ड + टिबो + रिच-कॅल
- डाळिंब फळपिकात भरपूर फुलधारणा, फळधारणा आणि उत्कृष्ट सेटिंग होण्यासाठी
🔹 वापरण्याचे फायदे -
👉🏻 अधिक फुलधारणा आणि फळधारणा होते.
👉🏻 फुलांची आणि फळांची गळ होत नाही.
👉🏻 डाळिंब फळावर उत्कृष्ट चकाकी येते.
👉🏻 फळाची गुणवत्ता सुधारते.
🔹 वापरण्याचे प्रमाण -
✅ अमिनो गोल्ड - 2 ग्रॅम/लिटर
✅ टिबो - 1 मिली/लिटर
✅ रिच-कॅल - 2 मिली/लिटर
तसेच डाळिंब बागेत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी रोबस्टा डीएफ
🔹 रोबस्टा डीएफ वापरण्याचे फायदे -
✅ डाळिंब फळ पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
✅ डाळिंब फळाला संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करून देते.
✅ पिकास लवकर उपलब्ध होते.
✅ दर्जेदार उत्पादन मिळते.
🔹 रोबस्टा डीएफ वापरण्याचे प्रमाण -
➖ ड्रिप द्वारे - 5 लिटर/एकर
3. कीड व रोग व्यवस्थापन
थ्रिप्स, माईट्स, फुलकिडी यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा, त्यासाठीच शिल्ड ह्या जैविक कीटकनाशकाचा उत्पादनाचा वापर करावा.
शिल्ड वापरण्याचे प्रमाण - २ मिली/लिटर
बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा. प्रभावी असे जैविक बुरशीनाशक म्हणजे रेंजर (२ ग्रॅम /लिटर) आणि फायटर (२ मिली/लिटर) यांचा वापर करावा.
4. तण व्यवस्थापन
झाडाभोवती तण न ठेवता वेळेवर तण काढावेत.
📝 महत्वाच्या टिप्स:
झाडांच्या वाढीवर नजर ठेवून, फुलकळी जास्त दिसू लागल्यावर लगेच पुढील अवस्था व्यवस्थापन सुरू करावे.
शेतात मधूनमधून फेरफटका मारून कीड व रोगांचे निरीक्षण करणे गरजेचे असते.
🌱 निष्कर्ष
चौकी अवस्था ही डाळिंब बागेच्या पुढील फळधारणा क्रियेसाठी आणि उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्वाची अशी अवस्था आहे. याकाळतचं डाळिंब बागेची योग्य काळजी घेतल्यास भरगोस उत्पादन मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.



Comments
Post a Comment