Posts

Showing posts from February, 2025

एक एकरात सरासरी ८०-१०० क्विंटल उत्पादन मिळवा हिरव्या ढोबळी मिरची पिकातून !

Image
 पाहूया हिरव्या ढोबळी मिरचीची संपूर्ण शेती पद्धती व उत्पादन वाढवूया! (Green Capsicum Package of Practices) शेतकरी बांधवानो, आज आपण ह्या लेखात जाणून घेणार आहोत हिरव्या   ढोबळी मिरचीची संपूर्ण शेती पद्धती.  ढोबळी मिरचीला बाजारात मोठी मागणी आहे आणि योग्य नियोजन केल्यास यापासून चांगला नफा मिळू शकतो. खालील संपूर्ण माहिती ढोबळी मिरचीची लागवड, व्यवस्थापन आणि उत्पादनवाढ याबाबत आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 1. हवामान आणि जमीन (Climate and Soil) हवामान : ढोबळी मिरचीसाठी मध्यम थंड हवामान योग्य असते.  - २०-३०°C तापमान वाढीसाठी सर्वोत्तम आहे. जमीन : उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय पदार्थयुक्त, मध्यम काळी किंवा लाल जमीन योग्य असते. - मातीचा pH ६.० ते ७.५ असावा. 2. वाणांची निवड (Variety Selection) उत्तम वाण : इंड्रम, इंडरा, ओरोबेल, बोनांटा, गंगा, स्वर्णा. हायब्रिड वाण : इंद्रा, बोनांटा आणि ग्रॅंड बेल या वाणांमध्ये अधिक उत्पादन मिळते. 3. रोपवाटिका व्यवस्थापन (Nursery Management) - बियाण...

जाणून घेऊया, वाढत्या तापमानाचा पिकांवर होणारा परिणाम आणि त्यावरील संरक्षणात्मक उपाय..

Image
 जाणून घेऊया, वाढत्या तापमानाचा पिकांवर होणारा परिणाम आणि त्यावरील संरक्षणात्मक उपाय..  शेतकरी बंधूंनो, सध्या तापमानामध्ये मोठी वाढ होत आहे, आणि या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम आपल्या शेतीवर होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पिकांना विविध समस्या निर्माण होऊ शकतात, जसे की पाणीटंचाई, पाने वाळणे, उत्पादन कमी होणे आणि कधी कधी संपूर्ण पीक वाया जाणे. अशा परिस्थितीत योग्य वेळी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- वाढत्या तापमानाचा  पिकांवर  परिणाम: ✅ पिकांच्या वाढीवर परिणाम – तीव्र उष्णतेमुळे झाडांची वाढ खुंटते आणि पाने वाळू लागतात. ✅ पाण्याची गरज वाढते – गरमीमुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होतो, त्यामुळे अधिक सिंचनाची गरज भासते. ✅ फळे आणि फुले गळणे – उष्णतेमुळे झाडांवरील फुले आणि फळे अकाली गळण्याचा धोका वाढतो. ✅ रोग आणि किडींचा प्रादुर्भाव – वाढत्या तापमानामुळे काही विशिष्ट किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. ✅ मातीचा पोत बिघडतो – उष्णतेमुळे ...

टोमॅटो पिकातील उशिरा येणाऱ्या करप्यावर मिळवा प्रभावी नियंत्रण ..

Image
टोमॅटो पिकातील उशिरा येणाऱ्या करप्यावर  मिळवा  प्रभावी नियंत्रण .. नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण ह्या लेखामध्ये टोमॅटो पिकातील उशिरा येणाऱ्या करप्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.  🔰 करपा हा एक बुरशीजन्य रोग असून, याची लक्षणे ही रोपाच्या पानांवरती सहजपणे दिसून येतात.  🔰 करपा रोग हा बियाणे व जमिनीतील बुरशीमुळे होतो.  🔰 त्याचप्रमाणे झाडाचे रोगग्रस्त अवशेष हवा पाणी व कीटकांमार्फत या रोगाचा प्रसार होतो. 🔹 टोमॅटो पिकावर कोणत्या प्रकारचे करपा दिसून येतात.  🔰 टोमॅटो पिकावर लवकर येणारा करपा (Early Blight in tomato) 🔰 टोमॅटो पिकावर उशिरा येणारा करपा ( Late Blight in tomato) टोमॅटोवरील उशिरा करप्याचा (लेट ब्लाइट) रोग हा Phytophthora infestans या बुरशीमुळे होतो. हा रोग झपाट्याने पसरतो आणि मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान करतो. 🔹 लक्षणे 🔰 पाने: सुरुवातीला पानांवर पाणचट, अनियमित ठिपके दिसतात, जे नंतर तपकिरी रंगाचे होतात आणि पाने सुकतात. 🔰 खोड: खोडावर काळसर डाग येतात आणि झाड वाळू लागते. 🔰 फळे: फळांवर काळसर, ओलसर डाग पडतात, जे हळूहळू कुजतात. 🔹 रोग पसरण्याची क...

असे घ्या कांद्याचे एकरी १५०-१८० क्विंटल उत्पादन!

Image
असे घ्या कांद्याचे एकरी १५०-१८० क्विंटल उत्पादन! नमस्कार शेतकरी मित्रांनो,  खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग वेबसाइट वर आपले स्वागत आहे. ह्या लेखामध्ये आपण onion farming बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.  ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की कांद्यासाठी आवश्यक असणारी जमीन, हवामान, पूर्व मशागतीची तयारी, कांदा लागवड हंगाम, महत्त्वाच्या कांदा variety,  लागवड कशी करावी, खत आणि पाणी व्यवस्थापन,  कीड व रोग व्यवस्थापन ह्या सर्वां विषयी माहिती घेणार आहोत. 🔹 जमीन पाण्‍याचा चांगला निचरा असणारी भुसभूशीत जमिन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्‍यम ते कसदार जमिन कांदा पिकासाठी महत्वाची ठरते.  🔹 पुर्वमशागत जमीनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाचे पाळया देऊन ढेकळे फोडून जमिन भूसभुशित करावी. जमिनीत हेक्‍टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे. 🔹 कांदा लागवड हंगाम महाराष्‍ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्‍यात करतात. 🔹 वाण - बसवंत ७८० :  खरीप व रब्‍बी हंगामासाठी ही जात योग्‍य असून या जाती...

दर्जेदार शेवंती उत्पादन मिळविण्यासाठी असे करा नियोजन !

Image
  दर्जेदार शेवंती उत्पादन मिळविण्यासाठी असे करा नियोजन ! शेवंती  उत्पादक शेतकरी मित्रांनो, शेवंतीच्या दर्जेदार फुल उत्पादनासाठी व भरगोस उत्पादन मिळविण्यासाठी आज आपण खेतीवाले भैया ह्या ब्लॉग च्या माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन जाणून घेणार आहोत.  शेवंती (Chrysanthemum) हे भारतात मोठ्या प्रमाणावर फुलवले जाणारे एक सुंदर आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे फूल आहे. याचा उपयोग प्रामुख्याने सजावटीसाठी, हार-गजऱ्यांसाठी तसेच देवपूजेसाठी केला जातो. शेवंतीच्या योग्य लागवडीसाठी काही महत्त्वाचे घटक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- १. हवामान आणि जमीन - हवामान – शेवंतीला समशीतोष्ण हवामान आवश्यक असते. २०-३० अंश सेल्सिअस तापमान हे योग्य मानले जाते. - जमीन – सुपीक, निचऱ्याची आणि सेंद्रिय घटकांनी युक्त जमीन शेवंतीसाठी चांगली असते. पाण्याचा निचरा योग्य नसेल तर मुळे कुजण्याची शक्यता असते. शेवंतीच्या प्रमुख जाती: 🌼 १. रंगानुसार जाती: ✅ पांढरी शेवंती – शांत आणि शुभ कार्यांसाठ...

जाणून घेऊया, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचे होणारे नुकसान आणि त्यावरील उपाय

Image
  जाणून घेऊया, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचे होणारे नुकसान आणि त्यावरील उपाय  शेतकरी मित्रांनो, ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचे होणारे नुकसान व त्यावरील उपायांबद्दल शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी गेल्या काही दशकांपासून रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. सुरुवातीला त्याचा फायदा दिसला, पण आता मातीच्या आरोग्यावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या लेखात आपण रासायनिक खतांमुळे मातीच्या भौतिक-रासायनिक गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेणार आहोत. तसेच, शेतीच्या वाढत्या खर्चाविषयी चर्चा करून, जैविक खते , हिरवळीची खते हे कसे फायदेशीर ठरू शकतात, हे पाहूया  ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 1. रासायनिक खतांचा मातीवर होणारा परिणाम मातीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांवर परिणाम रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात. मातीची जलधारण क्षमता कमी होते, त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचत...

मिट्टी की उत्पादकता बढ़ाए सेंद्रिय कार्बन की मदत से !

Image
  मिट्टी की उत्पादकता बढ़ाए सेंद्रिय कार्बन की मदत से ! नमस्कार किसान भाइयों, मिट्टी को ज्यादा उपजाऊ बनाने के लिए, उसमे सेंद्रिय कार्बन का होना बहुत जरुरी होता है। आज हम इस लेख मे सेंद्रिय कार्बन का महत्व जाणणे वाले है। सेंद्रिय कार्बन क्या है? सेंद्रिय कार्बन मिट्टी का एक महत्वपूर्ण घटक है। यह कार्बन-युक्त घटक उन सेंद्रिय पदार्थों से बनता है जो मिट्टी में प्राकृतिक रूप से पाए जाते हैं। इसमें मुख्य रूप से सड़े-गले पौधों के अवशेष, फसलों का कचरा, कंपोस्ट खाद, गोबर की खाद, हरी खाद और मिट्टी में मौजूद सूक्ष्मजीव शामिल होते हैं। सेंद्रिय कार्बन से मिट्टी की संरचना बेहतर होती है, नाइट्रोजन और अन्य पोषक तत्वों की आपूर्ति होती है और फसलों की उत्पादन क्षमता बढ़ती है।  Funtional role of organic carbon मिट्टी में सेंद्रिय कार्बन का आदर्श स्तर क्या होना चाहिए? उत्पादनशील मिट्टी के लिए सेंद्रिय कार्बन का स्तर 0.8% से 1.5% के बीच होना चाहिए। हालांकि, भारत में अधिकांश मिट्टी में सेंद्रिय कार्बन का स्तर 0.5% से भी कम है, जिससे उत्पादन क्षमता प्रभावित होती है। सेंद्रिय कार्बन की कमी के प्रभाव ...

जमिनीची उत्पादक क्षमता वाढवा सेंदीय कर्बाच्या मदतीने

Image
 जमिनीची उत्पादक क्षमता वाढवा सेंदीय कर्बाच्या मदतीने ! सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील एक महत्त्वाचा घटक आहे. जमिनीतून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांपासून तयार होणारा कार्बनयुक्त घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब. यात प्रामुख्याने कुजलेल्या झाडांचे अवशेष, पिकांचा काडीकचरा, कंपोस्ट खत, शेणखत, हिरवळीची खते, मातीतील सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचा पोत सुधारतो, नत्र व इतर पोषकद्रव्यांची पूर्तता होते, आणि पिकांची उत्पादनक्षमता वाढते. Functional role of Organic Carbon जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किती असावे? उत्कृष्ट उत्पादनक्षमता जमिनीसाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.८% ते १.५% च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. परंतु, भारतातील अनेक जमिनींमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५% पेक्षा कमी आहे. त्यामुळे उत्पादनक्षमता कमी होत आहे. सेंद्रिय कर्ब कमी झाल्यास त्याचे होणारे परिणाम - - जमिनीची उत्पादकता कमी होते.  - सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे जमिनीत आवश्यक पोषकद्रव्यांची कमतरता भासते. - पाणी धारण करण्याची क्षमता कमी होते: जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्याची ...