असे घ्या कांद्याचे एकरी १५०-१८० क्विंटल उत्पादन!
असे घ्या कांद्याचे एकरी १५०-१८० क्विंटल उत्पादन!
नमस्कार शेतकरी मित्रांनो, खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग वेबसाइट वर आपले स्वागत आहे. ह्या लेखामध्ये आपण onion farming बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की कांद्यासाठी आवश्यक असणारी जमीन, हवामान, पूर्व मशागतीची तयारी, कांदा लागवड हंगाम, महत्त्वाच्या कांदा variety, लागवड कशी करावी, खत आणि पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन ह्या सर्वां विषयी माहिती घेणार आहोत.
🔹 जमीन
पाण्याचा चांगला निचरा असणारी भुसभूशीत जमिन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्यम ते कसदार जमिन कांदा पिकासाठी महत्वाची ठरते.
🔹 पुर्वमशागत
जमीनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाचे पाळया देऊन ढेकळे फोडून जमिन भूसभुशित करावी. जमिनीत हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे.
🔹 कांदा लागवड हंगाम
महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करतात.
🔹 वाण -
बसवंत ७८० : खरीप व रब्बी हंगामासाठी ही जात योग्य असून या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्यमहिन्यात ते मोठे असतात. ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.
एन – ५३ : ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे. 100 ते 150 दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लाल भडक असतो. हेक्टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल मिळते.
एन- 2-4-१ : ही जात रब्बी हंगामासाठी योग्य असून रंग भगवा व विटकरी आहे. कांदा आकाराने मध्यम गोल असून साठवणूकींत हा कांदा अतिशय चांगल्या प्रकारे टिकतो. ही जात 120 ते 130 दिवसांत तयार होते. हेक्टरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल मिळते.
पुसा रेड : कांदे मध्यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्यम तिखट असतात. लागवडीपासून 120 दिवसात तयार होतोत. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.
🔹 बियाण्याचे प्रमाण - हेक्टरी कांद्याचे 10 किलो बियाणे पुरेसे असते.
🔹 लागवड
कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणा-या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी.
🔹 खते व पाणी व्यवस्थापन
कांदा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी घ्यावे. त्यानंतर 1 महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्या अंतराने तर उन्हाळी रब्बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.
कांदा पिकात रोपांच्या जोमदार वाढीसाठी, रोप लागणीनंतर १५-२० दिवसांनी कोलिना कॉम्बी ची फवारणी करा व मिळवा दर्जेदार उत्पादन !
फायदे -
✅ कांदा पिकामधील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
✅ पिकाची गुणवत्ता सुधारते.
✅ वापरण्याचे प्रमाण - १ ग्रॅम/लिटर
🔹 कांदा पिकावरती येणाऱ्या रोगांची माहिती व त्यावरील व्यवस्थापन:
🔹 मर रोग (Damping off)
✅ लक्षणे: रोपे पिवळी पडून कोलमडतात आणि जमिनीलगतच्या भागांवर पांढरी बुरशी दिसते.
✅ नियंत्रण: बियाण्यांना पेरणीपूर्वी थायरम किंवा कार्बोक्सीन 2-3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी. रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी आणि पाण्याचा निचरा चांगला होईल याची काळजी घ्यावी.
✅ तसेच मर रोग नियंत्रणासाठी प्रणिल ऍग्री चे रुबी (१०० ग्रॅम/एकर) हे उत्पादन वापरावे.
🔹 जांभळा करपा (Purple blotch):
✅ लक्षणे: पानांवर लांबट, पांढरट चट्टे दिसतात, जे नंतर जांभळट रंगाचे होतात.
✅ नियंत्रण: करपा रोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी रेंजर( २ ग्रॅम/एकर) ह्या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
🔹 काळा करपा (Anthracnose):
✅ लक्षणे: पानांवर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात, ज्यावर बारीक गोलाकार ठिपके वाढतात.
✅ नियंत्रण: पाण्याचा निचरा चांगला होईल याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडे काढून टाकावीत आणि शेत स्वच्छ ठेवावे.
करपा रोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी फायटर (२ मिली /लिटर ) ह्या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
🔹 फुलकिडे (Thrips):
✅ लक्षणे: पानांवर पांढरट ठिपके दिसतात, ज्यामुळे पाने वाकडी होऊन वाळतात.
✅ नियंत्रण: प्रोफेनोफॉस 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच फुल किडयांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रणिल ऍग्री चे शिल्ड (२ मिली/लिटर) ह्या जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.
🔹 कांदा पिकावर येणाऱ्या डाऊनी रोगावर (Downy Mildew) मिळवा प्रभावी नियंत्रण फॉसफोरो जैविक बुरशीनाशकाच्या मदतीने
🔹लक्षणे -
✅ पानांवर पांढरट ठिपके दिसतात.
✅ पानांवर फिकट हिरवट-पिवळे डाग पडतात.
🔹 फायदे -
✅ डाऊनी रोगावर प्रभावी नियंत्रण मिळते.
✅ पिकास निरोगी ठेवते.
✅ १००% परिमाणकरता
✅ वापरण्याचे प्रमाण - २ ग्रॅम /लिटर

Comments
Post a Comment