दर्जेदार शेवंती उत्पादन मिळविण्यासाठी असे करा नियोजन !
दर्जेदार शेवंती उत्पादन मिळविण्यासाठी असे करा नियोजन !
शेवंती उत्पादक शेतकरी मित्रांनो,
शेवंतीच्या दर्जेदार फुल उत्पादनासाठी व भरगोस उत्पादन मिळविण्यासाठी आज आपण खेतीवाले भैया ह्या ब्लॉग च्या माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन जाणून घेणार आहोत.
शेवंती (Chrysanthemum) हे भारतात मोठ्या प्रमाणावर फुलवले जाणारे एक सुंदर आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे फूल आहे. याचा उपयोग प्रामुख्याने सजावटीसाठी, हार-गजऱ्यांसाठी तसेच देवपूजेसाठी केला जातो. शेवंतीच्या योग्य लागवडीसाठी काही महत्त्वाचे घटक लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. हवामान आणि जमीन
- हवामान – शेवंतीला समशीतोष्ण हवामान आवश्यक असते. २०-३० अंश सेल्सिअस तापमान हे योग्य मानले जाते.
- जमीन – सुपीक, निचऱ्याची आणि सेंद्रिय घटकांनी युक्त जमीन शेवंतीसाठी चांगली असते. पाण्याचा निचरा योग्य नसेल तर मुळे कुजण्याची शक्यता असते.
शेवंतीच्या प्रमुख जाती:
🌼 १. रंगानुसार जाती:
✅ पांढरी शेवंती – शांत आणि शुभ कार्यांसाठी उपयुक्त.
✅ पिवळी शेवंती – सर्वसाधारण बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेली.
✅ गुलाबी शेवंती – आकर्षक रंगामुळे विशेषत: सजावटीसाठी वापरली जाते.
✅ केशरी शेवंती – मुख्यतः व्रत-वैकल्यासाठी आणि बाजारात उच्च दर मिळवणारी.
✅ जांभळी शेवंती – दुर्मिळ आणि शोभेच्या दृष्टीने महत्त्वाची.
🌾 २. फुलांच्या प्रकारानुसार जाती:
✅ सिंगल शेवंती – साध्या पाकळ्यांची आणि मोकळ्या रचनेची.
✅ डबल शेवंती – अधिक संख्येने पाकळ्या असलेल्या व मोहक दिसणाऱ्या जाती.
✅ पोम शेवंती (Pompon) – लहान गोलसर आकाराच्या फुलांसाठी प्रसिद्ध.
✅ स्पायडर शेवंती – लांबट आणि कुरळ्या पाकळ्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना.
२. शेवंती फुलांच्या रोपांच्या लागणीची तयारी
- शेवंतीसाठी जमीन योग्य प्रकारे नांगरून भुसभुशीत करावी.
- शेणखत, कंपोस्ट खत यांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
- ३० सें.मी. अंतरावर रोपे लावावीत.
३. पाण्याचे व्यवस्थापन
- शेवंतीला मध्यम प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
- पावसाळ्यात जास्त पाणी साचू देऊ नये.
- ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची बचत होते आणि उत्पादन चांगले मिळते.
४. खते आणि रोग नियंत्रण
- सेंद्रिय खते – शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत यांचा समावेश असावा.
- रासायनिक खते – नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) योग्य प्रमाणात द्यावे.
➡️ NPK खतांची शिफारस (प्रति एकर)
✅ बेसल डोस (लागवडीच्या वेळी)
नत्र (N) – 25 किलो
स्फुरद (P) – 50 किलो
पालाश (K) – 50 किलो
➡️ शेवंती फुलाचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी रोप लागणीनंतर ड्रिप द्वारे करण्यात आलेल्या शिफारशी खालीलप्रमाणे
✅ शेवंती रोप लागणीनंतर पहिल्या आळवणीसाठी
NPK 8:8:8 (1 लिटर/एकर) + रॅडिक्स (500 ग्रॅम/एकर) + रुबी (100 ग्रॅम/एकर)
✅ Tiron NPK 8:8:8 (1 लिटर/एकर) – झाडांच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक मूलद्रव्यांचा संतुलित पुरवठा करतो.
✅ Radix (Potassium Humate 98%) (500 ग्रॅम/एकर) – मुळांची वाढ सुधारून पोषणक्षमता वाढवतो.
✅ Ruby (100 ग्रॅम/एकर) – मर रोग (Wilting) टाळण्यासाठी प्रभावी मदत करते.
✅ शेवंती पिकामध्ये फुटव्यांसाठी
12:61:00 (5 किलो/एकर) + हल्क (1 लिटर/एकर)
शेवंती फुल पिकामध्ये अधिक फुटवे, मजबूत खोड आणि संपूर्ण झाडाच्या वाढीसाठी "HULK" हा एक अत्यंत प्रभावी उत्पाद आहे.
✅ अधिक फुटवे निर्माण होण्यास मदत करते 🌿
✅ खोडामध्ये आवश्यक पोषणसाठा (Storage) वाढवते 🌱
✅ दोन पेरांमधील अंतर कमी करण्यास मदत करते, त्यामुळे झाडाची सघनता आणि मजबुती वाढते 🌾
✅ फुलांची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन वाढण्यास मदत होते 🏵️
✅ शेवंती फुल पिकामध्ये कळी निघण्यासाठी व फुलामध्ये रूपांतर होण्यासाठी
पोषक कीट - (1 कीट/एकर)
शेवंती पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि रोपांची जोमदार वाढ सुनिश्चित करण्यासाठी, तसेच बेसल डोसचा अपटेक वाढवण्यासाठी "Poshak Kit" चा वापर अत्यंत उपयुक्त ठरेल.
✅ फुटवे वाढीस चालना मिळेल 🌿
✅ रोपांची जोमदार वाढ होईल 🌱
✅ बेसल डोसचे पोषण प्रभावीपणे मुळांपर्यंत पोहोचेल 💧
✅ फुलांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढेल 🏵️
संपूर्ण पीक निरोगी आणि सशक्त ठेवण्यासाठी "Poshak Kit " ची योग्य वेळेत ठिबक प्रणालीद्वारे वापर करावा.
✅ शेवंती फुल पिकामध्ये आकर्षक रंग व चकाकी साठी
मॅगरिको (5 किलो/एकर) + पामेला (200 ग्रॅम/एकर)
➡️ शेवंती फुल पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी घेण्यात येणाऱ्या फवारणी खालीलप्रमाणे दिल्या गेल्या आहेत .
रोग व कीड नियंत्रण –
- शेवंती फुल पिकामध्ये करपा रोगाच्या नियंत्रणासाठी - रेंजर (2 ग्रॅम/लिटर) फवारणी करावी.
- मावा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिल्ड (२ मिली/लिटर) हे जैविक कीटकनाशक वापरावे.
- बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी फायटर (२ मिली/लिटर) हे जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
✅ अधिक फुल कळीधारणेसाठी
झारा (२ मिली/लिटर) + टिबो (१ मिली/लिटर)
✅ शेवंती फुल पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी
झोमा गोल्ड (2 मिली/लिटर) + कॅलबॉर्न (2 मिली/लिटर)
✅ शेवंती फुल पिकामध्ये आकर्षक रंग, चकाकी व फुलांचे वजन वाढीसाठी
रीको (25 मिली/लिटर) + टिबो (1 मिली/लिटर)
५. फुलेतोड आणि विक्री
- योग्य काळात फुले तोडल्यास बाजारात त्यांना चांगली किंमत मिळते.
- सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फुले तोडावीत.
- स्थानिक बाजारपेठ, घाऊक विक्रेते आणि ऑनलाइन विक्रीचा पर्याय वापरावा.
-
तर शेतकरी मित्रांनो, शेवंतीची शेती ही कमी गुंतवणूक आणि अधिक नफा देणारी शेती आहे. योग्य नियोजन, चांगली काळजी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरल्यास उत्पादन अधिक आणि गुणवत्तापूर्ण मिळू शकते. तसेच उत्कृष्ट शेवंती फुलांचे उत्पादन मिळविण्यासाठी वरील ड्रिप व फवारणी द्वारे करण्यात आलेल्या शिफारशी लागू केल्यांनतर अधिक उत्पादन मिळू शकते.
🌱 शेवंतीच्या यशस्वी लागवडीसाठी शाश्वत शेती तंत्राचा अवलंब करा आणि अधिक उत्पादन मिळवा! 🌸



Comments
Post a Comment