टोमॅटो पिकातील उशिरा येणाऱ्या करप्यावर मिळवा प्रभावी नियंत्रण ..
टोमॅटो पिकातील उशिरा येणाऱ्या करप्यावर मिळवा प्रभावी नियंत्रण ..
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या लेखामध्ये टोमॅटो पिकातील उशिरा येणाऱ्या करप्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
🔰 करपा हा एक बुरशीजन्य रोग असून, याची लक्षणे ही रोपाच्या पानांवरती सहजपणे दिसून येतात.
🔰 करपा रोग हा बियाणे व जमिनीतील बुरशीमुळे होतो.
🔰 त्याचप्रमाणे झाडाचे रोगग्रस्त अवशेष हवा पाणी व कीटकांमार्फत या रोगाचा प्रसार होतो.
🔹 टोमॅटो पिकावर कोणत्या प्रकारचे करपा दिसून येतात.
🔰 टोमॅटो पिकावर लवकर येणारा करपा (Early Blight in tomato)
🔰 टोमॅटो पिकावर उशिरा येणारा करपा ( Late Blight in tomato)
टोमॅटोवरील उशिरा करप्याचा (लेट ब्लाइट) रोग हा Phytophthora infestans या बुरशीमुळे होतो. हा रोग झपाट्याने पसरतो आणि मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान करतो.
🔹 लक्षणे
🔰 पाने: सुरुवातीला पानांवर पाणचट, अनियमित ठिपके दिसतात, जे नंतर तपकिरी रंगाचे होतात आणि पाने सुकतात.
🔰 खोड: खोडावर काळसर डाग येतात आणि झाड वाळू लागते.
🔰 फळे: फळांवर काळसर, ओलसर डाग पडतात, जे हळूहळू कुजतात.
🔹 रोग पसरण्याची कारणे
🔰 जास्त आर्द्रता आणि थंड हवामान
🔰 सातत्याने पडणारा पाऊस
🔰 बागेत हवेशीर व्यवस्थापनाचा अभाव
🔰 रोगट बियाणे किंवा रोपे
🔹 नियंत्रण -
1. कृषी पद्धती
🔰 रोगट झाडे आणि पाने त्वरित काढून नष्ट करावी.
🔰 झाडांना योग्य अंतर ठेऊन लागवड करावी.
🔰 शेतात योग्य निचरा प्रणाली ठेवावी.
🔰 सलग टोमॅटो ची लागवड टाळावी. (फसल चक्र वापरा).
२. जैविक नियंत्रण:
फवारणीद्वारे नियंत्रण - जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
त्यासाठी प्रणिल ऍग्री चे रेंजर ह्या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
🔰 वापरण्याचे प्रमाण - २ ग्रॅम/लिटर
रेंजर ह्या जैविक बुरशीनाशकाची फवारणी झाल्यानंतर फायटर ह्या बुरशीनाशकाची (८ ते १० दिवसांनी) फवारणी करावी.
🔰 वापरण्याचे प्रमाण - २ मिली/लिटर
३. रासायनिक नियंत्रण:
मेटालॅक्सिल + मॅन्कोझेब (Metalaxyl + Mancozeb) 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
क्लोरोथॅलोनील (Chlorothalonil) किंवा कॅपर ऑक्सीक्लोराईड (Copper Oxychloride) यांची फवारणी 7-10 दिवसांच्या अंतराने करा.
सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट फंगीसायड्स यांचा पर्यायी वापर करा.
प्रतिबंधात्मक उपाय:
🔰 रोग प्रतिकारक जातींची निवड करा.
🔰 पीक फेरपालट करा.
🔰 नियमितपणे पिकांची तपासणी करा आणि प्रारंभिक लक्षणे दिसताच उपाययोजना करा.



.jpg)
Comments
Post a Comment