थंडीच्या काळात द्राक्ष पिकाची काळजी कशी घ्यावी?
थंडीच्या काळात द्राक्ष पिकाची काळजी कशी घ्यावी? द्राक्ष शेती ही नाजूक व फायदेशीर पिकांपैकी एक आहे. थंडीच्या हंगामात योग्य काळजी घेतल्यास द्राक्षांचे उत्पादन उत्तम होते, अन्यथा थंड हवामानामुळे फुलोरा गळ, फळकुज, आणि रोगांची समस्या निर्माण होऊ शकते. शेतकऱ्यांनी थंडीच्या काळात द्राक्ष पिकाची योग्य प्रकारे निगा राखणे आवश्यक आहे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- थंडीच्या काळातील द्राक्ष पिकाला भेडसावणाऱ्या समस्या - - थंड वातावरणाचा परिणाम: द्राक्षाच्या झाडांना 15°C पेक्षा कमी तापमान असल्यास झाडाची वाढ खुंटते. - ओलसर वातावरण: धुके व थंड हवेमुळे फुफुंदजन्य रोग (जसे की डाऊनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू) वाढतात. - फुलोरागळ, फळगळ व फळकुज : थंडीच्या तीव्रतेमुळे फुलगळ, फळगळ व फळकुज होण्याची शक्यता वाढते. - किडींचा प्रादुर्भाव: थंड वातावरणात मावा, मिलिबग, आणि तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो. - द्राक्ष पिकाची काळजी घेण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय १. तापमान नियंत्रण - थंडीच्या तीव्रतेपासून पिकाचे संरक्षण ...