अशी घ्या थंडी च्या दिवसांमध्ये आपल्या टोमॅटो पिकाची काळजी !

 अशी घ्या थंडी च्या दिवसांमध्ये आपल्या टोमॅटो पिकाची काळजी !


टोमॅटो रोपांच्या लागणीनंतर, रोपाच्या वाढीसाठी लागणाऱ्या संपूर्ण गरजा पूर्ण करणे व त्या शोधणे आवश्यक असते.

टोमॅटो पीक हे जास्त थंड हवामान सहन करू शकत नाही त्यामुळे त्यांचा विकास खुंटतो.

वाढत्या रोपांना भरपूर सूर्यप्रकाश, सातत्यपूर्ण उबदारपणा, पुरेसे पाणी व निरोगी माती व योग्य ते खतांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते.

शेतकरी बांधवांनो, सध्या तापमानामध्ये अचानक घट होत असून रात्रीच्या वेळी खूप गारवा जाणवत आहे. अशा परिस्थितीत टोमॅटो पिकाची योग्य प्रकारे काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कमी तापमानामुळे पिकांवर ताण येऊ शकतो आणि याचाच परिणाम उत्पादनावर देखील होऊ शकतो.  

थंडीच्या दिवसांमध्ये तापमानात घट होते, अशा गारव्याच्या वातावरणामध्ये टोमॅटो पिकासाठी करावयाच्या उत्तम उपाययोजना खालील प्रमाणे दिल्या आहेत.

टोमॅटो पिकाची काळजी घेण्यासाठी काही महत्वाचे उपाय-

1. पाणी व्यवस्थापन :-  पिकाला वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाणी द्या. गारव्याच्या काळात जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे गरजेचे असते.

2. तापमान नियंत्रण :-  गारवा कमी करण्यासाठी शक्य असल्यास प्लॅस्टिक मल्चिंग किंवा टोमॅटो पिकाभोवती नैसर्गिक कवचाचा वापर करावा. 

3. पिकाचे रोग आणि किड व्यवस्थापन :- थंड हवामानात रोग आणि कीड नियंत्रणासाठी योग्य औषधांचा वापर करावा. 

4. पोषण व्यवस्थापन :- पिकाला ताणापासून संरक्षण मिळण्यासाठी पोषण व्यवस्थापनावर भर दयावे.

टोमॅटो पिकाचा ताण-तणाव कमी करण्यासाठी आणि उत्तम उत्पादनासाठी - करावयाच्या उपाययोजना ‘पामेला’ (Pamella)

डोस :-  400 ग्रॅम प्रति एकर (ड्रिपद्वारे) 

फायदे-

  • ‘पामेला’ मध्ये 80% समुद्री शेवाळीचा अर्क असून पिकाची ताण सहन करण्याची क्षमता वाढवतो.
  • रोपांची चांगली वाढ सुनिश्चित करतो.  

पामेला हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -  https://krishibazaar.in/product/pranil-agris-pamella

तसेच थंडी च्या दिवसांत टोमॅटो पिकामध्ये रोपांची वाढ मंदावते, तसेच मुळीचे कार्य थांबते. अशा वेळी आपण शेतकऱ्यांनी खालील ड्रीप एप्लिकेशन देऊ शकता. 

फायदे-

  • रोपांची वाढ जोमदार होते. 
  • फुटवे अधिक निघतात. 
  • पोषक किट - १ किट / एकर  

 

पोषक किट हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit

आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा - 7757092091

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !