कलिंगड/टरबूज पिक वाढीसाठी लागवड व्यवस्थापन
कलिंगड/टरबूज पिक वाढीसाठी लागवड व्यवस्थापन
महाराष्ट्रात कलिंगड पिकाची लागवड ही अतिशय उल्लेखनीय आहे. वर्षानुवर्षे आपण बघत आलो आहोत की या पिकाच्या लागवडीमुळे त्यापासून मिळणारे उत्पादनही अतिशय उत्कृष्ट मिळते.
कलिंगड पिकाची मागणी ही उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त दिसून येते.
कलिंगड पिकाला आवश्यक असणारी जमीन-
- या पिकासाठी मध्यम प्रकारची काळी जमीन योग्य असते.
- अशा प्रकारच्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो.
हवामान -
- कलिंगड वाढीसाठी उष्ण आणि कोरडे हवामान उत्कृष्ट ठरते.
- तसेच भरपूर सूर्यप्रकाश देखील आवश्यक असतो.
- 24 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान हे कलिंगड पिकाच्या वेलींच्या व फळांच्या वाढीसाठी उत्तम असते.
लागवड कधी करावी?
साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कलिंगड लागवडीला शेतकरी सुरुवात करतात.
लागवड पद्धत-
सध्या शेतकरी हे कलिंगड पिकाची लागवड ही मल्चिंग पद्धतीने करण्यावर भर देत आहे.
बियाण्यांची आवश्यकता -
कलिंगड पिकासाठी एकरी १ ते १.२५ किलो बियाण्यांची आवश्यकता असते.
कलिंगड पिकातील महत्त्वाच्या जाती-
- शुगर बेबी - खाण्यास अतिशय गोड लागते.
- ऑगस्टा- जोमदार वाढते व लवकर तयार होते.
- पुसा शरबती- यांचा आकार गोल किंचित लांबट असा असतो.
दुर्गापुर केसर, अर्का माणिक, पुसा बेदाणा या जाती देखील लागवडी योग्य आहे.
खतांचे व्यवस्थापन -
कलिंगड पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत सारख्या प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश द्यावे, त्यामुळे शाखीय वाढ चांगली होती.
बेड तयार करताना (बी लावण्याअगोदर)
जमिनीमधून निर्माण होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कलिंगड/टरबूज पिकातील मर रोग नियंत्रणासाठी - खालील उपाययोजना कराव्यात
रुबी (१०० ग्रॅम/एकर) + क्लोरोपायरीफॉस (१ लिटर/एकर)
रुबी हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/ruby-bio-pesticides
दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कलिंगड/टरबूज उत्पादन मिळवण्यासाठी आम्ही काही महत्त्वाचे ड्रीप/आळवणी व्यवस्थापन आपणासाठी देत आहोत.
ड्रीप/आळवणी व्यवस्थापन -
पहिली आळवणी/ड्रीप द्वारे - (रोप उगवल्यानंतर ६ ते ७ दिवसांनी)
पामेला (२०० ग्रॅम/एकर) + कोलीना झेड एन (२५० ग्रॅम/एकर)
फायदे - रोपाच्या जोमदार वाढीसाठी, अधिक पांढऱ्या मुळीसाठी
दुसरी आळवणी/ड्रीप द्वारे (रोप उगवल्यानंतर १२ ते १७ दिवसांनी)
पोषक किट (१ किट/एकर)
फायदे - फुटव्यांसाठी व रोपाच्या जोमदार वाढीसाठी, बेसल डोसचा अपटेक वाढवण्यासाठी
पोषक किट हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit
तिसरी आळवणी/ड्रीप द्वारे (रोप उगवल्यानंतर १८ ते २५ दिवसांनी)
अमिनोसान (२ लिटर/एकर) + बाविस्टीन (५०० ग्रॅम/एकर) + टिराॅन NPK 888 (१ लिटर/एकर)
अमिनोसान आणि टिराॅन NPK 888 ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/tiron-npk-888
चला तर मग, आता आपण पाहूया कलिंगड/टरबूज पिकातील रोग व किड व्यवस्थापन -
अ. किड व्यवस्थापन-
१. नागअळी-
- या पिकामध्ये नागअळीचा प्रादुर्भाव साधारणपणे रोपे लहान असतानाच दिसून येतो.
- ही अळी वेलींचे पाने पोखरते, त्यामुळे पाणांवर नागमोडी, पिवळट रेषा दिसतात.
कलिंगड/टरबूज पिकातील नागअळीचा प्रादुर्भाव
नागअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना - गार्ड (२ मिली/लिटर)
गार्ड हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/pranil-agris-guard
२. मावा व तुडतुडे-
- हे हिरव्या रंगाचे छोटेसे कीटक असतात.
- ढगाळ वातावरण असल्यास, तसेच हवेत गारवा निर्माण झाला असल्यास या किडींची उत्पत्ती होते.
कलिंगड/टरबूज पिकातील मव्याचा प्रादुर्भाव
यापासून पिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना- शिल्ड (२ मिली प्रति लिटर)
शिल्ड हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/pranil-agri-shield
३. अळी (पान कुडतडणारी अळी/फळाची साल खाणारी अळी)
कलिंगड फळ वाढीच्या अवस्थेत ही अळी फळाची साल खरडून फळांचे नुकसान करते.
कलिंगड/टरबूज पिकातील अळीचा प्रादुर्भाव
या अळीपासून कलिंगड/टरबूज पिकाचे संरक्षण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना - माॅर्डर (२ मिली/लिटर)
मॉर्डर हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/pranil-agris-morder
ब. कलिंगड/टरबूज पिकातील रोगांचे व्यवस्थापन -
१. भुरी रोग -
- यामध्ये पानांच्या दोन्ही भागांवर पावडरी सारखे लहान ठिपके दिसतात,
- नंतर हे ठिपके वाढत जाऊन पूर्ण पानांवरती पसरतात.
कलिंगड/टरबूज पिकातील भुरी रोगाचा प्रादुर्भाव
करावयाच्या उपाययोजना - 'फायटर' (२ मिली/लिटर) जैविक बुरशीनाशक
फायटर हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/pranil-agris-fighter
२. करपा रोग-
कलिंगड टरबूज पिकामध्ये करपा रोग हा (Alternaria cucumerina) या बुरशीमुळे दिसून येतो.
कलिंगड/टरबूज पिकातील करपा रोगाचा प्रादुर्भाव
करावयाच्या उपाययोजना- रेंजर (२ ग्रॅम/लिटर)
रेंजर हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/pranil-agris-ranger
३. कलिंगड/टरबूज पिकातील मिडे गळ, फळगळ, ब्लॉसम राॅट
कलिंगड/टरबूज पिकातील ब्लॉसम राॅट चा प्रादुर्भाव
करावयाच्या उपाययोजना - कॅल्सीफॉस (२ मिली/लिटर) + झिंनकाॅन ( १ मिली/लिटर) + अमिनो गोल्ड (१.५ ग्रॅम/लिटर)
कॅल्सीफॉस, झिंनकॉन, अमिनो गोल्ड ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/tiron-calciphos
https://krishibazaar.in/product/tiron-zincon-zinc-oxide
https://krishibazaar.in/product/pranil-agri-amino-gold
आमचा हा लेख आपणास कसा वाटला याविषयी नक्की अभिप्राय कळवा, तसेच कलिंगड/टरबूज पिकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबर वरती नक्की संपर्क साधा-
7757092091







.webp)






.png)





Comments
Post a Comment