द्राक्ष बागेतील घड जिरणे व गोळी घड होण्याच्या समस्येवर उपाययोजना..
द्राक्ष बागेतील घड जिरणे व गोळी घड होण्याच्या समस्येवर उपाययोजना
द्राक्ष बागेची छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागायतदारांसमोर बरीच आव्हाने असतात, त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे घड जिरणे किंवा घडाचे गोळी घडात रूपांतर होणे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
घड का जिरतो ?
घड बाहेर येत असताना वेलीमध्ये अनेक वाढीच्या हालचाली होत असतात त्यामध्ये जर जिब्रेलिक ऍसिड चे प्रमाण वाढले व सायटोकायनिनचे प्रमाण कमी झाले, तसेच ढगाळ वातावरण असल्यास देखील घड जिरण्याची समस्या द्राक्ष बागेत उद्भवते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
घड जिरणे किंवा गोळी घडात रूपांतर होण्याची कारणे -
1. खरड छाटणी योग्य वेळ-
द्राक्ष बागेत खरड छाटणी वेळेवर न होता उशिरा झालेली असल्यास सूक्ष्म घड निर्मितीस पुरेसा वेळ मिळत नाही. उशिरा झालेल्या छाटणीमुळे अन्ननिर्मिती होऊन त्याची काडीमध्ये साठवणीसाठी आवश्यक तितका कालावधी मिळत नाही. परिणामी घड जिरतात.
2. खरड छाटणीनंतर सतत ढगाळ वातावरण-
खरड छाटणीच्या वेळी सतत ढगाळ वातावरण असल्यास काडीमध्ये पेशी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, त्यातून कमकुवत किंवा संख्येने कमी प्रमाणात घड निर्मिती होते.
3. फळ छाटणी आधी व नंतर पाऊस असणे-
छाटणी करण्याआधी व छाटणी झाल्यानंतर ८ ते १० दिवस सलग पाऊस पडत असल्यास किंवा फळ छाटणीनंतर डोळे कापसाळण्याच्या म्हणजेच पोंगा अवस्थेत ढगाळ वातावरण असल्यास घड जिरतो.
या अवस्थेत पाऊस जास्त असल्यामुळे बागेत पाणी साचून राहते परिणामी पांढऱ्या मुळांचा विकास थांबतो. याचाही परिणाम बागेत घडण्याच्या समस्या दिसतो.
4. बागेत पांढऱ्या मुळांची कमतरता-
द्राक्ष बागेतील जमिनीत पांढऱ्या मुळांची वाढ व विकास होत राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. बागेमध्ये पावसाचे पाणी जास्त साठत असल्यास निचरा व्यवस्थित होत नसल्यास जमिनीमध्ये वापसा स्थिती राहत नाही, त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ थांबते परिणामी घड कमकुवत बनून घड जिरतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
उपाययोजना -
- खरड छाटणीची व फळ छाटणीची योग्य वेळ साधणे महत्त्वाचे असते.
- फळ छाटणीच्या अगोदर आपण रसायनांच्या साह्याने पानगळ करून घेतो. फवारणी नंतर पूर्ण पानगळ झाल्याशिवाय छाटणी करू नये.
- छाटणी नंतर सतत पाऊस पडून बागेत पाणी साठत असल्यास त्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.
- उन्हाळ्यामध्ये (विश्रांती कालावधीमध्ये) बागेतील मातीचे बोद उघडे करून त्यात पुरेसे शेणखत, आवश्यक खतभरणी करून मातीने झाकून घ्यावे. त्यामुळे पांढऱ्या मुळांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होईल व या पांढऱ्या मुळांकडून झाडांना पुरेशी अन्नद्रव्य उपलब्ध होतात.
पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी -
सशक्त द्राक्ष घडासाठी-
बदलत्या वातावरणाचा ताण सहन करण्यासाठी -
1. सर्वोत्तम उत्पादन - पामेला (200 ग्रॅम प्रति एकर) फवारणी द्वारे वापरावे.
पामेला उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/pranil-agris-pamella
2. गोळी घड नियंत्रणासाठी - अल्बेरो (250 मिली प्रति एकर) फवारणी द्वारे वापरावे.
आमचा हा लेख आपणास कसा वाटला याविषयी नक्की अभिप्राय कळवा, तसेच द्राक्ष पिकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबर वरती नक्की संपर्क साधा-
- 9096517346



Comments
Post a Comment