ढोबळी मिरचीच्या पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव दिसतोय ? जाणून घ्या प्रभावी उपाय !
ढोबळी मिरचीच्या पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव दिसतोय ? जाणून घ्या प्रभावी उपाय !
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
ढोबळी मिरची मिरची पिकावर थ्रिप्स (फुलकिडे) चा प्रादुर्भाव होणे ही शेतकरी मित्रांसाठी एक मोठी समस्या आहे.
शिमला मिरची (ढोबळी मिरची) हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मात्र,अलीकडच्या काळात हवामानातील बदलामुळे या पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
यामुळे फळाची गुणवत्ता खराब होते आणि बाजारात योग्य भाव मिळत नाही. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या समस्येचे मूळ कारण आणि त्यावर काय उपाययोजना कराव्यात, याची सविस्तर माहिती घेणार आहोत.
थ्रिप्समुळे होणारे नुकसान आणि त्यावरील प्रभावी उपाययोजनांची सविस्तर माहिती जाणून घेऊया
थ्रिप्स ओळखावे कसे? (लक्षणे)
थ्रिप्स हे अतिशय लहान, पिवळसर किंवा काळ्या रंगाचे कीटक असतात. ते पानांमधील रस शोषून घेतात.
पाने चुरगळणे - प्रादुर्भाव झालेली पाने वरच्या बाजूला वळतात.
वाढ खुंटणे - झाडाची शेंड्याची वाढ थांबते आणि झाड बुटके राहते.
चकाकी कमी होणे - पानांच्या खालच्या बाजूला पांढरट किंवा चंदेरी रंगाचे चट्टे दिसतात.
फुलांची गळ - मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास फुले गळून पडतात आणि फळांची सेटिंग होत नाही.
पाहूया यावर प्रभावी उपाय !
“ढोबळी मिरचीला द्या शिल्डचे संरक्षण – थ्रिप्सवर नियंत्रण, दर्जेदार उत्पादन!”
ढोबळी मिरचीवर थ्रिप्सचा प्रादुर्भाव? यावर मिळवा प्रभावी नियंत्रण!
ढोबळी मिरचीच्या फळांवर जाळीसारखे डाग, खरबरीत पृष्ठभाग आणि चमक कमी होणे ही थ्रिप्स मुळे होणारी सामान्य समस्या आहे. योग्य वेळी नियंत्रण घेतल्यास फळांचा दर्जा आणि उत्पादन दोन्ही टिकून राहते.
शिल्ड – प्रभावी नियंत्रण
✔ थ्रिप्स वर प्रभावी नियंत्रण
✔ पिकासाठी सुरक्षित व पर्यावरणपूरक
✔ फळांची गुणवत्ता आणि चमक टिकवून ठेवते
✔ उत्पादन वाढविण्यास मदत
💧प्रमाण : 2 मिली/लिटर
निष्कर्ष -
शिमला मिरचीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सुरुवातीच्या काळातच किडींचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. जर वेळेवर योग्य आणि प्रभावी उत्पादनाची फवारणी केली तर उत्कृष्ट परिणाम मिळतात.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !


Comments
Post a Comment