“दर्जेदार डाळिंब उत्पादनाचे रहस्य जाणूया - खत व्यवस्थापन आणि टप्प्यानुसार पोषण नियोजन”
“दर्जेदार डाळिंब उत्पादनाचे रहस्य जाणूया - खत व्यवस्थापन आणि टप्प्यानुसार पोषण नियोजन”
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
डाळिंब हे कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे आणि बाजारात चांगला दर मिळवून देणारे फळपीक आहे. मात्र अपेक्षित उत्पादन, फळांचा आकार, रंग, चव व साठवण क्षमता मिळवायची असेल तर योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि संतुलित खत व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
डाळिंब पिकाच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर त्याच्या अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे “एकाच वेळी सर्व खत” देण्यापेक्षा टप्प्यानुसार खत नियोजन केल्यासच उत्पादनात मोठी वाढ दिसून येते.
डाळिंब हे उच्च उत्पन्न देणारे व निर्यातक्षम पीक आहे. मात्र दर्जेदार फळ, चांगली फुलधारणा, फळधारणा व टिकाऊ उत्पादन मिळवण्यासाठी योग्य वेळी योग्य खत व फवारणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. खाली दिलेल्या शिफारशी शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित असून बहुतेक परिस्थितींमध्ये उत्कृष्ट परिणाम देतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाहूया, डाळिंब पिकातील खत व्यवस्थापनाचे महत्त्व -
- झाडांची मजबूत वाढ होते
- फुलगळ कमी होते
- फळधारणा चांगली होते
- फळांचा आकार, वजन व रंग सुधारतो
- फळ फुटणे (क्रॅकिंग) कमी होते
- उत्पादनासोबत दर्जाही वाढतो
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
डाळिंब पिकाच्या वाढीच्या अवस्था व खत व्यवस्थापन
1) बहार निवड व पूर्वतयारी (1.5 – 2 वर्षांचे झाड)
👉 खत व्यवस्थापन
NPK Concortia – 200 ग्रॅम / एकर
➜ मातीतील उपयुक्त जिवाणू वाढवून अन्नद्रव्य उपलब्धता सुधारते.
➜ झाडांना ताणातून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त.
2) रोप लागवड व प्रारंभिक अवस्था (0–6 महिने)
👉 या टप्प्यावर मुळांची वाढ आणि झाडाची स्थिरता महत्त्वाची असते.
शिफारस :
मुळांची जोमदार वाढ
अमिनोसान – 5 लिटर / एकर (ड्रिपद्वारे)
- पांढरी मुळे वाढतात
- अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते
- झाड तणावमुक्त होते
- मुळे खोलवर जातात
- झाडांची जोमदार सुरुवात होते
3) कळी व फुलधारणेसाठी व्यवस्थापन
शिफारस
टिरॉन मॅक्सिमा – 2.5 लिटर / एकर
फवारणी - चौकी अवस्थेत
अल्बेरो + टिबो + इतर बुरशीनाशक – आवश्यकतेनुसार – 2 मि.ली./लिटर + 1 मि.ली./लिटर
- कळी मजबूत होते
- फुलगळ कमी होते
- फुलधारणा एकसारखी येते
4) सेटिंग (Setting) व फळधारणा उत्कृष्ट होण्यासाठी तसेच पाकळी करपा रोखण्यासाठी
कॅलबॉर्न + रेंजर – 2 मिली/लिटर + 2 ग्रॅम/लिटर
- फळधारणा वाढते
- फळ गळ कमी होते
- फळाचा आकार सुधारतो
- पाकळी करपा रोखण्यासाठी
डाळिंब पिकातील फळधारणा टिकवून ठेवण्यासाठी
रोबुस्टा DF - 5 लिटर/एकर
- अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त
5) फळ वाढ व वजन वाढीसाठी
फळ वाढीसाठी -
किंग स्टार – 5 लिटर / एकर
- फळाचा आकार मोठा होतो
- वजन वाढते
- साल मजबूत होते
6) फळाची चकाकी व बाजारभाव वाढीसाठी
टिरॉन मॅक्सिमा – 2.5 लिटर / एकर
फळांना आकर्षक रंग व चकाकी
बाजारात जास्त दर मिळतो
यशस्वी डाळिंब शेतीसाठी शेतकरी मित्रांनी लक्षात ठेवावे !
✔ माती परीक्षणानुसार खत द्या
✔ एकाच वेळी जास्त खत देऊ नका
✔ सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे दुर्लक्ष करू नका
✔ पाणी व खत यांचा समतोल ठेवा
वरील शिफारस केलेल्या उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
https://krishibazaar.in/product/calborn-calcium-boron-gluconate
निष्कर्ष -
डाळिंब पिकात केवळ खत देणे महत्त्वाचे नाही, तर योग्य टप्प्यावर योग्य खत देणे हेच यशाचे खरे गमक आहे. शास्त्रीय खत व्यवस्थापन, ड्रिपद्वारे खत देणे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर केल्यास निश्चितच उच्च उत्पादन व उत्कृष्ट दर्जाची डाळिंबे मिळू शकतात.
योग्य वेळी योग्य खत व फवारणी व्यवस्थापन केल्यास डाळिंब पिकात – ✅ फुलधारणा चांगली होते
✅ फळधारणा टिकून राहते
✅ फळांचा दर्जा व वजन वाढते
✅ उत्पादन आणि नफा दोन्ही वाढतात
👉 डाळिंब उत्पादनात यश हवे असेल, तर पोषण व्यवस्थापनावर भर नक्की द्या!
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
.png)
Comments
Post a Comment