जाणून घेऊया, "रब्बी हंगामातील हरभरा उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान!"
जाणून घेऊया, "रब्बी हंगामातील हरभरा उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान!"
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकामध्ये हरभरा हे पीक आहे. हरभऱ्याचा उपयोग दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे बाजारात देखील याला नेहमी मोठ्या प्रमाणात मागणी असते.
त्यामुळं रब्बी हंगामात हरभरा पिकास जास्त प्राधान्य दिले जाते.
जाणून घेऊया,
रब्बी हंगामात हरभरा उत्पादन वाढीसाठी काही महत्वाच्या गोष्टी -
1)सुधारित वाणांचा उपयोग करावा, ज्याची रोग प्रतिकारक शक्ती जास्त असेल.
2)जमिनीची योग्य मशागत करावी सोबतच काळ्या जमिनीची निवड करावी
3) योग्य वेळेवर पिकास पाणी आणि खत पुरवठा
4) पेरणीवेळी पीकामधील योग्य अंतर
5)रोगराई आणि कीड पासून पिकाचे रक्षण
जमीन आणि पोषक हवामान -
हरभरा पिकासाठी काळी तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन वापरावी. पाणथळ आणि क्षारयुक्त जमिनीत हरभऱ्याची पेरणी टाळावी. तसेच हरभरा पिकासाठी थंड आणि कोरडे हवामान आवश्यक असते. या बरोबरच स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा हा गरजेचा असतो.
जमिनीची मशागत करताना कोणती काळजी घ्यावी -
हरभऱ्याची मुळे खोलवर जात असतात त्यामुळं मशागत करताना जमीन एकदम भुसभुशीत बनवावी. तसेच हेक्टरी 4 ते 5 टन शेणखत घालावे. तसेच योग्य प्रमाणात आणि वेळेत पिकास पाणी देणे सुद्धा खूपेप आवश्यक आहे.
पेरणीची योग्य वेळ:- हरभरा पेरणी ची योग्य वेळ ही सप्टेंबर च्या शेवटी किंवा 10 ऑक्टोबर पर्यंत करणे महत्वाचे आहे.
पेरणीसाठी बियांचे प्रमाण:-
हरभरा पेरणीसाठी बियांचे प्रमाण हे एक हेक्टर ला 100 किलो बियाणी वापरावे. तसेच काबुली जाती करीता 125 ते 130 किलो बियाणांचा वापर करावा.
हरभरा पिकासाठी बियाणांच्या सुधारित जाती:-
सुधारित बियाणांमध्ये विजय,विशाल,दिग्विज,विराट कृपा, पिकेव्हिके-2, पिकेव्हिके-4 इ..
आता, सर्वात महत्त्वाचे जाणून घेऊया, हरभरा पिकास देण्यात येणारी खते -
हरभरा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार दर्जेदार अश्या उत्पादनांची शिफारस करण्यात आली आहे -
👉🏻 सुरुवातीची वाढीची अवस्था- (15-35 दिवस)
पामेला (100 ग्रॅम/एकर) + फाॅस्फोरो (250 ग्रॅम/एकर) + अल्बा (50 मिली/एकर) + टिरॉन 12:61:00 (200 ग्रॅम/एकर)
▫️पानांवर काळोखी येण्यासाठी
👉🏻 फुलोरा अवस्था ( 45-65 दिवस)
▫️अधिक फुलकळी लागण्यासाठी
▫️फुलगळ रोखण्यासाठी
अमिनो गोल्ड (250 ग्रॅम/एकर) + कॅलबॉर्न (250 मिली/एकर) + टिरॉन 13:40:13 (200 ग्रॅम/एकर) + अल्बा (50 मिली/एकर)
👉🏻 घाटे भरण्याची अवस्था (70-100 दिवस)
▫️मर रोग टाळण्यासाठी
▫️दाणे टपोरे होण्यासाठी
▫️दाण्यांचे वजन वाढण्यासाठी
हल्क (250 मिली/एकर) + फायटर (250 मिली/एकर) + टिरॉन 00:00:50 (200 ग्रॅम/एकर)
हरभरा उत्पादन वाढीसाठी अश्याच दर्जेदार उत्पादनांचा वापर करा.
वरील उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
https://krishibazaar.in/product/pranil-agris-pamella
निष्कर्ष-
हरभरा पिकास योग्य बाजारभाव मिळण्यासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी पिकास आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !
.jpeg)
Comments
Post a Comment