द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी ची तयारी करताय? त्या पुर्वी पोषक किट नक्की वापरा व मिळवा दर्जेदार उत्पादन !

 द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी ची तयारी करताय? त्या पुर्वी पोषक किट नक्की वापरा व मिळवा दर्जेदार उत्पादन !




नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो,

द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी म्हणजेच (गोड छाटणी) हा फार महत्वाचा विषय आहे. यशस्वी द्राक्ष हंगामाची सुरुवात ह्याच छाटणी पासून होते.

द्राक्ष बागेत ऑक्टोबर महिन्यात छाटणी करणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. योग्य छाटणीमुळे नवीन फुटवे हे जोमदार निघतात, कोंबांची वाढ सशक्त होते आणि पुढील हंगामात दर्जेदार घड मिळण्यास मदत होते. पण जर छाटणीपूर्वी वेलींची योग्य पोषणद्रव्यांनी जोपासना केली नाही, तर झाड कमजोर राहते आणि  द्राक्ष उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

द्राक्ष हंगाम खर्‍या अर्थाने गोड करण्यासाठी ऑक्टोबर छाटणीपूर्वी वापरा दर्जेदार अश्या जिवाणू खतांचे मिश्रण असलेले किट -  "पोषक किट" 

♻️ पोषक किट" द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीपूर्वी (ड्रिपद्वारे) वापरल्याने होणारे फायदे -

▫️मातीतील आवश्यक NPK, फॉस्फरस आणि झिंकचे विद्राव्य रूपात उपलब्धता वाढवते.

▫️मुळांची वाढ व फैलाव सुधारते, त्यामुळे छाटणीनंतर जलद बाग फुटते.  

▫️झाडांना अधिक ताकद व रोगप्रतिकारशक्ती मिळते. 

▫️मातीतील सूक्ष्मजीव संतुलन राखून पोषणक्षमता वाढवते. 

▫️सी-वीड अर्कामुळे कोंबांची वाढ सशक्त होते.  

▫️छाटणीनंतर बाग एकसमान फुटण्यास मदत होते.

▫️रासायनिक खतांवरील खर्च २५-३० % नी कमी होतो.  


❇️ वापरण्याचे प्रमाण -

१ किट/एकर ड्रिपमधून

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

❇️ पोषक किटमध्ये काय असते?

1. NPK कन्सॉरशिया

2. फॉस्फरस विरघळवणारे जीवाणू (PSB)

3. मायकोरायझा

4. झिंक विरघळवणारे जीवाणू (ZSB)

5. सीवेड अर्क (Sea Weed Extract)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीपूर्वी पोषक किट देणे अत्यंत फायदेशीर ठरते.

पोषक किट देण्याचे फायदे बघूया, अगदी सविस्तरपणे -

1. मुळे मजबूत होतात – झाडाला छाटणीनंतर पुन्हा वाढीसाठी भरपूर उर्जा लागते. पोषक किटमुळे मुळांची कार्यक्षमता वाढते.

2. नवीन फुटव्यांची जोमदार वाढ – छाटणीनंतर निघणारे फुटवे हिरवे, जाडसर व तंदुरुस्त राहतात.

3. द्राक्ष काडीत तसेच द्राक्ष झाडात अन्नद्रव्यांचा साठा तयार होतो – नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सूक्ष्मअन्नद्रव्ये यांच्या संतुलित पुरवठ्यामुळे द्राक्ष झाडात आवश्यक साठा तयार होतो.

4. रोगप्रतिकारशक्ती वाढते – छाटणीनंतर झाडावर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, पोषक किट झाडांना आतून बळकटी देते त्यामुळे झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

5. द्राक्ष घडांची गुणवत्ता सुधारते – छाटणीनंतर जोमदार वाढ झाल्यास पुढील हंगामातील घडांचा आकारमान, मण्यांचा  रंग व गोडी चांगली राहते.


पोषक किट उत्पादन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी -

https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit


निष्कर्ष -

शेतकरी मित्रांनो, द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीपूर्वी पोषक किटचा वापर केल्यास बागेचा पाया मजबूत होतो आणि पुढील हंगामाचे उत्पादन भरगोस मिळते.


आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !