पिकांमध्ये फुलगळ व फळगळ का होते ? जाणून घेऊया त्यावरील उपाययोजना

 पिकांमध्ये फुलगळ व फळगळ का होते ? जाणून घेऊया त्यावरील उपाययोजना 



नमस्कार शेतकरी मित्रांनो,

खेतीवालेभैय्या ह्या ब्लॉग पेज वर आपले सहर्ष स्वागत !

आजचा ब्लॉग विषय आहे पिकांमध्ये फुलगळ व फळगळ का होते , त्याची कारणे नेमकी कोणती व त्यावरील उपाययोजना. 

आम्ही घेऊन येतोय खास आपल्यासाठी असेच नवनवीन माहितीचे विषय !

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पिकांमध्ये फुलगळ (Flower Drop) आणि फळगळ (Fruit Drop) या समस्या जाणवत असतात. या समस्या जर वेळेत लक्षात घेतल्या नाहीत, तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. याचे अनेक कारणे असतात आणि योग्य व्यवस्थापनाने ही समस्या टाळता येते.

जाणून घेऊया, फुलगळ व फळगळ होण्याची प्रमुख कारणे कोणती ?

1. पिकांना अनुकूल नसलेले वातावरण 

2. जास्त उष्णता, थंडी किंवा पावसामुळे फुलांची व फळांची गळ होते.

3. वाऱ्याचा जोरही फुलं गळण्यास कारणीभूत ठरतो.

4. सर्वात महत्वाचे कारण म्हणजे - पोषक तत्वांची कमतरता

5. बोरॉन, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम यांची कमतरता फुलं व फळं गळण्यास कारणीभूत ठरते.

6. नत्राचे अति प्रमाण असले तरी फुलगळ होते.

7. पाण्याचा अभाव किंवा अति पाणी दिल्यास मूळांना धक्का बसतो व फुलगळ होते.

8. रोग व कीड यांचा प्रादुर्भाव:

9. फुलांच्या अवस्थेत जर अळी किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव असेल तर फुलं व फळं गळतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पिकामध्ये फुलगळ, फळगळ होऊ नये म्हणून काय करावे?

- पिकाची फुलोरा अवस्था सुरु असताना कॅल्शिअम व बोरॉनची कमतरता फुलगळ होण्यास कारणीभूत ठरते. कॅल्शिअम हा पेशीनिर्मिती तसेच पेशी भित्तिकेसाठी महत्वाचा भाग आहे. 

- कॅल्शिअममुळे पेशीभित्तिका मजबूत होते व बोरॉन हा कॅल्शिअमच्या वहनासाठी मदत करतो.

- त्यामुळे कॅल्शिअम व बोरॉनच्या एकत्रित वापराने फुलांचा देठ घट्ट चिकटून राहतो व फुलांचे फळामध्ये रूपांतर होण्यासाठी मदत होते.

- फुलांची आणि फळांची संख्या वाढते,  जास्त फुले आणि फळे लागतात. 

- फळांची गुणवत्ता सुधारते

- कॅल्शियम आणि बोरॉन फळांच्या वाढीस आणि विकासास मदत करतात, ज्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते. 

- कॅल्शियम पेशींच्या भित्तिका मजबूत करते, ज्यामुळे पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

- कॅल्शियम आणि बोरॉन एकत्रितपणे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वांचे शोषण सुधारतात, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. 

पिकामध्ये फुलगळ व फळगळ  होऊ नये यासाठी आम्ही घेऊन आलोय खास आपल्यासाठी 

कॅल्शियम आणि बोरॉन चे अद्भुत मिश्रण!

👉🏻 कॅलबॉर्न 

जो देतो पिकांना ग्लुकोनेट स्वरूपात कॅल्शियम आणि बोरॉन

♻️ फायदे - 

1. ग्लुकोनेट स्वरूपात असल्याने अन्नद्रव्यांची विद्राव्यता जास्त असते.

2. त्यामुळेच ते मुळांद्वारे किंवा पानांद्वारे सहज शोषले जातात.

3. फुलधारणा तसेच फळधारणा सुधारते.

4. फुलगळ होण्यापासून थांबते.

5. उत्पादनात वाढ होते.


वापरण्याचे प्रमाण  - 2 मिली/लिटर


2. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (मायक्रोन्युट्रियंट्स) योग्य वापर करावा – विशेषतः बोरॉन, झिंक, कॅल्शियम.

यावर एक खास उत्तर - रोबस्टा डीएफ (सूक्ष्म अन्नद्रवांचे अनोखे असे मिश्रण )

पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता नाहीशी करते, व फळांस देते उत्तम पोषण!

 ♻️ फायदे -

1. फळ झाडांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.

2. झाडांना संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करून देते.

3. झाडांना लवकर उपलब्ध होऊन फळांची वाढ चांगली होते.

4. फळांची साल मजबूत होते.

5. दर्जेदार उत्पादन मिळते.


❇️ वापरण्याचे प्रमाण - 

➖ ड्रिप द्वारे - 5 लिटर/एकर 


निष्कर्ष - 

योग्य उत्पादनांचा वापर केल्यास, पिकांमध्ये येणारी फुलगळ व फळगळी ची समस्या टाळता येते. उत्पादनात निश्चितच वाढ होते. 



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !