जमिनीचा सामू (pH) अत्यंत महत्त्वाचा !!

 जमिनीचा सामू (pH) अत्यंत महत्त्वाचा !!




शेतकरी बांधवांनो,

पीक उत्पादनात भरघोस यश मिळवण्यासाठी जमिनीची योग्य निगा राखणे अत्यंत आवश्यक असते. त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे "जमिनीचा सामू" (pH).

जमिनीचा सामू हा मातीमध्ये एक प्रमुख बदल घडवणारा घटक आहे. हा बदल जमिनीतील अनेक रासायनिक (Chemical) आणि जैवरासायनिक (Biochemical) प्रक्रिया नियंत्रित करत असतो.

- सामू (pH) हा जमिनीतील आम्लता किंवा क्षारतेचे प्रमाण दर्शवतो.


चला तर जाणून घेऊया सामूचे महत्त्व, योग्य प्रमाण, आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम.

सामू म्हणजे काय?

सामू (pH) हे मातीचे रासायनिक गुणधर्म मोजणारे मापक आहे. याचा स्केल 0 ते 14 पर्यंत असतो.

1. pH 7 =  (Neutral)

2. pH < 7 = आम्लीय (Acidic)

3. pH > 7 = क्षारीय (Alkaline)


सामू चा अन्नद्रव्यांच्या रासायनिक अभिक्रियांवर (Chemical Reactions) देखील प्रभाव पडतो.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जाणून घेऊया, जमिनीच्या सामूचे महत्त्व

1️⃣ अन्नद्रव्यांची उपलब्धता

पिकांना लागणारी अन्नद्रव्ये जसे की नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये (झिंक, लोह इ.) यांचे शोषण योग्य pH मध्येच चांगले होते. 

सामू जास्त आम्लीय किंवा क्षारीय असल्यास अन्नद्रव्ये उपलब्ध असूनही झाडांना मिळत नाहीत.


1. नायट्रोजन (नत्र)

- नत्र हे पिकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक मुख्य अन्नद्रव्य आहे.

- जमिनीत नत्राची उपलब्धता ही नाट्रिफिकेशन आणि अमिनोफिकेशन ह्या प्रक्रियेद्वारे होते, सामूद्वारे ही प्रक्रिया प्रभावित होते.

- पिकांमध्ये नायट्रोजन उपलब्ध होण्यासाठी जमिनीचा सामू (pH) 6 ते 7.5 असणे आवश्यक असते.

Nitrification

Ammonification



2. स्फुरद -

- प्रकाश संश्‍लेषण आणि न्यूक्लिक ऍसिड च्या निर्मितीसाठी फार महत्वाचे असते.

- स्फुरद ची उपलब्धता प्रामुख्याने 6.5 च्या जमिनीच्या सामूवर सर्वात जास्त असते. 

Photosynthesis Process


3. पालाश (पोटॅशियम)

- आम्लयुक्त मातीत पोटॅशियम वाहून जमिनीच्या खाली जाऊ शकतो.

- सामू 5.5 ते 8 दरम्यान असल्याने बहुतेक पिकांसाठी सामू उपलब्ध होतो.


सूक्ष्म अन्नद्रव्ये

लोह, मॅंगनीज, झिंक, काॅपर, बोरॉन यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता जमिनीच्या सामूद्वारे खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असते.

आम्लयुक्त जमिनीत हे सूक्ष्म अन्नद्रव्ये अधिक विरघळतात आणि सहज उपलब्ध होतात.


2️⃣ सूक्ष्मजीवांचे कार्यावर देखील परिणाम 

सेंद्रिय खतांमधील फायदेशीर जिवाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्मजीव जमिनीतील सामू योग्य असल्यास सक्रिय राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते.


3️⃣ खतांचा परिणामकारक उपयोग

जर सामू अयोग्य असेल, तर रासायनिक किंवा जैविक खतांचा (Biofertilizers) पूर्ण फायदा पिकांना मिळत नाही.


4️⃣ पिकांच्या वाढीवर प्रभाव 

जमिनीचा सामू हा केवळ पोषक घटकांच्या उपलब्धतेवर परिणाम करत नाही, तर पिकांच्या मुळांवर आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या क्रियांवर देखील परिमाण होतो.

सामू योग्य असल्यास पिकाची वाढ निरोगी होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादनात वाढ होते.


📊 योग्य सामू (pH) किती असावा?

1. भाजीपाला पिके - 6.0 - 7.5

2. फळबाग पिके - 6.0 - 7.5

3. ऊस - 6.5 - 7.5

4. डाळी/तृणधान्य - 6.0 - 7.0

5. भात (तांदूळ) - 5.5 - 6.5


🔍 सामू कश्याने मोजला जातो?



1. डिजिटल pH मीटर

2. pH किट

3. लॅब चाचणी (माती परीक्षण)

सामू योग्य ठेवला तर अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते आणि उत्पादनात वाढ होते.


निष्कर्ष - 

"सुधारित सामू म्हणजे वाढलेले उत्पादन!"

सामू हा एक प्रभावशाली घटक आहे.  जो शेतीच्या यशात मोलाची भूमिका बजावतो. म्हणून शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीचा pH समजून घेणे आणि त्यानुसार योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे..



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !