फळ तसेच भाजीपाला पिकांसाठी सिलिकॉन युक्त पोटॅश खताचा वापर ठरतोय अत्यंत फायदेशीर !

 फळ तसेच भाजीपाला पिकांसाठी सिलिकॉन युक्त पोटॅश खताचा वापर ठरतोय अत्यंत फायदेशीर !


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

पोटॅश खताचा वापर ह्या पिकांसाठी फायदेशीर तर ठरतो, परंतु सिलिकॉन युक्त पोटॅश खत हे एकदा आपल्या पिकांसाठी वापरून तर बघा. आपणांस याचे फायदे काय होतात हे विचारण्याची देखील गरज भासणार नाही, कारण याचे फायदे आपण स्वतः अनुभवाल !

आजचा जो ब्लॉग चा आपला विषय आहे तो ह्याच संदर्भात आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वप्रथम जाणून घेऊया पोटॅश खताचे फायदे -

1. फळधारणा व फळांची गुणवत्ता वाढवते

– पोटॅशमुळे फळांची साईझ, रंग, गोडवा आणि टिकाऊपणा वाढतो.


2. पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते

– झाडांची सहनशक्ती बळकट होते आणि ती हवामानातील ताण सहन करतात.


3. मुळांची आणि कंदांची वाढ सुधारते

– कंदवर्गीय (जसे की बटाटा, आले, हळद) पिकांमध्ये मोठे आणि गाठीदार कंद तयार होतात.


4. पाण्याचा वापर कार्यक्षम करते

– झाडांमध्ये पाण्याचे शोषण आणि साठवण योग्य प्रकारे होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता आपण जाणून घेऊया, सिलिकॉन युक्त पोटॅश खताचे विशेष फायदे नेमके कोणते आहेत ?

सिलिकॉन युक्त पोटॅश खताचे विशेष फायदे:

1. पिकांना बळकट करते.

– सिलिकॉनमुळे पानांचे आणि खोडांचे बाहेरचे आवरण हे कठीण होते, ज्यामुळे कीड व रोगांना प्रतिबंध होतो.


2. उष्णता व कोरड्या ताणास प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. 

– सिलिकॉन वनस्पतीला तणावपूर्ण हवामानात सुद्धा चांगली वाढ करण्यास मदत करते.


3. क्लोरोफिल निर्मितीस चालना मिळते. 

– पानांमध्ये हरितद्रव्य (chlorophyll) वाढते आणि प्रकाशसंश्लेषण वाढते.


4. क्रॅकिंग कमी होते.

– फळांच्या सालीला मजबुती मिळाल्यामुळे त्याचे फुटणे कमी होते.


5. मातीतील पाणी व अन्नद्रव्य शोषणात सुधारणा होते.

– सिलिकॉन मुळ्यांच्या आजूबाजूला एक फिल्म तयार करतो, ज्यामुळे अन्नद्रव्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात. 


वरती दिलेल्या माहिती नुसार आपण पोटॅश व सिलिकॉन युक्त पोटॅश खताचे फायदे जाणून घेतले, यात आपल्याला जो फरक जाणवला तो म्हणजे पिकांना सर्वोत्तम रोगप्रतिकारक शक्ती मिळवून द्यायची असेल, विविध रोगांपासून उत्तम संरक्षण आणि पिकांना मजबुती द्यायची असेल तर सिलिकॉन युक्त पोटॅश खतचं फायदेशीर ठरू शकते. 


त्यासाठीच आम्ही खास आपलया साठी घेऊन आलोय टिरॉन नुट्रीशन चे टिरॉन मॅक्सिमा (Potash Fortified with Silicon)

पोटॅशियम आणि सिलिकॉन चे अद्वितीय असे एकत्रीकरण!

👉🏻 टिरॉन मॅक्सिमा (Potash Fortified with Silicon)

भाजीपाला तसेच फळपिकांसाठी उत्कृष्ट ठरलेले दर्जेदार उत्पादन!🍅🌱🍇🫑🌶️🍆


♻️ टिरॉन मॅक्सिमा चे घटक -

↪️ पोटॅशियम ऑक्साईड (K₂O) - 18%

↪️ ऑर्थोसिलिसिक ऍसिड(Si(OH)₄) - 12%


❇️ पिकांना होणारे फायदे -

🔸पिकांची प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया अधिक कार्यक्षम होते,  त्यामुळे पाने गडद हिरवीगार राहतात.

🔸पिकांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

🔸पिकांची पाने, खोड आणि फळे अधिक मजबूत व टिकाऊ होतात.

🔸सिलिकॉन च्या उपलब्धतेमुळे पिकांना रोग आणि किडींपासून उत्तम संरक्षण मिळते.

🔸फळधारणा चांगली होते.

🔸फळांची गुणवत्ता (आकार, रंग, वजन, गोडवा) सुधारते.

🔸पिकांची टिकवण क्षमता सुधारते.

🔸उत्पादनात वेगाने वाढ होते.


💠 पिकांमध्ये वापरण्याचे योग्य टप्पे-

↪️ पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत 

↪️ फुलोरा आणि फळधारणेच्या अवस्थेत 

↪️ फळ विकास अवस्थेत (फळांचा आकार, वजन, टिकाऊपणा)

Vegetative Growth Stage


Flowering - Fruit initiation stage


Fruit Development Satge


💧वापरण्याचे योग्य प्रमाण - 2.5 लिटर/एकर 


👉 निष्कर्ष

पोटॅश खत हे फळधारणा, गुणवत्ता आणि झाडांची सहनशक्ती वाढवते.

तर,  सिलिकॉन युक्त पोटॅश खत हे त्यात अधिक फायदे जोडते, जसे की रोग व ताण प्रतिकारकता, पानांची मजबुती आणि अन्नद्रव्य शोषणात सुधारणा.

जर तुम्हाला पिकांमध्ये अधिक उत्पादन व टिकाऊपणा हवा असेल, तर सिलिकॉन युक्त पोटॅश खताचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो.



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !