जाणूया झिंक चे पिकांमधील महत्वपूर्ण फायदे!

जाणूया झिंक चे पिकांमधील महत्वपूर्ण फायदे !


नमस्कार शेतकरी बांधवांनो,

आजचा आपला ब्लॉग चा जो विषय आहे, तो म्हणजे पिकांमध्ये झिंक ह्या अन्नद्रव्याचे महत्व !

शेतकरी मित्रांनो आपणांस ठाऊकच असेल कोणत्याही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ही पिकाला भासली की त्याचे परिणाम हे पिकांवर दिसत असतात. इतर कोणत्याही अन्नद्रव्याने त्या अन्नद्रव्याची कमतरता ही भरून काढता येत नाही. 

पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच उच्च गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी झिंक हे अन्नद्रव्य फार महत्वपूर्ण ठरते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

👉🏻 पिकांमध्ये झिंकच्या कमतरतेची लक्षणे कोणती नेमकी कोणती आहे ?

झिंकच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते.

पाने वळू लागतात.

झिंकच्या कमतरतेमुळे पिकांत विविध रोग होण्याची शक्यता वाढते.

झाडाची पाने लहान राहतात.

नवीन पाने खालच्या बाजूने पिवळी पडू लागतात. 

फळपिकांचा तसेच भाजीपाला पिकांचा विकासाचा व परिपक्वतेचा कालावधी वाढतो.  

Effect of Zinc Imbalance in Plants

Zinc Deficiency in plants


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

👉🏻 झिंकचे फायदे काय आहेत?

🔹 झिंक वनस्पतींमध्ये क्लोरोफिल (हरितद्रव्य) तयार करण्यास मदत करते.

🔹 नायट्रोजन पचवण्याची वनस्पतींची क्षमता वाढवते.

🔹 विविध पिकांमध्ये प्रकाश शोषण्यास मदत होते.

🔹 झिंक वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिन्स (Auxins) सारख्या हार्मोनच्या निर्मितीत मदत करतो, जे प्रामुख्यने मुळांच्या वाढीस चालना देतात तसेच पिकांच्या शेंडयाच्या वाढीसाठी महत्वाचे ठरतात. 

🔹 पिकांमधील ऑक्सिजन च्या निर्मितीसाठी झिंक फार महत्वाचे ठरते. 

🔹 योग्य वेळी झिंक पिकांना दिल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते. 

🔹 झिंकच्या वापरामुळे फुले अधिक प्रमाणात येतात व फळधारणा सुधारते, ज्यामुळे उत्पादन वाढते. 

🔹 झिंक पिकांच्या रोग प्रतिकारशक्तीला बळकट करतो, त्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांपासून पिकांना संरक्षण मिळते.

🔹 पिकांना झिंकचा योग्य पुरवठा झाल्यास पिकांमध्ये पोषणमूल्ये वाढतात, त्यामुळे धान्य गडद व चकाकीदार, फळे मोठी व चवदार आणि भाज्या टिकाऊ होतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतकरी मित्रांनो, 

आपण झिंक च्या कमतरतेची लक्षणे बघितली तसेच पिकांमध्ये झिंक चे फायदे देखील अभ्यासले. 

पिकांना झिंक ऑक्सिईड च्या फॉर्म मध्ये झिंक उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आपणास शिफारस करत आहोत एका दर्जेदार उत्पादनाची !

टिरॉन नुट्रीशन चे झिंकॉन  जे भरून काढते पिकांची झिंक ची कमतरता व पिकास देते सवोत्तम पोषण !

पिकांवर उत्कृष्ट काळोखी येण्यासाठी तसेच पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी 

झिंक ऑक्‍साइड युक्त असलेले दर्जेदार व अगदी प्रभावी उत्पादन 👉🏻 झिंकाॅन


💥 फायदे -

▫️निरोगी पिकाची वाढ होते.

▫️पिकावर उत्कृष्ट काळोखी येते.

▫️पिकाची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

▫️धान्य पिकांमध्ये दाणे भरण्यासाठी अत्यावश्यक 

▫️दाण्यांची गुणवत्ता वाढते.

▫️उत्पादनात 20-25% पर्यंत वाढ होते. 


💧वापरण्याचे प्रमाण - 1.5 मिली/लिटर 


झिंकाॅन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -

https://krishibazaar.in/product/tiron-zincon-zinc-oxide




आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !