टोमॅटो पिकात येणाऱ्या किडींचे आणि रोगांचे योग्य व्यवस्थापन करून मिळवा दर्जेदार उत्पादन !
टोमॅटो पिकात येणाऱ्या किडींचे आणि रोगांचे योग्य व्यवस्थापन करून मिळवा दर्जेदार उत्पादन !
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
टोमॅटो पिकाचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यावर येणाऱ्या किडींचे आणि रोगांचे योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते. खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग च्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत शेतीसंदर्भात नवनवीन व अगदी महत्वाची अशी माहिती देत असतो.
ह्या ब्लॉग मध्ये आपण टोमॅटो पिकावर येणारे कीड आणि रोग आणि त्यावर प्रभावी नियंत्रण कसे मिळवायचे? याबाबतची माहिती घेणार आहोत.
टोमॅटो (Tomato) पिकात अनेक प्रकारच्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो. योग्य वेळेवर नियंत्रण न घेतल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. खाली टोमॅटो पिकातील प्रमुख किडी व रोगांची लक्षणे व त्यांचे प्रभावी नियंत्रण यांची माहिती दिली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔰 टोमॅटो पिकात येणाऱ्या किडी आणि त्यांचे व्यवस्थापन -
1. फळ पोखरणारी अळी (Fruit borer – Helicoverpa armigera)
🔰 लक्षणे -
- टोमॅटो पिकात हि अळी फळात छोटे छिद्र करते व आतून फळ खाते.
- अळीने फळे खाल्यामुळे फळे खराब होतात आणि झाडावरच कुजून जातात.
🔰 फळ पोखरणाऱ्या अळीवर नियंत्रण कसे मिळवायचे ?
ह्या अळीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मॉर्डर ह्या प्रभावी उत्पादनाचा वापर नक्की करा.
🔰वापरण्याचे प्रमाण - 2 मिली/लिटर
2. रसशोषक किडी - (फुलकिडे, मावा, तुडतुडे)
- फुलकिडे हे आकाराने छोटे असतात आणि ते पिवळसर व काळसर रंगाचे असतात.
- रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे झाडे वाळतात.
रसशोषक किडींवर अगदी परिणामकारक असे नियंत्रण मिळविण्यासाठी शिल्ड ह्या प्रभावी जैविक कीटकनाशनाकचा वापर करावा.
🔰 वापरण्याचे प्रमाण - 2 मिली/लिटर
3. पांढरी माशी -
- पांढरी माशी ही पानातील रसशोषून घेते, त्यामुळे पाने पिवळी पडतात.
- पांढर्या माशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फुलगळ होते आणि फळधारणा देखील होत नाही.
पांढऱ्या माशीवर अगदी परिणामकारक असे नियंत्रण मिळविण्यासाठी शिल्ड ह्या प्रभावी जैविक कीटकनाशनाकचा वापर करावा.
🔰 वापरण्याचे प्रमाण - 2 मिली/लिटर
4. नागअळी /पाने खाणारी अळी -
- ही अळी पानांवर पांढर्या नागमोडी रेषा पाडते.
- पानांचा आतील भाग कुरतडते.
- ह्या अळीमुळे पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते.
🔰 नियंत्रण-
- नागअळीच्या नियंत्रणासाठी गार्ड ह्या प्रभावी उत्पादनाचा वापर फयदेशीर ठरतो
🔰 वापरण्याचे प्रमाण - 2 मिली/लिटर
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🍂 टोमॅटो पिकात येणारे रोग आणि त्यांचे व्यवस्थापन -
1. टोमॅटो पिकातील करपा रोग -
🔰 टोमॅटो पिकावर लवकर येणारा करपा (Early Blight in tomato)
🔰 टोमॅटो पिकावर उशिरा येणारा करपा ( Late Blight in tomato)
🔰 करपा हा एक बुरशीजन्य रोग असून, याची लक्षणे ही रोपाच्या पानांवरती सहजपणे दिसून येतात.
🔰 करपा रोग हा बियाणे व जमिनीतील बुरशीमुळे होतो.
🔰 त्याचप्रमाणे झाडाचे रोगग्रस्त अवशेष हवा पाणी व कीटकांमार्फत या रोगाचा प्रसार होतो.
1. लवकर येणारा करपा (Early Blight)
🔰लक्षणे
- पानांवर लहान, वर्तुळाकार, गडद तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
- ठिपक्यांच्या भोवती पिवळ्या रंगाची कडा दिसते.
- ठिपके वाढून पाने पिवळी पडून गळतात.
- देठांवर आणि फांद्यांवर गडद रंगाचे चट्टे दिसू शकतात.
- फळांवर खोलगट, काळे-तपकिरी डाग पडतात.
2. उशीरा करपा (Late Blight – Phytophthora infestans)
🔰लक्षणे
- पानांवर मोठे, अनियमित आकाराचे, गडद तपकिरी ते काळे डाग दिसतात.
- पानाच्या खालील बाजूला बुरशीचा पांढरा थर दिसू शकतो.
- फांद्या आणि देठांवर गडद रंगाचे चट्टे दिसतात.
- फळांवर गडद, चट्टे असलेले डाग दिसतात आणि फळे सडतात.
🔰 नियंत्रण:
टोमॅटो पिकात येणाऱ्या लवकर आणि उशिरा येणाऱ्या करप्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रेंजर ह्या प्रभावी जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा.
🔰वापरण्याचे प्रमाण - २ ग्रॅम/लिटर
निष्कर्ष -
टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढवायचे असल्यास प्रभावी अश्या उत्पादनांचा वापर करणे फार फायदेशीर ठरते. रोगाचे आणि'किडींचे वेळीच योग्य व्यवस्थापन केल्यास निश्चितच उत्पादन वाढते.




.png)
.png)

Comments
Post a Comment