पिकांमध्ये पिवळेपणा दिसतोय ? जाणून घेऊया पिकांमध्ये पिवळेपणा येण्याची कारणे व त्यावरील उपाययोजना .
पिकांमध्ये पिवळेपणा दिसतोय ? जाणून घेऊया पिकांमध्ये पिवळेपणा येण्याची कारणे व त्यावरील उपाययोजना.
शेतकरी बंधूंनो,
आजच्या ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, पिकांमध्ये पिवळेपणा येण्याची कारणे कोणती आहेत. व त्या कारणांवर आपण कशी मात करू शकतो.
तसेच पिकांमध्ये पिवळेपणा येऊ नयेत म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो याची देखील माहिती आपण ह्या लेखात घेणार आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बऱ्याच वेळा आपण पाहतो कि विविध पिकांचे नियोजन करत असतान , पिकांमध्ये विविध कारणांमुळे पिवळेपणा दिसत असतो, पिकांमध्ये पिवळेपणा येण्याची नेमकी कोणती कारणे ते आपण पाहूया.
प्रमुख कारणे खालील प्रमाणे -
१) पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता
२) रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
३) शेतातील पाण्याचे अनियमित असे नियोजन
४) वातावरणात होणारे बदल
प्रमुख कारणांची सविस्तर माहिती पाहूया
१) पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता -
शेतातील अन्नद्रव्ये (मुख्यतः नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये) निचरा होऊन (leaching) मातीतून बाहेर गेल्यास पिकांमध्ये पिवळेपणा येऊ शकतो. याला 'पोषक तत्वांची कमतरता' असे म्हणतात.
अन्नद्रव्यांचा निचरा (Leaching)
जेव्हा जास्त प्रमाणात पाणी जमिनीत मुरते, तेव्हा ते सोबत घेऊन अन्नद्रव्ये मातीच्या खालच्या स्तरात जातात, जिथे पिकांना ती सहज उपलब्ध होत नाहीत. यामुळे पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते.
पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पिकांना अन्नद्रव्यांची गरज भासत असते. पिकांना अन्नद्रव्ये वेळेवर मिळणे फार महत्वाचे असते, ती अन्नद्रव्ये वेळेवर पिकाला मिळाली नाहीत तर पिकातील अन्नद्रव्ये कमी होऊन पिवळेपणा अधिक वाढतो. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये जर कमी मिळाली, तर त्याचा थेट परिणाम पिकाच्या पानांवर होतो, आणि पाने पिवळी होऊ लागतात. पिकांना आवश्यक असणाऱ्या काही मुख्य अन्नद्रव्यांची मात्रा कमी झाल्यास पिकामध्ये पिवळेपणा दिसू लागतो.
काही मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता दिसते जसे कि,
१) नत्र
पिकामध्ये नत्र हे अन्नद्रव्ये प्रथिने, क्लोरोफिल आणि विविध जीवनसत्वांच्या निर्मितीसाठी गरजेचे आहे. नायट्रोजनची कमतरता झाल्यास जुन्या पानांपासून पिवळेपणा सुरू होतो, तसेच पिकाच्या शाखीय वाढीसाठी नत्र अन्नद्रव्य आवश्यक असल्याने पिकाची वाढ देखील खुंटते आणि हरितद्रव्ये तयार न झाल्याने पिकामध्ये पिवळेपणा अधिक वाढतो.
२) मॅग्नेशियम
मॅग्नेशियम क्लोरोफिलचा मुख्य घटक आहे. त्याची कमतरता झाल्यास पानांचे मधोमधले भाग पिवळसर होतात.
३) पोटॅशियम
पोटॅशियमची कमतरता पानांच्या कडा कोरड्या आणि पिवळ्या होण्यास कारणीभूत ठरते, तसेच झाडाचा रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
४) फॉस्फरस
फॉस्फरसची कमतरता झाडाच्या वाढीत अडथळा आणते, झाड कमजोर होते आणि पाने पिवळी होण्याची शक्यता वाढते.
या पोषणतत्त्वांची कमतरतेमुळे पिकांमधील क्लोरोफिल निर्मितीत अडथळा येतो, ज्यामुळे पाने पिवळी पडतात.
२) रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
पिकामध्ये पिवळेपणा येण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे पिकांमध्ये येणाऱ्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव. रसशोषक किडी पिकांमधील रस शोषून घेतात, या किडी पानांच्या तसेच पिकाच्या कोवळ्या भागावर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करतात ज्यामुळे पिकातील हरितद्रव्ये पूर्णपणे संपल्याने पिकांची वाढ देखील होत नाही यातीलच काही मुख्य घटक म्हणजे पांढरी माशी, फुलकिडे, मावा, आणि तुडतुडे कीड यांसारख्या किडी जास्त प्रादुर्भाव करतात तसेच याच किडींमुळे पिकामध्ये पिवळेपणा यायला सुरवात होते.
३) पाण्याचे अनियमित नियोजन
पीक कोणतेही असो पिकाला पाण्याचे योग्य नियोजन देणे गरजेचे असते जेणेकरून पिकातील वाढीची प्रक्रिया सुरळीतपणे चालते जर पिकामध्ये पाणी जास्त प्रमाणात झाले तर पिकाची पांढरी मुळी पूर्णपणे ब्लॉक होऊन जाते ज्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये पिकाला मिळत नाही तसेच मुळी सडल्याने पिकाची वाढीची गती पूर्णपणे थांबून जाते. जर झाडाला आवश्यक त्या प्रमाणात पाणी मिळाले नाही, तर झाड ताणतणावाखाली येते. त्याचा परिणाम म्हणजे पाने कोरडी होऊन पिवळी होऊ लागतात. यामुळे क्लोरोफिलची निर्मिती कमी होते.
४) वातावरणातील बदल
पीक हवामानातील बदलांसाठी अधिक संवेदनशील असते. अचानक होणारे हवामान बदल झाडावर ताण निर्माण करतात. उष्णतेत अचानक वाढ किंवा कमी झाल्यास पिकामध्ये क्लोरोफिल निर्मिती यावर परिणाम होतो. झाड ताणतणावाखाली येते आणि पाने पिवळी पडतात. अधिक हवामानामध्ये पाण्याचा अधिक वापर होतो, झाडाला पाण्याची कमतरता भासू शकते. यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील सर्व कारणांवर काही महत्वाच्या अश्या उपाययोजना आपण पाहणार आहोत.
1. अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी रोबस्टा डीएफ
सर्व पिकांसाठी उपयुक्त असलेले व अत्यंत फायदेशीर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अद्वितीय असे मिश्रण 👉🏻 रोबस्टा डीएफ
जे पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता नाहीशी करते, तसेच पिकांचा पिवळे होण्या पासून रोखते व पिकांस देते उत्तम पोषण !
🔹 रोबस्टा डीएफ वापरण्याचे फायदे -
✅ पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
✅ पिकांना संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करून देते.
✅ पिकांस लवकर उपलब्ध होऊन पिकांची उत्कृष्ट वाढ होते.
✅ दर्जेदार उत्पादन मिळते.
🔹 रोबस्टा डीएफ वापरण्याचे प्रमाण - २ किलो/एकर
2. रस शोषक किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रणिल ऍग्री चे दर्जेदार व प्रभावी असे जैविक कीटकनाशक 👉🏻 शिल्ड
🔹शिल्ड वापरण्याचे प्रमाण - २ मिली/लिटर

Comments
Post a Comment