काय आहे द्राक्ष काडी वरील बोट्रोडीप्लोडिया, अर्थातच काडी मर रोग ?
काय आहे द्राक्ष काडी वरील बोट्रोडीप्लोडिया, अर्थातच काडी मर रोग ?
द्राक्ष बागायतदार बंधूंनो,
द्राक्ष बागेत खरड एप्रिल छाटणी केल्यानंतर तसेच गोड छाटणी (October Pruning) केल्यानंतर अनेक बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतांना दिसतो. तसेच थ्रिप्स, मिलीबग, तुडतुडे अश्या अनेक किडींचा प्रादुर्भाव होतांना दिसतो. ह्या कीड - रोगांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष बागेतील उत्पादन खर्च हा वाढतो. कित्येक वेळा शेतकऱ्यांना रोग नियंत्रणाचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने देखील उत्पादन खर्च वाढलेला दिसतो.
आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीनंतर काडीवर येणारा बुरशीजन्य रोग 'बोट्रोडीप्लोडिया, अर्थातच काडी मर रोग.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वात प्रथम माहिती घेऊया बोट्रोडीप्लोडिया विषयी...
👉🏻 एप्रिल छाटणीनंतर सबकेन नंतर द्राक्ष बागेची काडी परिपक्व होणे फार महत्वपूर्ण असते.
👉🏻 जसजशी काडी परिपक्व होतांना दिसते, त्याचप्रमाणे काडीच्या रंगात देखील बदल होतांना दिसतो.
👉🏻 काडीचा रंग हिरवा-गुलाबी-पांढरा-राखाडी ह्या प्रमाणे बदलतो.
👉🏻 छाटणी केल्यापासून काडीचा रंग पूर्ण राखाडी झाल्यास काडी परिपक्व झाली असे आपण म्हणतो.
👉🏻 परंतु, जेव्हा काडी सबकेन च्या अगोदरच राखाडी होण्याचे थांबते, व पुढील काडी पांढरी होण्यास सुरुवात होते.
👉🏻 अश्या वेळी बोट्रोडीप्लोडिया /काडी मर रोग आलाय असे आपण म्हणतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔹 बोट्रोडीप्लोडिया ची लक्षणे -
👉🏻 हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.
👉🏻 द्राक्ष वेलीची काडी सबकेनच्या अगोदरच राखाडी होण्याची थांबते.
👉🏻 पुढील काडी पांढरी होण्यास सुरुवात होते.
🔹 एप्रिल छाटणीनंतर काडी अर्धी राखाडी पडण्याची कारणे -
▫️वेलीवरील जास्त काड्या
▫️कमी प्रमाणात केलेली विरळणी
▫️वाढलेले तापमान
▫️पाण्याचा ताण
▫️पोटॅश ची कमतरता
🔹 बोट्रोडीप्लोडिया ची समस्या टाळण्यासाठी काय उपाययोजना असाव्यात -
👉🏻 काडयांची वाढ नियंत्रित ठेवावी.
👉🏻 तसेच काडयांची संख्या नियंत्रित ठेवावी.
👉🏻 द्राक्ष वेलींला पाण्याचा ताण पडू देऊ नये.
👉🏻 रेंजर च्या मदतीने काडी मर रोगावर प्रभावी नियंत्रण!
🔹 रेंजर वापरण्याचे प्रमाण - 2 ग्रॅम प्रति लिटर
तसेच ड्रिप द्वारे देण्यात येणारे टिरॉन न्यूट्रिशन चे संवर्धन किट, जे देते द्राक्ष वेलीस संपूर्ण पोषण व बोट्रोडीप्लोडिया रोगापासून संरक्षण!
प्रमाण - 1 किट प्रति एकर
.jpeg)
Comments
Post a Comment