'अधिकच्या नफ्यासाठी' उत्कृष्ट असे नियोजन भुईमूग लागवडीचे !

'अधिकच्या नफ्यासाठी' उत्कृष्ट असे नियोजन भुईमूग लागवडीचे !


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

ह्या लेखाद्वारे आपण जाणून घेणार भुईमूग पिकाची लागवड कशी करावी आणि दर्जेदार व भरगोस शेंगदाणे उत्पादनासाठी उत्कृष्ट असे नियोजन.

भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक आहे. भुईमूग पिकाची लागवड ही तीनही हंगामात करता येते. खरीप हंगामामध्ये भुईमूग लागवडीखालील क्षेत्र हे जास्त असते. उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता ही जास्त असते.

उन्हाळी हंगामामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असल्याने रोग व किडींची समस्या ही कमी प्रमाणात उद्भवते. 


भुईमूग लागवड करतांना जमीन कशी असावी?

- जमीन ही भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थांनी भरलेली आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी असावी.


लागवड करण्यापुर्वीची मशागत (पूर्व मशागत) -

जमिनीची 12-15 सें.मी खोलगट अशी नांगरणी करून घ्यावी,  त्यामुळे भुईमुगाच्या शेंगांचा चांगला विकास होतो.


भुईमूग लागवडीचा हंगाम - 

- खरीप हंगाम - 15 जून ते 15 जुलै 

- उन्हाळी हंगाम - 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 


भुईमूग पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्था - 

- फुले येण्याची अवस्था - पेरणीनंतर २५ ते ३० दिवस 

- आऱ्या सुटण्याची अवस्था - पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवस

- शेंगा पोसण्याची अवस्था - पेरणीनंतर ६५ ते ७० दिवस



Vegetative Growth Stage


Flowering Stage

Pod development stage


भुईमूग लागवडीतील वाढीच्या प्रकारानुसार पडणारे प्रकार - 

1) उपट्या 

- शेंगदाणे तीन ते चार महिन्यांत तयार होतात.

- झाडे सरळ वाढतात.

2) पसरे आणि निमपसरे - 

- शेंगदाणे चार ते सहा महिन्यांत तयार होतात.

- जागोजागी जमिनीत शेंगा लागतात.


बीजप्रकिया

बियाण्यांपासून प्रादुर्भाव होणार्‍या रोगांपासून भुईमूग पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रकिया करणे अत्यंत महत्वाचे असते.


बियाणे प्रमाण  - 

- छोट्या आकाराचे दाणे असणार्‍या जातींसाठी - 100 किलो 

- मध्यम आकाराचे - 125 किलो 

- टपोरे दाण्यांसाठी - 125 किलो 


खतांचे व्यवस्थापन - 

पूर्व मशागती च्या वेळी 10 टन शेणखत/कंपोस्ट खत जमिनीत मिसळून द्यावे.

🥜🌱 भुईमूग पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी प्रणिल च्या दर्जेदार उत्पादनांची त्रिसुत्री 

🔹 फवारणी नियोजन - 

1) पहिली फवारणी - (पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी)

पिकाच्या जोमदार वाढीसाठी, मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

👉🏻 पामेला (1.5 ग्रॅम/लिटर) + फाॅस्फोरो ( 2 ग्रॅम/लिटर) 

2) दुसरी फवारणी (पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी) 

भरपूर फुलधारणेसाठी, आऱ्या सुटण्यासाठी, टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी

👉🏻 अमिनो गोल्ड (1.5 ग्रॅम/लिटर) + रेंजर (2 ग्रॅम/लिटर)

3) तिसरी फवारणी (पेरणीनंतर 65 - 75 दिवसांनी)

शेंगा पोसण्यासाठी, शेंगदाण्याचे वजन वाढण्यासाठी 

👉🏻 हल्क (2 मिली/लिटर) + टिराॅन 00:52:34 (200 ग्रॅम/एकर)


पाणी व्यवस्थापन

खरीप भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस)., आ-या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये पाणी देणे आवश्यक असते. 


पीक संरक्षण - 

भुईमूग पिकात प्रामुख्याने येणारा रोग म्हणजे टिक्का रोग - ह्या रोगामुळे पानांवरती गडद तपकिरी रंगाचे डाग दिसतात. जास्त प्रादुर्भाव झालयास पाने पिवळी पडतात आणि पानांची गळ होते. 

Tikka Disease

- टिक्का रोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आम्ही शिफारस करतोय प्रणिल ऍग्री च्या दर्जेदार उत्पादनाची रेंजर (२ ग्रॅम/लिटर)


🔹 निष्कर्ष

भुईमुगाची शेती ही फायदेशीर शेती व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि निर्यातीच्या संधी यामुळे शेतकऱ्यांसाठी भुईमूग एक उत्तम पर्याय ठरू शकतो.



🛒  आमची वरील उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी- 
        1. https://www.pranilagri.com/ 


आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !