जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढवा, मिळवा दर्जेदार आणि भरगोस उत्पादन !
जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढवा, मिळवा दर्जेदार आणि भरगोस उत्पादन !
शेतकरी मित्रांनो,
आम्ही खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास वेळोवेळी शेतीमाला विषयी महत्वाची माहिती देत असतो.
आज आपण जी माहिती घेणार आहोत, ती म्हणजे शेतातील उत्पन्न वाढवून देणाऱ्या गोष्टी विषयी अर्थातच सेंद्रिय कार्बन विषयी!
आपल्या सर्वांना माहितीच आहे की, कोणत्याही पिकाच्या यशस्वी आणि सर्वोत्कृष्ट उत्पादनासाठी (Crop Production) हवामान, जमीन, पाणी, रोग, कीड आणि पीक व्यवस्थापन (Crop Management) या सर्व गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण असतात. यातील हवामान (Climate), पाण्याची उपलब्धता, रोग आणि कीड यांचा निसर्गाशी थेट संबंध असल्याने, त्वरित त्याचे परिणाम दिसतात. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकडे शेतकर्यांचे बारकाईने लक्ष असते. तुलनेने जमिनीच्या आरोग्याकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही.
शेतकरी बांधवांनो,
आपल्या शेतीतून शाश्वत उत्पादन मिळवायचे असेल तर जमिनीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे.
जमिनीचे आरोग्य जपणे म्हणजेच, जमिनीत असलेल्या सेंद्रिय कार्बन ची मात्रा वाढविणे!
चला तर मग जाणून घेऊया, सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमके काय?
जमिनीत उपलब्ध असलेल्या सूक्ष्म जीवाणूंनी जमिनीतील कोणत्याही पदार्थांचे विघटन (Decomposition) केल्यानंतर, राहिलेला जो कर्ब असतो, तो म्हणजे सेंद्रिय कर्ब (Organic Carbon)
सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा सुपीकता निर्देशांक मानला जातो. सर्वसाधारणपणे सेंद्रिय पदार्थात ५८ टक्के सेंद्रिय कर्ब असतो. भारतातील साधारण ६७ टक्के जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी आहे. महाराष्ट्रातील ५० टक्के जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी, तर ३८ टक्के जमिनीत मध्यम प्रमाणात आहे. माती तपासणीनंतर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सुपीकता निकष खालील प्रमाणे
- ०.२ टक्क्यापेक्षा कमी --- अत्यंत कमी
- ०.२१ ते ०.४० टक्के या दरम्यान --- कमी
- ०.४१ ते ०.६० टक्के --- मध्यम
- ०.६१ ते ०.८० टक्क्यांपर्यंत --- जास्त
- सेंद्रिय कर्बावर प्रामुख्याने कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो ते आपण पाहूया -
सेंद्रिय कर्बावर प्रामुख्याने हवामान, जमिनीतील जिवाणू, ओलावा, जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा प्रकार आणि त्यांचे जमिनीत वापरलेले प्रमाण अशा अनेक गोष्टींचा परिणाम होतो.
1) हवामान (Weather) :- जितके तापमान जास्त तितका त्याचा सेंद्रिय कर्बावर घातक परिणाम होतो.
थंड तापमानात सेंद्रिय कर्ब योग्य पातळीत ठेवणे सोपे जाते. महाराष्ट्रात तापमान तुलनेने जास्त असल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढीसाठी मर्यादा येतात. जमिनीत सेंद्रिय पदार्थ किंवा खतांचा वापर केल्यास सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. बहुतांश शेतकरी एकतर पुरेशी सेंद्रिय खते वापरत नाहीत किंवा पुरेसा वापर केला तरी उष्ण तापमानामुळे सेंद्रिय पदार्थांचे वेगाने विघटन होते. परिणामी सेंद्रिय कर्ब पातळीत वाढ होण्यात अडचणी येतात.
2) जमिनीतील जिवाणू व ओलावा (Soil microorganisms and moisture):- सेंद्रिय पदार्थांच्या वापरानंतर त्यांच्या जैविक आणि रासायनिक विघटनात जिवाणू महत्त्वाची भूमिका निभावतात. सेंद्रिय पदार्थ हे जिवाणूंचे अन्न आहे. तसेच जमिनीतील बुरशी, जिवाणू, ॲक्टिनोमायसेट्स असे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थ कुजविण्याची प्रक्रिया सुरू करतात. पूर्ण विघटनानंतर सेंद्रिय कर्ब वाढतो. मात्र तापमान अधिक असल्यास जमिनीत अपेक्षित वाढ दिसत नाही. त्यामुळे जमिनीतील ओलावा योग्य प्रमाणात राखणे आवश्यक असते. अधिक ओलावा असल्यास जिवाणूंची कार्यशक्ती व एकूणच विघटनाची प्रक्रियाही मंदावते.
3) सेंद्रिय पदार्थांचे गुणधर्म (Properties of Organic Carbon) :- आपण वापरलेल्या सेंद्रिय खतातील सेंद्रिय कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर (C:N Ratio) हे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व वेग ठरवते. उदा. गव्हाच्या काडाचे कर्ब नत्र गुणोत्तर ८०:१ तर शेणखताचे हे गुणोत्तर १६:१ या दरम्यान असते. त्यामुळे गव्हाच्या काडाचे विघटन होण्यास खूप कालावधी लागतो. जमिनीत नत्राचे प्रमाण खूप कमी असेल तर सेंद्रिय पदार्थ विघटनाची क्रिया मंदावते.
आपला मुख्य जो ब्लॉग चा विषय आहे, सेंद्रिय कर्ब आता आपण माहिती घेऊया ,
- सेंद्रिय कर्बाचे पिकाच्या दृष्टीने महत्त्वाचे फायदे -
- सेंद्रिय कर्ब जास्त असलेल्या जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या अधिक असते.
- परिणामी पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक होते. अशा जमिनीत सेंद्रिय पदार्थ अधिक असल्यामुळे जमिनीची भौतिक सुपीकताही लक्षणीय प्रमाणात सुधारते.
- जमिनीची जलधारणाशक्ती (Water holding Capacity), पोत (Soil texture) सुधारतो, त्यामुळे क्षारांचा निचरा होण्यास मदत होते.
- जमिनीत हवा खेळती राहिल्याने मुळांची निरोगी, जोमदार वाढ होते.
- जमिनीचा सामू अधिक असल्यास तो कमी होण्यास मदत होते. जीवाणूद्वारे सेंद्रिय आम्ले सोडली जातात.
- या आम्लांमुळे रासायनिक अभिक्रिया वाढून स्थिर झालेली सेंद्रिय व रासायनिक अन्नद्रव्येही पिकांना उपलब्ध होऊ लागतात.
- म्हणून सेंद्रिय म्हणून सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवणे जमिनीच्या जैविक, भौतिक आणि रासायनिक सुपीकतेसाठी महत्त्वाचे ठरते.
आतापर्यंत आपण जाऊन घेतले की, सेंद्रिय कर्ब म्हणजे काय, त्याचे पिकांसाठी होणारे फायदे आता आपण बघणार आहोत, सेंद्रिय कर्ब वाढवणाच्या उपाययोजना काय आहेत?
![]() |
| Balancing crop cycle |
1) जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरेसा पुरवठा करणे हा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा रामबाण उपाय आहे. उदा. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, कोंबडी खत, प्रेसमड केक, प्रेसमड केकचे कंपोस्ट, हिरवळीची पिके, अखाद्य पेंडी (निंबोळी पेंड, करंज पेंड, सरकी पेंड इ.)
2) जनावरे जोपासणे अवघड ठरत आहे. त्यांची संख्या कमी होत चालल्याने शेणखताचा पुरेसा वापर शेतात होण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. मात्र शेणखत अपुरे आहे किंवा उपलब्ध नाही म्हणून रासायनिक खतांचा अधिक वापर धोकादायक ठरू शकतो. कारण सेंद्रिय खतांसाठी कोणतेही रासायनिक खत पर्याय ठरू शकत नाही.
3) एक सेंद्रिय खत उपलब्ध नसेल, दुसऱ्या सेंद्रिय खतांचाच पर्याय योग्य ठरतो. उदा. उसाचे पाचट न जाळता शेतातच कुजवणे. पिकांची फेरपालट करून नत्र स्थिरीकरण करणारी पिके घेणे.
4) पिकांसाठी रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करावा.
5) पिकांच्या गरजेनुसारच पाण्याचा वापर करावा.
6) हिरवळीच्या पिकांचा (उदा. ताग, धैंचा, चवळी इ.) सेंद्रिय कर्ब वाढण्यास खूप फायदा होतो. पीक पद्धतीत या पिकांचा आवर्जून समावेश करावा. योग्य वेळी ती जमिनीत गाडावीत.
7) पीक पद्धतीमध्ये एकच पीक सातत्याने घेऊ नये. त्यात वेळोवेळी बदल करावेत.
8) सेंद्रिय कर्ब जमिनीच्या वरच्या थरात अधिक असून, या थराची धूप होणार नाही, याची काळजी घ्यावी.
अशा प्रकारे जमीन आणि पीक व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय कर्ब वाढीचा गांभीर्याने विचार करावा.





Comments
Post a Comment