असे करा डाळिंब बागेचे योग्य नियोजन व मिळवा सर्वोत्तम उत्पादन !
असे करा डाळिंब बागेचे योग्य नियोजन व मिळवा सर्वोत्तम उत्पादन !
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
असे करूया डाळिंब फळ पिकाचे योग्य व्यवस्थापन व मिळवूया सर्वोत्तम आणि दर्जेदार उत्पादन.
आम्ही खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास वेळोवेळी शेतीमाला विषयी महत्वाची माहिती देत असतो. यातच एक ब्लॉग चा विषय आहे डाळिंब बागे बद्दल, ज्यात माहिती दिली गेली आहे ती डाळिंब बागेच्या योग्य व्यवस्थापना विषयी.
शेतकरी मित्रांनो आपणास माहितीच असेल डाळिंब शेती – ठरला आहे व ठरतोय एक फायदेशीर पर्याय !
डाळिंब (Punica granatum) हे एक महत्त्वाचे आणि फायदेशीर फळपीक आहे. याला दरवर्षी बाजारात मोठी मागणी असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली किंमत मिळते. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड केली जाते.
![]() |
| Growth Cycle of pomegranate fruit crop |
🔹 डाळिंबाची शेतीसाठी लागणारे अनुकूल हवामान आणि जमीन
- डाळिंबासाठी कोरडे आणि उष्ण हवामान अनुकूल आहे.
- २५°C ते ३५°C तापमान चांगले मानले जाते.
जमीन - मध्यम ते हलकी काळी, किंवा चांगल्या निचऱ्याची जमीन लागवडीसाठी योग्य असते.
🔹 डाळिंबाची वाणं (Varieties)
1. भगवा – गडद लाल रंग, गोडसर चव आणि चांगला बाजारभाव.
2. गणेश – मध्यम फळ, गोडसर रस आणि गडद गुलाबी रंग.
3. अर्का कामधेनू – अधिक उत्पादन देणारी variety
4. मृदुला – रसदार आणि मोठ्या आकाराचे फळ देणारी variety
🔹 बहर
डाळींब पिकाला योग्य नियाजन केल्यास वर्षभरात केव्हाही बहर धरतो, म्हणुन त्याला सदाबहार पीक म्हटले जाते. तरीही मुख्यतः तीन बहारात डाळींबाचे नियोजन करतो येते.
1) मृग बहर
2) हस्त बहर
3) आंबे बहर
मृग बहरः पावसाळा सुरू झाल्यानंतर जो बहर धरला जातो, तो म्हणजे मृग बहर. हा मुख्यतः पावसाच्या पाण्यावर पोसला जातो. मृग बहर हा जिरायती व जिथे पाण्याची कमतरता असते तिथे मोठ्या प्रमाणात धरला जातो. ह्याचा कालावधी जून-जुलै किंवा पावसाच्या आगमनावर अवलंबून असतो.
मृग बहरात डाळींब पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. ह्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही घेऊन आलोय दर्जेदार अशी उत्पादने त्यामध्ये प्रणिल ऍग्री सर्विसेस ची अशी बुरशीनाशके -
🔹 डाळिंब पिकात येणाऱ्या तेल्या रोगावरती - रेंजर (ग्रॅम/लिटर) ह्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
🔹 डाळिंब पिकात येणाऱ्या भूरी रोगावरती - फायटर (मिली/लिटर) ह्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
हस्त बहरः पावसाळा संपल्यानंतर जो बहर धरला जातो तो हस्त बहर. सप्टेंबर – आक्टोंबर महीन्यात हस्त बहर धरला जातो.
आंबे बहर – आंब्याबरोबर घेतल्या जाणा-या डाळींब बहराला आंबा बहर म्हणतात. हलक्या व मुरमाड जमिनीत तीनही बहर घेणे शक्य असते.
🔹 लागवड पद्धती
- लागवडीसाठी साधारण ५ x ५ मीटर अंतर ठेवावे.
- लागवडीपूर्वी शेणखत आणि सेंद्रिय खते वापरावी.
- ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा, त्यामुळे पाण्याचा योग्य वापर होतो.
🔹 खत व्यवस्थापन -
डाळिंबाच्या झाडांसाठी नत्र (N), स्फुरद (P), आणि पालाश (K) यांचे संतुलित प्रमाण आवश्यक आहे. झाडाच्या वयाप्रमाणे योग्य प्रमाणात जैविक आणि रासायनिक खतांचा वापर करावा.
🔹 डाळिंब पिकात जोमदार शाखीय वाढीसाठी, फुल आणि फळधारणा होण्यासाठी - अमिनो गोल्ड
🔰 वापरण्याचे प्रमाण आणि पद्धत -
- फवारणीद्वारे - 1.5 ग्रॅम/लिटर
- ड्रिपद्वारे - 400 ग्रॅम/एकर
🔹डाळिंब पिकात भरपूर फुलकळी व सेटिंग साठी - 'अल्बेरो + टिबो'
- फायदे -
✅ डाळिंबात अधिक फुलकळी निघण्यास मदत होते.
🔰 वापरण्याचे प्रमाण -
- अल्बेरो - 1 मिली/लिटर
- टिबो - 1 मिली/लिटर
🔹 डाळिंब फळाच्या उत्कृष्ट रंगासाठी, आकार व वजन वाढवण्यासाठी - 'किंग स्टार'
🔰 वापरण्याचे प्रमाण -5 लिटर/एकर
🔹 कीड व रोग नियंत्रण
1. डाळिंब पिकातील मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांवरती प्रभावी नियंत्रण - शिल्ड ह्या कीटकनाशकाचा फवारणीद्वारे (2 मिली/लिटर) वापर करून नियंत्रण मिळवावे.
2. फळ पोखरणारी अळी – ह्या अळीच्या नियंत्रणासाठी मॉर्डेर ह्या कीटकनाशकाचा फवारणीद्वारे (2 मिली/लिटर) वापर करून नियंत्रण मिळवावे.
3. बुरशीजन्य रोग – बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेंजर, फायटर, फॉस्फोरो ह्या प्रभावी बुरशीनाशकांचा वापर करा .
🔹 निष्कर्ष
डाळिंब शेती शाश्वत आणि फायदेशीर शेती व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि निर्यातीच्या संधी यामुळे शेतकऱ्यांसाठी डाळिंब एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
.png)

Comments
Post a Comment