असे करा आंबा फळपिकातील मोहोराचे सरंक्षण
असे करा आंबा फळपिकातील मोहोराचे सरंक्षण
नमस्कार फळ बागायतदार बंधुनो,
Khetiwalebhaiya ह्या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण जाणून घेणार आहोत आंबा फळपिकातील मोहोराचे सरंक्षण कसे करावे.
आंबा हा भारतातील एक प्रमुख फळपिक आहे. मोहोर म्हणजे आंबा झाडावर येणारे फुले आणि त्यांच्यापासून तयार होणारे लहान फळे. आंबा बागेमध्ये मोहोर येणे आणि मोहोर आल्यानंतर तो टिकवून ठेवणे व त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या गोष्टींना फार महत्त्व असते.
मात्र, मोहोर हा आंबा उत्पादनात मोठे नुकसान करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मोहोर गळण्याची कारणे -
- हवामान बदलांचा परिणाम: अचानक तापमान बदल, पाऊस पडणे, वादळे इत्यादी हवामान बदलांमुळे मोहोर गळू शकतो.
- अपुरा पाणीपुरवठा : आंब्याच्या झाडाला पुरेसे पाणी मिळाले नाही तर मोहोर गळू शकतो.
- खतांचा अपुरा पुरवठा: झाडाला योग्य प्रमाणात खते मिळाली नाही तर त्याचा परिणाम मोहोरावर होऊ शकतो.
- कीड-रोगांचा प्रादुर्भाव: तुडतुडे, शेंडा पोखरणारी अळी, फुलकिडे इत्यादी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास मोहोर गळू शकतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आंबा फळ पिकातील मोहोराचे नुकसान हे त्यावरती येणाऱ्या रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे होते.
मोहोरा वर येणारे रोग व त्यावरील व्यवस्थापन -
1. भुरी रोग -
या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोहोर आणि कच्च्या फळांची गळ होते.
लक्षणे- मोहोरावर पांढरी राखट रंगाची बुरशी येऊन मोहर गळू लागतो.
- आंब्याच्या पानावर प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या दोन्ही बाजूला छोटे छोटे राखाडी रंगाचे ठिपके दिसतात.
उपाय- ज्या पानांवरती, मोहोरावरती ह्या रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय ती पाने व मोहोर काढून टाकणे.
यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी 'फायटर' (2 मिली/लिटर) या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
2. करपा रोग -
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे आंबा फळ पिकामध्ये मोठे नुकसान होऊ शकते.
लक्षणे - फांद्यांवरील मोहर करपतो, फांद्यांचे शेंडे जळतात, पाने करपतात.
मोहोरा मधील फुलाच्या देठावर व फुलावरही छोटे काळे डाग पडतात. पुढे हे डाग वाढत जातात.
उपाय-
करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावावी.
तसेच या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी रेंजर (2 मिली/लिटर) ह्या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मोहोरावर येणारी कीड व त्याचे व्यवस्थापन
1. तुडतुडे
- आंब्याच्या झाडाची पाने, मोहोर आणि फळांवर ही कीड रसशोषण करते.
- तिच्या हालचालींमुळे व खरवडल्यामुळे फळांवरती डाग दिसतात.
लक्षणे -
या किडीच्या रस शोषणाने आंब्याचा मोहर सुकून गळून जातो.
उपाय-
या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जैविक कीटकनाशकाचा वापर करावा.
शिल्ड हे जैविक कीटकनाशक असल्याने ते 100% प्रभावी उत्पादन आहे.
- 2 मिली/ लिटर ने ह्या उत्पादनाची फवारणी करावी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मोहोर संरक्षणासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी:
- मोहोर येण्यापूर्वी आणि नंतर झाडांची काळजीपूर्वक निरीक्षण करावे.
- कीड-रोगांच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे.
- कीड-रोगांचे नियंत्रण करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी.
- शेतकरी मार्गदर्शन केंद्रांचा सल्ला घ्यावा.
निष्कर्ष:
मोहोर गळणे हा आंबा उत्पादनात मोठा धोका आहे. मात्र, योग्य काळजी आणि उपाययोजना करून मोहोर गळणे कमी करता येते. शेतकरी यासाठी शेतकरी मार्गदर्शन केंद्रांचा सल्ला घेऊन योग्य उपाययोजना करावी. तसेच यावरती प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जैविक बुरशीनाशके व कीटकनाशकांचा वापर करावा.
.png)


Comments
Post a Comment