शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवड करा (नियंत्रित वातावरणातील शिमला मिरची) व उत्पादन वाढवा
शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवड करा (नियंत्रित वातावरणातील शिमला मिरची) व उत्पादन वाढवा
नमस्कार शिमला उत्पादक शेतकरी मित्रांनो,
आज आपण शेडनेट मध्ये शिमला मिरचीची लागवड कशी करावी व शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड केल्याने उत्पादनात काय परिणाम दिसून येतो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवड केल्याने उत्पादनात वाढ होते आणि उच्च दर्जाचे आणि गुणवत्तेचे उत्पादन आल्यामुळे बाजारात चांगला दर मिळतो. शेडनेटमध्ये योग्य तापमान व आर्द्रता (Humidity) टिकवून राहते, ज्यामुळे पीक चांगल्या प्रकारे वाढते.
शेडनेट ही शेतकऱ्यांसाठी एक आधुनिक आणि प्रभावी शेती पद्धत आहे. या पद्धतीत पिकांना सूर्यप्रकाश, पाऊस आणि हवामानापासून संरक्षण मिळते. शिमला मिरची हे एक असं पिक आहे ज्याला शेडनेट मध्ये चांगले वातावरण मिळते.
शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड ही एक उत्कृष्ट पद्धत आहे ज्यामुळे आपण वर्षभर ताजी आणि गुणवत्तायुक्त मिरची मिळवू शकता. शेडनेटमुळे हवामान आणि किडींच्या त्रासापासून संरक्षण मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवडीचे फायदे -
- उत्पादन वाढ: शेडनेटमुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित राहते, ज्यामुळे फळांची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढते.
- गुणवत्ता सुधारणा : शेडनेटमुळे फळांवर सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम होत नाही, त्यामुळे फळे अधिक काळ टिकून राहतात आणि त्यांची गुणवत्ता सुधारते.
- रोगांपासून संरक्षण : शेडनेटमुळे कीटक आणि रोगांपासून फळांचे संरक्षण होते.
- हवामान बदलाचा प्रभाव कमी : अनपेक्षित हवामान बदलांचा फळांवर होणारा परिणाम कमी होतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शिमला मिरची वाढीच्या अवस्था -
![]() |
| Growth Stages of Capsicum |
शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवडीची पद्धत -
- जमीन तयार करणे.
- जमीन चांगल्या प्रकारे मशगत करून घ्यावी.
- खत आणि कंपोस्ट खताचा वापर करून जमीन सुधारून घ्यावी.
- बेड तयार करून रोपे लावावीत.
हवामान -
ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तपमान 25 सेल्सिअस व रात्रीचे 14 सेल्सिअस या पिकास उत्तम तापमान असून तापमान 10 सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास व ठिपके पडल्यास या पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
लागवड:
लागवडीचा हंगाम: ऑक्टोबर-नोव्हेंबर किंवा फेब्रुवारी-मार्च.
अंतर:
झाड ते झाड: 30-40 सेमी.
ओळ ते ओळ: 50-60 सेमी.
फवारणी व्यवस्थापन -

.png)
Comments
Post a Comment