काळाची गरज बनतेय विषमुक्त शेती !! (Residue Free Farming)
काळाची गरज बनतेय विषमुक्त शेती !! (Residue Free Farming)
कमी खर्चात, कमी श्रमात जास्त उत्पादन काढणे ही काळाची गरज आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक औषधांच्या वाढत्या वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. निरोगी व सदृढ भारतासाठी शेतकऱ्यांनी आता विषमुक्त / अवशेष मुक्त शेती करणे हि काळाची गरज बनलेली आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु आता शेती हा व्यवसाय म्हणून करणे गरजेचे आहे. शेतीसाठीचा होणारा खर्च कमी केलाच पाहिजे. जास्त उत्पादन मिळावे, या आशेने रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. हे शेतीसाठी तसेच मानवाच्या आरोग्यासाठी हि धोकादायक आहे. म्हणून सर्वांनी सेंद्रिय शेती / अवशेषमुक्त शेतीस प्राधान्य द्यायला हवे. शेतीत नवनवीन जैविक खते व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती हा यशस्वी व्यवसाय होईल.
खरेदीदार कमीतकमी रासायनिक अवशेष आणि उच्च पोषण मूल्यांसह असणाऱ्या उत्पादनांची निवड करत आहेत. एका प्रक्रियेला दुसऱ्यापेक्षा चांगले म्हणणे अयोग्य ठरेल, परंतु सेंद्रिय शेतीची एक विशिष्ट भूमिका आहे असे म्हणणे खरोखर सुरक्षित आहे, तर अवशेष-मुक्त पद्धती अधिक किफायतशीर आणि शाश्वत पर्याय देतात.
अवशेषमुक्त शेती म्हणजे काय?
अवशेषमुक्त शेती (Residue Free Farming) म्हणजे रासायनिक कीटकनाशके, खते किंवा कोणत्याही प्रकारचे घातक रसायनांचा अतिवापर न करता शेती करणे. यामध्ये पीक उत्पादनासाठी नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतींचा अवलंब केला जातो. या प्रकारच्या शेतीत उगवलेले पीक, फळे किंवा भाजीपाला यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक अवशेष आढळत नाहीत.
अवशेष-मुक्त शेती पद्धती जैव-खते वापरण्यावर भर देतात जे विविध फायदेशीर सूक्ष्मजंतूंना पूरक करून जमिनीत जिवंतपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात. हे विविध मातीजन्य रोग जसे की नेमाटोड्स, कोमेजणे इत्यादींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि मातीच्या मायक्रोबायोटाला देखील आधार देते.
अवशेषमुक्त शेतीची वैशिष्ट्ये:
सेंद्रिय खते आणि कीटकनाशके वापरणे:- गांडूळ खत, जैविक कीटकनाशके, आणि इतर सेंद्रिय उत्पादने वापरली जातात.
नैसर्गिक कीड नियंत्रण:- निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, किंवा जैविक कीड नियंत्रकांचा वापर केला जातो.
जैवविविधतेचे संवर्धन: - एकाच वेळी अनेक प्रकारची पिके घेऊन निसर्गातील समतोल राखला जातो.
आरोग्यासाठी फायदेशीर उत्पादन: - अशा प्रकारे तयार झालेले अन्नपदार्थ विषमुक्त असतात आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असतात.
अवशेषमुक्त शेतीचे फायदे :-
✅ अवशेषमुक्त शेती मानवी आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आहे.
✅ अवशेषमुक्त शेती ही पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक कार्यक्षम आहे.
✅ अवशेष शोधण्यासाठी अवशेषमुक्त शेतकरी अत्याधुनिक तंत्रांचा वापर करतात.
✅ आवश्यकतेपेक्षा जास्त कीटकनाशके आणि तणनाशकांचा वापर टाळण्यास मदत करते.
✅ अवशेष-मुक्त शेती पोषक तत्वांचा पुनर्वापर करण्यासाठी आणि कचरा कमी करण्यासाठी अत्याधुनिक पद्धती वापरते.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !

Comments
Post a Comment