हरभऱ्याच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी असे करा खत, पाणी व फवारणी व्यवस्थापन.
हरभऱ्याच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी असे करा खत, पाणी व फवारणी व्यवस्थापन.
नमस्कार शेतकरी बांधवांनो,
Khetiwalebhaiya ह्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आज आपण हरभरा पिकातील खत व फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून या पिकामधून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावयाचे असल्यास अधिक उत्पन्न देणार्या वाणा बरोबर योग्य खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हरभरा पिकाचे भारतातील एकूण उत्पादनापैकी 15% उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात घेतले जाते. हरभरा पिक हे कमी खर्चातलं पीक आहे तसेच कमी खर्चातही भरपूर उत्पादन या पिकाचं मिळवता येतं.
- हरभरा हे द्विदल पीक (Dicot Plant) असून द्विदल पिकांच्या मुळावर नत्र स्थिरीकरणासाठी गाठी असतात.
- हे द्विदल पीक हवेतील नायट्रोजनचा वापर करून नत्राची गरज भागवत असतात.
- या कारणाने हरभरा पिकाला नत्राची खूपच कमी गरज भासते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
खत व्यवस्थापन :-
खरीप हंगामामध्ये शेणखत टाकले नसेल तर ५ टन प्रति हेक्टर या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत कुळवणीच्या वेळी शेतात पसरवावे.
हरभऱ्याची पेरणी करतेवेळेस २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद, तसेच ३० किलो पोटॅश या प्रमाणात खते द्यावीत . किंवा दीड ते दोन बॅग डीएपी आणि अर्धी बॅग पोटॅश दिले तरी चालेल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाणी व्यवस्थापन :-
हरभरा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. हरभरा पिकाला बागायती हरभऱ्याची पेरणी करताना जमीन ओलावा असेल तर पहिले पाणी 25 ते 30 दिवसांनी द्यावे, तसेच जमीन जर पेरणी केली असेल तर पहिले पाणी 30 ते 40 दिवसात द्यावे.
त्यानंतर पीक चांगले फुलोऱ्यात असेल तर पाणी देऊ नये तेव्हा पाणी दिल्यास फुल लागण्याची क्षमता कमी होते व फुलोरा गळतो त्यानंतर दुसरे पाणी घाटे अवस्थेमध्ये द्यावे तेव्हा पाणी दिल्यास घाटे धारणा तसेच घाटे भरण्यासाठी मदत होते.
वाढीच्या अवस्थेनुसार वाढीच्या अवस्थेत वीस ते पंचवीस दिवसांनी पहिले पाणी द्यावे फुलोऱ्यात असताना 45 ते 50 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे घाटे भरताना ६५ ते ७० दिवसाच्या दरम्यान तिसरे पाणी द्यावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असे करा स्प्रे/फवारणी व्यवस्थापन -
हरभरा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी - दर्जेदार उत्पादनांची शिफारस..
1. पहिली फवारणी - (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी)
- रोपांच्या जोमदार वाढीसाठी, मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
पामेला (1.5 ग्रॅम/लिटर) + फाॅस्फोरो ( 2 ग्रॅम/लिटर) + टिराॅन 12:61:00 ( 200 ग्रॅम/एकर)
🛒 Pamella, Fosforo, Tiron 12:61:00 हे उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
1. https://www.pranilagri.com/
2. दुसरी फवारणी (पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी)
- अधिकची फुलधारणा होण्यासाठी तसेच तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
अमिनो गोल्ड (1.5 ग्रॅम/लिटर) + फायटर (2 मिली/लिटर) + कॅलबाॅन (2 मिली/लिटर)
🛒 Amino Gold, Fighter, Calborn हे उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी
1. https://www.pranilagri.com/
3. तिसरी फवारणी (पेरणीनंतर ५५ - ६० दिवसांनी)
- घाटे भरण्यासाठी, तसेच दाण्यांचा आकार व वजन वाढविण्यासाठी
हल्क (2 मिली/लिटर) + टिराॅन 00:52:34 (200 ग्रॅम/एकर) + ल्युटाडोर (2 मिली/लिटर)
🛒 Hulk, Lutador हे उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
1. https://www.pranilagri.com/
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !




Comments
Post a Comment